चप्पल फेकल्याने आंदोलन स्थळावरून आ़ पडळकरांचा काढता पाय – पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक, मराठा आंदोलकाकडून पडळकर गो बॅकच्या घोषणा

0 29

चप्पल फेकल्याने आंदोलन स्थळावरून आ़ पडळकरांचा काढता पाय
– पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक, मराठा आंदोलकाकडून पडळकर गो बॅकच्या घोषणा

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. ही सभा संपल्यानंतर आमदार पडळकर हे इंदापुरातील एका आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी गेले असता मराठा बांधवांकडून पडळकर यांना जाब विचारण्यात आला. त्याच दरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हे सुरु असताना त्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्यात आल्याने ते घटनास्थळावरून निघून गेले.
इंदापूरमध्ये मागील ४७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळावी यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात असताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी काही कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या दिशेने चपल फेकल्याची घटना घडल्यानंतर पडळकरांनी तिथून काढता पाय घेतला़ मात्र त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले़

 

Leave A Reply

Your email address will not be published.