मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची बरोबरी करू शकत नाही : धनंजय मुंडे

0 8
मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची बरोबरी करू शकत नाही : धनंजय मुंडे
बीड : मी आणि पंकजा भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची बरोबरी करू शकत नाहीत, असं धनंजय मुंडे म्हणाले. ते जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र भगवान बाबा यांना बाबा म्हटल जायचं तर गोपीनाथ मुंडे यांना साहेब म्हटलं जायचं त्यामुळे मी आणि पंकजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाही, असे म्हणाले.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातल्या लोणी गावात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याच विकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अनेक व्यासपीठावरून बोलताना लोक मला भाऊ आणि पंकजा मुंडे यांना ताई म्हणतात मात्र मी आणि पंकजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी भगवान बाबा यांची बरोबरी करू शकत नाहीत आम्ही तुमची मुलं आहोत आम्हाला कोणत्याही नावाने हाक मारली तरी चालेल कारण आम्ही तुमची जबाबदारी घेतली आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिरूर तालुक्याची निर्मिती केली याच तालुक्याचा विकासाचा कळस आम्हाला चढवायचा आहे, असंही ते म्हणाले.
विकासाचा कळस चढवायचा
शिरूर तालुक्याचा विकास व्हावा आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी या तालुक्याच्या विकासाचा कळस आता आपल्याला चढवायचा आहे. शिरूर तालुक्यातील अनेक शेतकरी हे ऊसतोड मजूर आहेत, ते इतर राज्यांमध्ये कामासाठी जातात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शाश्वत पाण्याची उपलब्धी करून देऊन ऊसतोड मजुरांना ऊस बागायतदार शेतकरी बनवण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला एकत्र येऊन पूर्ण करायचं आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.