मुख्यमंत्रीपद भगवान महाकालचा आशीर्वाद – मुख्यमंत्री निवड झाल्यानंर मोहन यादव यांच्या पत्नी व बहीणीचा दावा

0 19

मुख्यमंत्रीपद भगवान महाकालचा आशीर्वाद
– मुख्यमंत्री निवड झाल्यानंर मोहन यादव यांच्या पत्नी व बहीणीचा दावा

भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपच्या विधिमंडळ बैठकीनंतर पक्षाने मोहन यादव यांच्या नावाची निवड मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे़ यामुळे यादव कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, हा भगवान महाकालचा आशीर्वाद आहे, पक्षाचा आशीर्वाद आहे. आम्हाला त्याचे फळ मिळाले आहे.
मोहन यादव मुख्यमंत्री पदासाठी निवड केल्यानंतर त्यांच्या बहीण म्हणाल्या की, देव महाकालचा आशीर्वाद आहे, पक्षाचा आशीर्वाद आहे. तो १९८४ पासून भाजपसोबत काम करत आहे. माझा भाऊ कधी-कधी उज्जैनला यायचा. तो नेहमी महाकालची पूजा करण्यासाठी जात असे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री-नियुक्त मोहन यादव म्हणाले, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्वाचे आभार मानतो. तुमच्या प्रेम आणि सहकायार्ने मी माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Leave A Reply

Your email address will not be published.