मा. केंद्रीय मंत्री खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व्हिआपी रेस्ट हाऊस परळी येथे बैठक संपन्न

0 32

मा. केंद्रीय मंत्री खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व्हिआपी रेस्ट हाऊस परळी येथे बैठक संपन्न

परळी (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा जयसिंगराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी व्हीआयपी रेस्ट हाऊस चेंबरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. होऊ घातलेल्या निवडणुका तसेच मराठा आरक्षण,धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण या सह शेतकरी युवक नोकर भरती या विविध विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक परळी येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री खा. जयसिंगराव गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा व मराठा ओबीसी वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून सर्वसामान्य लोकांनी हे हाणून पाडण्याचं काम करावं. तसेच लवकरच लोकसभेच्या निवडणुका होतील कार्यकर्त्यांनी यासाठी तयार राहावं अशा सूचना सुद्धा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गीतेही यांनी परळी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसह इतर वेगवेगळ्या विषयांमध्ये सूचना दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड व राज्याचे उपाध्यक्ष बबन भाऊ गीते यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शन पूर्णपणे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते पालन करून राष्ट्रवादीच्या गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता असं काम सर्वजण मिळून करणार असा शब्द याप्रसंगी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी तालुका सरचिटणीस पदी राजेभाऊ फड, युवक तालुका उपाध्यक्षपदी गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादी किसान सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी नितीन घोडके यांच्या निवडी करण्यात आल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी अभिनंदन करून सदिच्छा देण्यात आल्या. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार,तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, कामगार सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथराव भोसले, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, तालुका सरचिटणीस राजेभाऊ फड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर शेजुळ, युवक कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे, युवक तालुका उपाध्यक्ष वृक्षराज काळे, युवक तालुका उपाध्यक्ष गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष दिलीपराव गायके, तालुका उपाध्यक्ष नितीन घोडके, भटक्या विमुक्त जमातीचे सेल अध्यक्ष तालुकाध्यक्ष गणेश देवकते, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र देवकते, ओबीसी सेल अंबाजोगाई तालुका अध्यक्ष भगवानराव वांगे, युवक नेते महादेव गीते , शरद चव्हाण, अच्युत गरड,गोविंद काळे, मुंजा भोसले, महादेव काळे, राहुल काळे ,गणेश शेळके ,रामभाऊ राडकर,योगेश सोलंकर, फुलचंदराव गिते, निकेश गिते, महेश कुडगिर, श्रीधर गुट्टे, बंडू आघाव, अनंत कचरे, अमोल माणे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.