पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी राजीनामा द्यायला हवा होता – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ

0 17

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी राजीनामा द्यायला हवा होता
– वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने खळबळ
धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या विधानाने राजकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धाराशीवमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मोदींनी भारत देशात धर्माचा प्रचार, प्रसार करायला पाहिजे. पण त्याअगोदर आपण कुठल्या पदावर आहोत हे पाहायला हवे, असे म्हणाले.
रामाची प्राणप्रतिष्ठा करायला विरोध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती. मात्र, आपले पंतप्रधान पद जाईल या भीतीपोटी त्यांनी पदावर राहूनच मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा केली, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.