रामदासी बैठक मानसिक गुलाम बनवण्याची फॅक्टरी !!

0 3,301

रामदासी बैठक मानसिक गुलाम बनवण्याची फॅक्टरी !!

 

✍️ दिलीप बाईत

कार्यकारी संपादक दै. मुलनिवासी नायक

मो. 92709 62698

 

आज कोकण पट्ट्यातील रायगड आणि रत्नागिरी, पचिश्च महाराष्ट्रात पुणे,सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यात बैठक नावाच्या प्रकाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बहुतांश कुणबी बांधव या बैठकीत जातो. बैठक म्हणजे मानसिक गुलाम करण्याचे कटकारस्थान आहे. आधीच भोळा-भाबडा कुणबी बांधव तर्क करत नाही आणि मग त्याला अशाप्रकारे नादी लावून त्याची गुलामी दृढ केली जाते. ज्या कुणबी कुळात जगतगुरू संत तुकाराम महाराजांसारखे विद्रोही संत जन्माला आले त्या तुकाराम महाराजांची गाथा वाचण्याऐवजी आमचा बांधव भटोबा रामदासाचा दासबोध वाचून गुलामीचा आनंद घेताना दिसत आहे. ज्या रामदासांनी लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला तेच रामदास सांगतात संसार करावा नेटका म्हणजे अजबच म्हणावे लागेल.

कुणबी बांधवांनी रामदासांना वाचून गुलाम बनण्यापेक्षा तुकाराम महाराज वाचावेत. संत तुकाराम महाराजांचे आंदोलन लक्षात घ्यायला हवे. संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून तुकाराम महाराज त्याचे कळस झाले आहेत. “नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस…!!” तुकाराम महाराज म्हणतात, “अभ्रद तो ब्राम्हण, जळो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली”. ज्या तुकाराम महाराजांनी ब्राम्हण हा अभ्रद आहे व त्याचे तोंडही पाहू नये  असे सांगितले, म्हणजे एका कुणबी कुळात जन्मलेल्या संताने सांगूनही आमचे कुणबी बांधव ब्राम्हण-भटोबा रामदासांचे पारायण करत आहेत. दासबोध म्हणजे दासचा अर्थ नोकर, गुलाम, चाकर असा आहे. बोध म्हणजे गुलामांसाठी केलेले मार्गदर्शन . अर्थात मार्गदर्शन म्हणणेही चुकीचे आहे.

या दासांच्या माथी रामदासाची पोथी मारून लोकांना गंडवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. रेवदंडामध्ये कुडमुड्या जोतीषाचे काम करणार्‍या नारायण धर्माधिकारी या ब्राम्हणाने बैठक नावाचा प्रकार सुरू करून लोकांना नादी लावले. एवढेच नव्हे तर दासबोध पुस्तक, लाल गंधक, फोटो, जपमाळ दासांच्या माथी मारून त्यांच्याकडून आर्थिक लुबाडणूक सुरू केली आहे. म्हणजेच रामदासी बैठक हे आर्थिक लुटीचे केंद्र आहे. मानसिक गुलाम बनवण्याची ती फॅक्टरी आहे. परंतु आमच्या कुणबी बांधवांच्या लक्षात येत नाही.

कुणबी बांधवांमधील प्रतिष्ठित लोक यामध्ये जातात. ज्यांची आर्थिक क्षमता चांगली त्यांना मानसिक गुलाम बनवण्यात आले आहे. आमच्या मंडणगडमध्ये तर शिक्षक जास्त दास झाले आहेत. त्यांना दास म्हणवून घ्यायला आनंद वाटतो. म्हणजे एकप्रकारे गुलामी एन्जॉय करत आहेत. बरं बाल बैठकीच्या नावाखाली छोट्या मुलांनाही बिघडवण्याचा प्रकार सुरू आहे. छोट्या मुलांवर जसे संस्कार कराल तसे ते बनते. आता बालवयातच रामदासाच्या दासबोधाचे (कु) बोध पाजल्याने ते बालक पुढे अस्सल दर्जाचा मोठा गुलाम म्हणून पुढे येण्याची मोठी भीती आहे. कारण मन, मेंदू, मनगटावर ताबा मिळवून त्याला गुलाम बनवले जाते.

मला तर काही लोकांची किव करावीशी वाटते की ज्या बापानं स्वत:ची पदरमोड करून मोठी केली, शिकवले त्या बापाचा फोटो घरात लावत नाहीत, परंतु धर्माधिकारी फॅमिलीचे सारे फोटो घराच्या देव्हार्‍यात ठेवलेले असतात. अर्थातच ते फोटो विकत घेऊन लावलेले आहेत. एवढेच नव्हे तर रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेटच झालेली नाही, असे असताना ज्या ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांचा गुरू रामदास म्हणून दाखवला, त्या खोट्या गुरूचे फोटो लावलेले आहेत. एकदा शिवाजी महाराजांच्या दरबारात जाऊन रामदास रडायला लागले, काय महाराज, तुमच्या परगण्यात आम्ही येऊन १५ दिवस झाले आहेत तरी तुमचे आमच्याकडे लक्ष नाही. तुमच्यासारख्या शराजाने आम्हांला सोन्याच्या मोहरा देऊन मदत करावी अशी याचना रामदासांनी केली. यावर शिवाजी महाराज म्हणाले, “हे रयतेचे राज्य असून रयतेसाठी आहे तुमच्यासारख्या गोसावड्यांसाठी नाही”. “याच्यावर लक्ष ठेवा आणि याची कफनी काढून घ्या” असा आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या पहारेकर्‍यांना दिला. खरंच रामदास शिवाजी महाराजांचे गुरू असते तर अशाप्रकारे शब्दप्रयोग केला असता का? याचे उत्तर नकारार्थी आहे. म्हणजेच रामदास हे शिवाजी महाराजांचे खोटे गुरू आहेत. शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ, शहाजी राजे यांनी मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच ते रयतेचे राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले.

बैठकीच्या नावाखाली धर्माधिकारी फॅमिलीने स्वत:ची आर्थिक उन्नती केलीच त्याचबरोबर अनेक पिढ्यांना संपणार नाही एवढी अमाप संपत्ती गोळा केली कोणाच्या जीवावर तर कुणबी बांधवांच्या. म्हणजे कुणबी बांधवाने ब्राम्हणाला मोठे करण्यात आयुष्य झिजवले मग ते रामदास असो किंवा धर्माधिकारी. दोघेही ब्राम्हणच. म्हणजेच ब्राम्हण नावाचे जे ग्रहण कुणबी बांधवाला लागले आहे ते सुटायचे नाव घेत नाही. हजारो वर्षे ते ग्रहण सुटत नाही. त्यामुळे कुणबी बांधव आजही चाचपडताना दिसत आहे. काही कुणबी बांधवांना राग येईल परखड लिहल्याबद्दल. परंतु कुणीतरी लिहायलाच हवे, बोलायलाच हवे. कारण माझ्या बांधवांनी गुलामीत रहावे असे मला तरी वाटत नाही. पहिल्यांदा ब्राम्हणांच्या मानसिक गुलामीतून मुक्त होणे गरजेचे आहे. त्यानंतर राजनितीक स्वातंत्र्य व्हायला वेळ लागणार नाही.

शेवटी मी स्वत:ला संत तुकाराम महाराजांचा वारकरी समजतो. ‘वारकरी’ म्हणजे खोट्याविरोधात वार करणे होय. हा शब्दांचा वार मि केला आहे. “जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन”. त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, “भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी”. म्हणजे आमच्या कुणबी बांधवाला जो नडतोय अशा नाठाळी लोकांवर हा वार आहे. कुणबी बांधवांनी तर्क करा आणि ब्राम्हणाला सोडा तरच तुमची प्रगती आहे. तुमचे सर्व *हक्क व अधिकार ब्राम्हण खात आहे. त्याच ब्राम्हणाला तुम्ही घरी घेऊन स्वत:चे वाटोळे करत आहात. शेवटी मला तुम्ही शिव्या देणारच आहात हे मला माहित आहे, मी देखील कुणबी असल्याने माझ्या बांधवांच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या आहेत. तुमच्या सर्व निष्ठा रामदास व धर्माधिकार्‍यांच्या चरणी वाहिलेल्या आहात. तुमच्यासाठी ते दैवत आहे असे तुम्हांला वाटत असले तरी अनेक पिढ्या बरबाद करणारी ती बैठक आहे.

एकवेळ झोपलेल्या लोकांना जागे करता येईल, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे कसे करणार? परंतु आम्ही हार मानलेली नाही. सतत निरंतर प्रचार व प्रसार करणे आणि लोकांमध्ये जागृती वाढवणे हेच आमच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. जीवावर उदार होऊन लिहावे लागते. कारण ब्राम्हणांकडे तर्क नसल्याने ते धमक्या देतात. शेवटी आपल्या जीवापेक्षा समाजाला ब्राम्हणी गुलामीतून मुक्त करणे महत्वाचे आहे. जागे व्हायचे की नाही ते ठरवा, जे जागे होतील त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणारच आहोत. विश्‍वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघासारखे जगा, आम्हांलाही वाघासारखे जगणे पसंत आहे. त्यामुळे वाघासारखे लिहले आहे…!!

Leave A Reply

Your email address will not be published.