चंदनसावरगाव ग्रामपंचायतचा मनमानी कारभार, अतिक्रमणाला देतेय आधार

सरपंचाच्या पतीने आम्हाला अतिक्रमण स्थळी न नेता जिथे आमची भेट झाली तिथेच सह्या घेतल्याचे कबूल केल्यामुळे गावचे ग्रामसेवक व सरपंच हे अतिक्रमण करणा-या व्यक्तीला पाठीशी घालून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाच्या डोळ्यात धुळ घालण्याचे काम करत आहेत हे स्पष्ट होत. म्हणून तर ही ग्रामपंचायत कार्यकरणी बरखास्त करून इथे प्रशासक नेमावा अशी मागणीही विष्णू मारूती तपासे यांनी आपल्या निवेदनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.

0 519

चंदनसावरगाव ग्रामपंचायतचा मनमानी कारभार, अतिक्रमणाला देतेय आधार

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यात असणा-या चंदनसावरगाव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचेकडून दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत मैं हू डाॅन, हम करे सो कायदा म्हणत मनमानी करत असल्याचे समोर येत आहे. या मनमानी कारभारात गावातील सरपंच, पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष हे सामिल असल्याचे दिसत असल्यामुळे या ग्रामपंचायत कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गावात होणा-या अतिक्रमणाच्या विरोधात एखादे निवेदन ग्रामपंचायतला मिळाल्या नंतर ते अतिक्रमण काढून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते. मात्र चंदन सावरगाव ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमण करणा-या व्यक्तीला पाठीशी घालून अतिक्रमणाला साथ दिली जात असल्याचे समोर येत आहे. परंतू अतिक्रमण केले नसल्याचा बनाव करत खोटा पंचनामा करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रताप सध्या ग्रामपंचायत चंदनसावरगाव येथिल गावचे प्रथम नागरिक, पोलिस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या संगनमताने होत असल्याचे दिसत आहे.

गावातील विष्णू मारूती तपसे यांनी दि. २८ जानेवारी २०२२ रोजी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे घराकडे जाणा-या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने ते अतिक्रमण काढण्याचे आदेश चंदनसावरगाव ग्रामपंचायत प्रशासनाला द्यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा लेखी इशारा दिला होता. त्यानंतर त्या निवदेनाची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालय चंदनसावरगाव यांनाही देऊन पंचायत समिती केज, व मा. तहसिलदार केज यांचेकडे निवेदन दिले होते. मग जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतकडून सदरील घटनेचा अहवाल मागितल्या नंतर ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व सरपंच यांनी जायमोक्यार न जाताच पंचानामा करून त्याचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला पाठवला. परंतू अर्जदार विष्णू तपसे यांनी सदरील पंचनाम्यावर सह्या करणा-या पंचांना तुम्ही जायमोक्यावर जाऊन अतिक्रमण पाहीले का असे प्रश्न करताच त्यांची जे उत्तर दिलं ते ऐकून या ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. कारण पंच म्हणतात की, सरपंचाच्या पतीने आम्हाला अतिक्रमण स्थळी न नेता जिथे आमची भेट झाली तिथेच सह्या घेतल्याचे कबूल केल्यामुळे गावचे ग्रामसेवक व सरपंच हे अतिक्रमण करणा-या व्यक्तीला पाठीशी घालून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाच्या डोळ्यात धुळ घालण्याचे काम करत आहेत हे स्पष्ट होत. म्हणून तर ही ग्रामपंचायत कार्यकरणी बरखास्त करून इथे प्रशासक नेमावा अशी मागणीही विष्णू मारूती तपासे यांनी आपल्या निवेदनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. पण त्यावर आजपर्यंत काहीही हालचाल न झाल्यामुळे चंदनसावरगाव ग्रामपंचायत मध्ये चाललेल्या हम करे सो कायदा या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाचा पाठींबा असावा का असा प्रश्न पडतो.

विष्णू मारूती तपसे यांनी अतिक्रमण काढण्यासंदर्भात दि. ०६ मार्च २०२३ रोजी लेखी निवेदन देऊन उपोषण व ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावण्याचा लेखी इशारा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड यांना दिला होता. पण त्यांचेकडून आजपर्यंत वतीने कोणतीच कार्यवाही न झाल्याने विष्णू मारूती तपसे यांनी ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन यांनी दिनांक १४ मार्च २०२३ रोजी पासून त्यांनी उपोषणास बसले. पण दि. १५ मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावू नये या भितीपोटी प्रशासन खडबडून जागे झाल्याने प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी अतिक्रमण आठ दिवसात काढून घेतले जाईल असे लेखी देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले.

लेखी निवेदनानूसार आठ दिवसात प्रशासनाकडून काढले जाणारे अतिक्रमण एक महीना होऊनही काढले जात नसेल तर या लेखी पत्राचा विसर पंचायत समिती, केज मधील प्रशासकीय अधिकारी यांना पडला असावा असेच वाटते. अतिक्रमणाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून हे प्रशासन कोणाला पोसत आहे ? आंदोलकांच्या रास्त मागणीकडे हे प्रशासकीय अधिकारीच दुर्लक्ष करत असतील तर न्याय मागायचा तरी कोणाकडे ? तपसे यांनी दि. ०९ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, केज यांना अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वतःला जाळून आत्महत्या करण्याच्या इशारा दिला होता, त्याची वाट हे प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत ? अतिक्रमण काढण्यासाठी सामान्यांचा बळी देण्याचा घाट हे प्रशासकीय अधिकारी पाहत असतील तर हे दुर्देव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.