कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पतीला पडली पत्नी भारी

0 66

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पतीला पडली पत्नी भारी

 

कन्नड : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा धुमाकूळ पहायला मिळाला यात कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बीआरएस पक्षाचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. यात संजना जाधव यांचे शिवशाही शेतकरी पॅनलने या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव केला. या निवडणूकीत पतीला पडली पत्नी भारी असं बोलल जात असून या निकालामुळे येत्या विधानसभा निवडणुकीचे अंदाज काढले जात आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बाजार समिती निवडणूक ही देखील एक चर्चेचा विषय ठरली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नड येथून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने तशी तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेना मनसे या पक्षांना रामराम करून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या तेलंगणाच्या बीआरएस पक्षामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कन्नड विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात हर्षवर्धन जाधव विरुद्ध त्यांची पत्नी संजना जाधव अशी लढत होणार असल्याच बोललं जातं आहे. पण त्यापूर्वी होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि याचा निकाल काय लागतो होते. मात्र या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा संजना जाधव व माजी आमदार नितीन पाटील यांनी धुव्वा उडवला असल्याचं दिसतं आहे. कारण १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत कन्नडमध्ये संजना जाधव यांचे वर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.