ॲड.दिलिप गोरे शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, महाराष्ट्र च्या “निस्वार्थी कार्यकर्ता” पुरस्काराने सन्मानित

0 681

ॲड.दिलिप गोरे शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, महाराष्ट्र च्या “निस्वार्थी कार्यकर्ता” पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई : शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, महाराष्ट्रकडून प्रत्येक वर्षी सामाजात निस्वार्थ सेवा करणार्या कार्यकर्त्यांस प्रोत्साहन म्हणून “निस्वार्थी कार्यकर्ता” पुरस्कार देण्यात येतो.२०२३ चा पुरस्कार ॲड.दिलिप गोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना देण्यात आला आहे.
ॲड.दिलिप गोरे यांनी गायरानधारकांसाठी आवाज उठविला आहे,गरजू व अत्याचार पिडितांचे मोफत वकीलपत्र घेतात, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात म्हणून त्यांना शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेना, महाराष्ट्रकडून पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार सेनेचे सरसेनापती धम्मपालसिंहराजे कांबळे सरसल्लागार गौरव करपे, प्रदेश सेनानी गोविंद गरड, प्रदेशाध्यक्ष सम्राट हिरवे, प्रदेश प्रवक्ते सागर गायकवाड, प्रदेश संघटक अभिजित गायकवाड आणि प्रदेश संघटक प्रविण शिर्के यांच्या सहमतीने देण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण बहुजन क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पाथरीकर, संविधानरक्षक धीमंत राष्ट्रपाल, लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजेश वाव्हुळे, वंचित बहुजन आघाडी चे गोविंद मस्के, नितीन सरवदे आणि शिवस्वराज्यरक्षक बहुजन सेनेचे सरसेनापती धम्मपालसिंहराजे कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.