सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा

0 64

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सायंकाळी तिरंगा पदयात्रेचे आयोजन केलें होते. मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही तिरंगा पदयात्रा सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू या महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विद्यार्थी नेते, इंटकचे अध्यक्ष बळीराम डोळे, ऍड. आम्रपाली धिवार, डापसा विद्यार्थी संघटनेचे सागर सोनकांबळे, त्रंबक हिप्परकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि तिरंगा पदयात्रा काढण्यामागचा उद्देश विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कांबळे याने मनोगताद्वारे सांगितला. पदयात्रेचे आयोजन विशाल कांबळे, माधुरी सोनवणे, रविराज कांबळे, शकील शेख, सिद्धांत जांभुळकर, हुजेफा शेख, बापूराव घुंगुरगावकर यांनी केलें होते. यावेळी सोमनाथ अंबोरे, रामदार वाघमारे, श्रीपाद एकेले, रोहित बनसोडे, मनोज सोनकांबळे, अविनाश कांबळे, सागर धुमाळ, समाधान दुपारगुडे हें विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विद्यार्थी नेते बळीराम डोळे म्हणाले, “लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता तत्वावर आपलं प्रजसत्ताक टिकलेलं आहे. संविधानातील या मूल्यांच्या रक्षणासाठी विद्यापीठासारख्या महत्वाच्या संस्थामधील विद्यार्थ्यांनी संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचं आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी संविधानाचं रक्षण करणं हा प्रजासत्ताक दिनी सर्वांनी संकल्प करू “!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तिरंगा पदयात्रेचे आयोजन केलें होते, या पदयात्रेची सुरवात सावित्रीबाईंच्या पुतळ्यापासून करण्यात आली. यावेळी हनुमंत पवार, बळीराम डोळे, सागर सोनकांबळे, अक्षय कांबळे, माधुरी सोनवणे, शकील शेख उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.