कोरोना खोटा की कॅप्सूल खोटी ?

पालक जागरूक होते म्हणून त्यांनी विरोध केला जर त्यांनी विरोध केला नसता तर नववी दहावीच्या मुली डाॅक्टरांच्या विश्वासावर घरापासून नव्वद शंभर किलोमीटर दूर पाठवायच्या का ? लोक म्हणतील की, डाॅक्टरवर संशय घेणे योग्य नाही, हो हेही तेवढेच खरे आहे पण गोपीचंद पडळकर त्यांच्या भाषणात म्हणतात की, डाॅक्टरने एका महीलेच्या योनीचा स्वॅब घेतला होता. तसेच सारसा येथे डाॅक्टर जर रिपोर्टची मागणी करूनही कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट देत नसतील तर त्यांच्यावर संशय घेण्यात गैर काय ?

0 229
कोरोना खोटा की कॅप्सूल खोटी ?

 

 

नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२ 

 

कोरोनावर औषध कधी येणार ? या मथळ्याखाली झी २४ तासने बातमी प्रसारित केली अन् त्यातील मजकूर वाचून मनात प्रश्नांच काहुर माजलं कारण त्यात लिहिलं होतं की, प्रेमास बायोटेक नावाची कंपनी कोरोनावरची कॅप्सूल तयार करत आहे. अमेरिकन कंपनी ओरामेड फार्मा या कंपनीच्या मदतीनं भारतात ही कॅप्सूल तयार होत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार कोरोनाशी लढायला एक कॅप्सूल पुरेशी आहे. तसेच एक कॅप्सूल घेतल्यावर शरीरात कोरोनाशी लढणा-या अँटीबॉडीज तयार होतील, या अँटीबॉडीज श्वसननलिका, पोट आणि आतड्यांचं कोरोनापासून संरक्षण करतील, असा दावा आहे. भारतात तयार होणा-या कॅप्सूलचं नाव ओरावॅक्स कोविड 19 कॅप्सूल असणार आहे. सध्या या कॅप्सूलच्या ट्रायल्स सुरू आहेत. या ट्रायल्समध्ये कॅप्सूलनं उत्तम परिणाम दिल्याचा कंपनीचा दावा आहे. (झी२४तास २३ मार्च २१) तर मग प्रश्न पडतो की, लातूर जिल्ह्यातील तांदुळजा आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांकडून सारसा येथिल शाळेतील विद्यार्थांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, डाॅक्टरांच्या मते त्यातील २८ विद्यार्थी बाधीत असल्याचे  पालकांना सांगितले तेव्हा पालकांनी डाॅक्टरांकडे आमची मुलं कोरोना बाधीत असल्याचा लेखी पुरावा द्या ? त्यांच्या कोणकोणत्या चाचण्या केल्या त्यांचे सर्व रिपोर्ट द्या ? अशी मागणी केली तेव्हा त्या नागरिकांना डाॅक्टरांकडून आजपर्यंत कोणताही लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. तसेच बाधीत रुग्णांना लातूर शहरातील कोवीड सेंटरला पाठवावं लागेल असे डाॅक्टरांनी पालकांना सांगताच पालकांनी त्यास विरोध केला तेव्हा डाॅक्टरांनी नवीन शक्कल लढवली ती अशी की, लातूर येथे नको तर मग गावच्या शाळेत पाठवा तेथे उपचार करता येतील तेव्हा नागरिकांनी स्वत:च्या भावनेला आवर घालत पाल्यांना शाळेत पाठवले. पण प्रश्न पडतो की, पालक जागरूक होते म्हणून त्यांनी विरोध केला जर त्यांनी विरोध केला नसता तर नववी दहावीच्या मुली डाॅक्टरांच्या विश्वासावर घरापासून नव्वद शंभर किलोमीटर दूर पाठवायच्या का ? लोक म्हणतील की, डाॅक्टरवर संशय घेणे योग्य नाही, हो हेही तेवढेच खरे आहे पण गोपीचंद पडळकर त्यांच्या भाषणात म्हणतात की, डाॅक्टरने एका महीलेच्या योनीचा स्वॅब घेतला होता. तसेच सारसा येथे डाॅक्टर जर रिपोर्टची मागणी करूनही कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट देत नसतील तर त्यांच्यावर संशय घेण्यात गैर काय ?
कोरोनाची कॅप्सुल अजून बाजारातही उपलब्ध नाही असे वरील बातमीनुसार खात्रीने सांगता येत असेल तर मग सारसा येथे त्या कोरोना बाधीत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गोळ्या पाहुन अजून डाॅक्टरांवर संशय निर्माण होतो कारण तिथे अनेक प्रकारच्या गोळ्या देतात यांचे पुरावे आहेत त्यामध्ये ‘व्हिटॅमीन सी आयपी ५००, पॅरासिटाॅमाॅल आयपी ५००, ओमीप्रोझोल आयपी ५००, ओआरएस नावाचं एक बंद पाकीट व इतर गोळ्या त्या बाधीत रूग्णांना दिल्या जात असल्याचे समजले. पण (झी२४तास २३ मार्च २१) ची बातमी म्हणते की, कोरोनावर लवकरच गोळी येईल तर मग सारसा येथिल रूग्णांना दिल्या जाणा-या गोळ्याचं काय ? त्या गोळ्यांच्या सेवणाने त्या मुलाचे काही बरेवाईट झाले तर डाॅक्टर जबाबदारी घेणार का ? त्यामुळे स्पष्ट होत की, कोरोनावर कोणताही इलाज नसताना डाॅक्टरांकडून कोरोना बाधीत रुग्णांना विनाकारण इतर गोळ्या दिल्या जात असतील यांना पांढरे (कोट) अॅप्राॅन घालून फिरणारे सैतान का म्हणू नये ? कोरोनाचा हा संसर्गजन्य आजार आहे असं डाॅक्टरचं सांगतात तर मग ते सारसा येथिल कोवीड सेंटरमध्ये पीपीई कीटविना का फिरतात ? त्यामुळे प्रश्न पडतो की, ‘कोरोना खोटा की डाॅक्टरच खोटे ?’
फेसबुकवर विनोद सदावर्ते म्हणतात कोरोना हा असा आजार आहे, ज्याचा त्रास लोकांना नाहीतर सरकारला होतो. म्हणूनच की काय देशाचे सर्वेसर्वा प्रधानमंत्री म्हणतात की, कोरोनाची दुसरी लाट आली तसं राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील असं म्हणून आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी नंतर आता मी जबाबदार अशी नवी मोहीम सुरू करावी लागेल असं म्हणाले (लोकसत्ता आॅ. २१ मार्च २२) तेव्हा या दोन राजकीय पुढाऱ्यांना विचारावं वाटत की, बिहारमध्ये झालेल्या व महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत व पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुका, पश्चिम बंगाल मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक व तेथे होणा-या केंद्रीय नेत्यांच्या सभा व निघणा-या रॅली तसेच, पोहरादेवी येथे संजय राठोडांनी जमवलेली गर्दी तर आता पंढरपूर येथिल पोटनिवडणुक आणि तिथे झालेली अजित पावारांची भरगच्च सभा यात कोरोनाची दुसरी लाट पोहोचली नाही का ? कोरोना विषाणू काय गर्दीला पाहून भितो का ? भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व पश्चिम बंगाल येथिल स्थानिक पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही का ? की ते सांगलीच्या मनोहर कुलकर्णीचे तुपाने भरलेले बोट नाकात फिरवून घेतात ? कारण या सर्व पक्षातील नेत्याचे मनोहर कुलकर्णी यांचे जवळचे संबंध आहेत कारण ते मांडीला मांडी लावून बसलेले अनेकांनी पाहीले आहेत.
कोरोना हा विषाणू पण राजकारण करतो की काय ? कारण गुजरातमधील भाजपचे राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे आमदार गोविंद पटेल म्हणतात की, भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळे भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला करोनाचा संसर्ग झालेला नाही. (लोकसत्ता आॅ. २२ मार्च २१) जर भाजपच्या नेत्याने निवडणुक प्रचारात जमलेल्या लाखोंच्या गर्दीला कोरोना होत नसेल तर तुम्ही आम्ही घाबरण्याचे नाही कारण पोहरादेवी येथेही गर्दी जमली होती तिथेही कोरोना आणि त्याची लाट तिथे दिसली नाही कारण तिथे राऊतांचे भक्त कोरोनाची वाट अडवून लाट थांबवत होते का ? तिथेही कोरोना झाला नाही ही वस्तुस्थिती असताना शाळेत गेल्यावरच कोरोना का होते म्हणजे नक्कीच काहीतरी षंढयत्र आहे पण डाॅक्टर खरं काय ते सांगत नाहीत.
डाॅक्टर व प्रसारमाध्यमांनी दिवसरात्र लोकांना ओरडून सांगितलं होतं की, घराबाहेर जाणं व संपर्क टाळा, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा त्यामुळे आमच्या लोकांनी सकाळ संध्याकाळ हातचं काय अंधोळही करायला कमी केली नाही तरीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले पण आता संशोधक म्हणतात की, सॅनिटायझरमध्ये कर्करोगाला कारणीभूत असे काही घटक आहेत, कनेक्टीकल बेस्ड आॅनलाइन फार्मसी फर्मन असलेल्या वॅलिसरने असं म्हटलं आहे की, हॅड सॅनिटाझरचा वापर वाढल्यानंतर बाजारात बेझेंन कमी दिसायला लागले आहे. कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणा-या घटकांमध्ये बेझेंन हे एक केमिकल असल्याचं अमेरिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं होतं. (सकाळ २५ मार्च २१) मग प्रश्न पडतो की, शेतक-यांना लुटणा-या साखर सम्राटांनी कोरोना लाॅकडाऊनच्या काळात स्वत:च्या कारखान्याचा लोगो वापरून सॅनिटायझर बनवून ते लोकांना वाटप करून सरकारच्या तिजोरीवर लाखोंचा डल्ला मारला म्हणून सांगावं वाटत की, तुम्ही कर्करोगाला बळी पडणार अन् साखर सम्राट गड्डर होणार असंच ना. कारण सॅनिटायझरमुळे कर्करोग होतो असं शास्त्रज्ञानं मत आहे.
शेवटी बहुजन समाजातील तरुण शेतकरी शेतमजूर यांना सांगणं आहे की, डाॅक्टर व राजकीय पुढारी व सॅनिटायझर बनवून कोट्यावधी रुपये कमवणारे साखर सम्राट व हातावर स्प्रे मारणारे अंधभक्त यांना कोरोना व कोरोना संसर्ग अन् सॅनिटायझर व त्यापासून होणा-या कर्करोगाविषयी प्रश्न विचारा. त्यांनी दिलेली उत्तरे योग्य वाटतात का ते बघा कारण तुम्ही जर प्रश्न विचारले नाहीत तर तुम्ही गुलाम झालेले आहात ज्यावेळी तुम्ही डाॅक्टर व राजकीय पुढा-यांना प्रश्न विचारून उत्तराची मागणी करताल तेव्हाच खरी मजा येईल कारण डाॅक्टर व राजकीय पुढारी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकणार नाहीत, कारण कोरोना खोटा म्हणून सांगावं तरी अवघड आणि खरा म्हणून सांगावं तरी अवघड अशी अवस्था डाॅक्टर व राजकीय बांडगुळांची झालेली आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा नाहीतर तुम्हाला विनाकारण पॅराॅसिटाॅमाॅलची गोळी चघळावी लागेल अन् सॅनिटायझरचा स्प्रे घेऊन कर्करोगाला बळी पडावं लागेल त्यामुळे वेळीच जागं व्हा अन् इतरांनाही जागं करण्याचा प्रयत्न करा कारण लोक झोपेचं सोंग घेऊन निवांत पडली आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.