हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर संभाजी ब्रिगेडचा झेंडा

0 381

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर संभाजी ब्रिगेडचा झेंडा

 

हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने प्रस्थापितांविरोधात नाराज गटाची मोट बांधुन शेतकरी विकास परिवर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढविली याला निवडणूकीत ना नेता ना राजा फक्त प्रजा होती होती.

या पॅनलचे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील ०६ उमेदवार विजयी झाले. संभाजी ब्रिगेडसह त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी प्रस्थापित पक्षांचा धोबीपछाड केला कारण ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ उठवलेला आवाज हाच खरा मतदानाचा विषय ठरला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्वसाधारण तर मतदारसंघात आखरे मनिष शामराव, इंगोले नारायणराव किसनराव, कदम शेषेराव साहेबराव, कोरडे माधव बळीराम, जगताप शामराव आनंदराव, जाधव दत्तराव पुंजाजी, वाबळे उत्तमराव रंभाजी तर महीला मतदार संघात डोरले सुमनबाई महादू, मटकुळे गिताबाई लिंबाजी इतर मागास प्रवर्गातून मोहनकर भिकाजी दगडूजी तसेच विजा/भज/विमाप्र मतदार संघात बांगर बालाजी दत्तराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात डोरले रवि माधवराव आणि ग्रामपंचायत अनु. जाती/अनु. जमाती मतदार संघातून कांबळे अशोक धोंडीबा हे निवडणूकीच्या रिंगणात होते त्यातील ०६ उमेदवार मनिष आखरे, माधव कोरडे, शामराव जगताप, उत्तमराव वाबळे, सुमनबाई डोरले, गिताबाई मुटकुळे हे मोठ्या मताधिक्याने विजय झाले.

मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून १०० टक्के समाजकारण आणि १०० टक्के राजकारण करण्याच्या हेतून राजकारणात उतरण्याचा निर्धार केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनलने निवडणूक लढवण्याचा निर्धार करून मतदारांमध्ये शेतक-यांच्या मालाला हमी भाव हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. त्याला मतदारांनी साथ दिल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनल मधील ०६ जण मोठ्या मताधिक्याने विजय होत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील मातब्बरांना हादरा दिला.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व मतदारांचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.