मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखं – ब्राह्मण समाजाची आपुलकी दाखवत राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण माने यांचे मनोज जरांगे यांचेवर टीकास्त्र

0 119

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखं
– ब्राह्मण समाजाची आपुलकी दाखवत राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण माने यांचे मनोज जरांगे यांचेवर टीकास्त्र

पुणे : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखं आहे, असे राष्ट्रवादीचे नेते पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी जरांगे पाटील हे मनुवादी आहेत अशी घणाघाती टीका करीत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाची आपुलकी दाखवत ब्राह्मण समाजाला तर का बाहेर ठेवायचं? असे म्हणाले. ते पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा मुंबईच्या दिशेने जात आहे. हा मोर्चा मुंबईला पोहोचल्यानंतर २६ जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने टीका केली आहे. माने म्हणाले, पूर्वी जेव्हा कुणबी समाजाला सवलती मिळत होत्या तेव्हा मराठा समाज आम्ही ९६ कुळी असल्याचं सांगत बाजूला राहिला. तेव्हा जर मराठा समाज कुणबी म्हणून समोर आला असता तर आता ओबीसींना जे २७ टक्के आरक्षण मिळते त्यापेक्षा जास्त आरक्षण मिळाले असते. आत्ता आहेत त्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखं असल्याचे माने म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मग छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे आणि सरदारांची घराणी यांना देखील कुणबीचं सर्टिफिकेट देणार का असा सवाल त्यांनी केला.
लक्ष्मण माने यांना ब्राह्मण समाजाची आपूलकी
उपराकार लक्ष्मण माने हे आरक्षणासंरर्भात भूमिका मांडताना म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातलं आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वाढवून द्यावं, एवढी मोठी संख्या जर ओबीसी आरक्षणात आली तर संबंध महाराष्ट्र आरक्षणामध्ये आल्यासारखं होईल. त्यामुळे मग ब्राह्मण समाजाला तर का बाहेर ठेवायचं? असे म्हणत त्यांनी ब्राह्मण समाजाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.