२४ डिसेंबरपर्यंत थांबा, बोलविता धनी कोण आहे? हे लवकरच समजेल – मनोज जरांगे यांचे आमदार प्रसाद लाड यांना प्रतिउत्तर

0 137

२४ डिसेंबरपर्यंत थांबा, बोलविता धनी कोण आहे? हे लवकरच समजेल
– मनोज जरांगे यांचे आमदार प्रसाद लाड यांना प्रतिउत्तर

लातूर : मला कोणावरही बोलायचं नाही, २४ डिसेंबरपर्यंत थांबा, आमचा बोलविता धनी कोण आहे? हे तुम्हाला कळेल. थोडा दम धरा अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या प्रश्नाला प्रतिउत्तर दिले. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आक्रमक भूमिका घेऊ नये, त्यानी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न उपस्थित केला त्यावर जरांगे यांनी २४ डिसेंबरपर्यंत थांबण्याचे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे राज्यातील अनेक ठिकाणी सभाच्या माध्यमातून जनजागृती करत असताना दिसत आहेत़ या सभाच्या माध्यमातून त्यांनी आंतरवलीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस तुमच्या मनात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये कलह लावू नका, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर टीका करत त्यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न उपस्थित केला होता़
देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं, ते आरक्षण कुणामुळे गेलं? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तसेच आपला राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहीत आहे, असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केल्यामुळे मराठा समाजातील तरूण आक्रमक झाल्याचे दिसत असून ते मनोज जरांगे यांचा बोलवता धनी शोधण्यापेक्षा मराठ्यांचे हात पाय तोडण्याची भाषा करणाºया छगन भुजबळांचा बोलवता धनी कोण हे सांगावे? असा प्रश्न लाड यांना मराठा तरूणांकडून विचारला जात आहे़
फडणवीसांविरोधात बिलकूल भाष्य करू नका
तुम्ही लेकरू लेकरू म्हणत राजकीय ढेकरू द्यायला लागला आहात. देवेंद्र फडणवीसांविरोधात बिलकूल भाष्य करू नका, असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहीत आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
मंत्री छगन भुजबळ, टीपी मुंडे आणि महादेव जानकर यांचे बोलवते धनी कोण?
हिंगोल येथील ओबीसीच्या एल्गार सभेतून मराठा समाजाचे हात पाय तोडण्याची आणि कोयते दाखवण्याची भाषा करीत वडार समाजाला चोर म्हणून हिणविणाºया मंत्री छगन भुजबळ, टीपी मुंडे आणि महादेव जानकर यांचे बोलवते धनी कोण आहेत हे आधी आमदार प्रसाद लाड यांनी आधी महाराष्ट्राला सांगावे असे मराठा तरूण म्हणताना दिसत आहेत़

Leave A Reply

Your email address will not be published.