मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलता येणार – ओळखपत्रावरील फोटो ओळखू येत नसल्याने होतो नाहक त्रास

0 30

मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलता येणार
– ओळखपत्रावरील फोटो ओळखू येत नसल्याने होतो नाहक त्रास

नवी दिल्ली : सरकारने दिलेले मतदार ओळखपत्र हा महत्त्वाचा पुरावा आहे़ ते अजूनही पासपोर्टसाठी अर्ज करिता ओळख, पत्ता आणि वयाचा सामान्य पुरावा म्हणून वापरला जातो. या ओळखपत्रावर असणारा फोटो सहन ओळखू येत नसल्याने अनेकवेळा ते त्रासदायक ठरते़ मात्र आता आॅनलाइन पध्दतीने ओळखपत्रावरील फोटो बदलता येणार आहे़
यासाठी प्रथम निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर https://www.eci.gov.in/ जाऊन त्यात मतदार यादीतील नोंदी सुधारणे हा पर्याय निवडा. यामध्ये असणारा फॉर्म ८ ची निवड केल्यानंतर फॉर्म आपोआप उघडेल. यानंतर राज्य, विधानसभा आणि तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्याचे नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल़ यावर दिलेली सर्व माहिती जसे की, स्वत:चे पूर्ण नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि फोटो आयडी क्रमांक भरल्यानंतर त्यात असणाºया फोटोग्राफवर क्लिक करा़
या फॉर्ममध्ये जन्मतारीख, लिंग, आई आणि पतीचे नाव टाकल्यानंर आपला अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा. यानंतर तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर आणि स्थानाचे नाव टाकावे लागणार आहे़त्यानंतर खाली येऊन तारीख एंटर करा. ही विनंती सबमिट केल्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक संदेश प्राप्त होईल. दुरूस्ती केलेल्या तारखेपासून ३० दिवसांनी छाननीमध्ये दिसणार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.