भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’

2 474

भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’

लेखक ✍️नवनाथ दत्तात्रय रेपे

मो. ९७६२६३६६६२

प्रस्तावना : डॉ. बालाजी जाधव प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड

समीक्षक
✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद- ९४२१७७४३७२

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सध्या महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गाजत असलेले एकमेव नाव म्हणजे प्रसिद्ध विद्रोही लेखक नवनाथ रेपे होय. आपल्या शब्दातून अंगार पेरणारे प्रसिद्ध साहित्यिक नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हे पुस्तक १२ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले आणि साहित्य क्षेत्रातच नव्हे तर प्रिंट मीडियामध्ये सुद्धा खळबळ उडाली. मराठी साहित्यामध्ये लेखक नवनाथ रेपे यांची सर्वच पुस्तक फार धुमाकूळ घालत आहे. आणि मनुवादी व्यवस्थेचे ठेकेदार त्यांना धमक्या देत सुटलेले आहे. त्याला कारणही तसेच आहे की लेखक नवनाथ रेपे हे कशाचीही मुरवत करत नाही, ते सरळ सोट लिहितात. त्यांच्या प्रत्येक शब्दातून ज्वालामुखी निघते. आणि हजारो वर्षापासून सुरू असलेल्या वैदिक संस्कृतीवर डायरेक्ट प्रहार करते. नुसते प्रहार करून थांबत नाही तर ते आपल्या लेखणीतून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतात. अनेक संतांची वचने या पुस्तकात मांडून त्यावर समीक्षात्मक विश्लेषण करून ते बहुजनांना पटवून देतात की ढोंगी बुवा-बापू कसे आपल्याला लुबाडतात. नुकतेच त्यांनी समीक्षा करिता ‘संत बन गये भोगी!’ हे पुस्तक मला आठवणीने पाठवले. पुस्तक वाचल्यानंतर मी थक्क झालो. कारण त्यामधील जी भाषा आहे ती भाषा म्हणजे मरगळ आलेल्या माणसालाही हातामध्ये तलवार देणारी आहे. खरंच हे पुस्तक बहुजनांच्या प्रत्येक घरामध्ये जर पोहोचले तर एका फटक्यात बहुजन समाजातील अंधश्रद्धा नष्ट होईल असे माझे प्रामाणिक मत आहे. हजारो वर्षाच्या अंधश्रद्धेच्या बेड्या ताडकन झटकणारे हे अनमोल पुस्तक प्रत्येकांनी खरेदी करून वाचायलाच पाहिजे. माणसाचा मेंदू जागा असेल तर बुवा बापू आणि पोटभऱ्या कीर्तनकारांमध्ये संत नव्हे तर मनुवादी जंत दिसतो मात्र मेंदू नसलेल्यांना या बुवा बापूमध्ये बाप शोधण्याची कला आहे. त्याला मी करणार तरी काय? हे किडे खिसेकापू पोटभर या कथा कीर्तनकारांना संतांची उपाधी देत उरावर घेऊन पारावर मिरलण्यासाठी स्पर्धा करतात. अशाप्रकारे आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी संत बन गये भोगी या पुस्तकांमध्ये भोंदूगिरी करणारे लबाड आणि ढोंगी संतांची पोलखोल केलेली असून तमाम बहुजनांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारा विज्ञानवादी मार्ग दाखवलेला आहे.
आज महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर शाळकरी कमी आणि टाळकरी जास्त अशीच परिस्थिती सर्वीकडे दिसून येते. त्यामुळे दिवसेंदिवस बहुजन समाजामध्ये जे अंधश्रद्धा वाढवण्याचे काम गावामध्ये अर्धज्ञानी बुवा बापू करत आहे. त्यावर त्यांनी प्रचंड शाब्दिक प्रहार करून बहुजनांना जागवण्याचे काम करण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे.

“नवनाथ रेपे तुमची लेखणी समशेरीपेक्षा कमी नाही”  संदीप हरिश्चंद्र गायकवाड क्रांती नगर, आंबेडकर चौक आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व मुंबई.

धर्म पक्ष नेता बुवाबाबांचे कर्दनकाळ मनुवादी पिलावळींची डोकेदुखी असलेले नवनाथ रेपे – नंदकिशोर भारसाकळे

‘जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे! बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा!’
या तुकोबारायांनी सांगितलेल्या अभंगाप्रमाणे आजचे साधुसंत वागतात का हाही प्रश्न त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये उपस्थित केलेला आहे. या पुस्तकातील लेख मालिकेत बागेश्वर की भगेंदर?, मेंढ्यांच्या लेंड्या खाणाऱ्या भक्तांनो जागे व्हा.!, बुवाबाजी ही सामाजिक कीड आहे!, संत बन गये भोगी!, पट्टेबहाद्यरांना नामदेव- तुकोबा समजलेत का?, वारकरी संप्रदायात बाजारबुणग्यांची घुसखोरी?, कपाळी टिळा टोपी, तो कसला कीर्तन करी?, पतंजली जीन्स हवी कशाला?, बाईने लावली बुडाला आग, हभप मस्के कीर्तनकार की नर्तनकार?, आसाराम सुटला, मोर्चेकरांच्या घरात घुसला?, साऱ्या मूर्ख कथा! आंधळ्याची गीता !, परशु’राम’ रहीम आसा’राम’दास म्हणे चालत नाही का? पोटात मद्याचे घोट आणि तोंडात धर्माचे बोट, दैवी शक्तीवर विश्वास ठेवतो तो मूर्ख?, अध्यात्माच्या मार्गावर धक्के आणि मुकेच कसे? ब्राह्मणांचे ग्रंथ मांजराची विष्ठा!, मायेचे मस्तक छाटणारा आमचा आदर्श कसा?, वेदासी विटा शास्त्रासी विटाळ पुराणे अमंगळ विटाळाची!, कुरघोड्या आणि फोडाफोडीत कामाख्याचा हात?, दंतकांतीवाले सकाळ सकाळीच मटणहाणती., सोंगदेव बाबा की रामदेवबाबा? अशी एक से एक सरस प्रकरणे या पुस्तकांमध्ये असून एकदा पुस्तक हातात घेतले की ते वाचल्या वाचून सोडता येत नाही. एवढी वैज्ञानिक जादू या पुस्तकात लेखक नवनाथ रेपे यांनी संताचे अनमोल वचनासह पेरलेली आहे. हे पुस्तक वाचकांना वेड लावणारे आहे. प्रसिद्ध विचारवंत तथा प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड डॉ. बालाजी जाधव यांनी या पुस्तकाची सुंदर प्रस्तावना केलेली आहे . पुरोगामी महाराष्ट्राला भोंदूगिरी करणाऱ्या बऱ्याच बुवा-बापु आणि लबाड संतांनी बहुजनांना अंधश्रद्धेकडे नेण्याचे आटोकाट प्रयत्न करत असताना लेखक नवनाथ रेपे यांनी संत नामदेव संत, सावता महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार या संत मंडळी सोबतच वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इत्यादी महान संतांच्या अनमोल आणि विज्ञानवादी दृष्टिकोन पुस्तकाच्या प्रत्येक पानात पेरण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेला आहे. लेखक नवनाथ रेपे यांची भाषा म्हणजे आरपारची. प्रत्येक शब्दात ज्वालामुखी कशाचीही भीड मुरवत नाही. अगदी कमी वयामध्ये आपल्या शब्दातून अंगार पेरणारा हा विद्रोही लेखक दिल, दोस्ती आणि दुनियादारी मधला मस्त कलंदर आहे. अंधश्रद्धे मध्ये बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानाकडे नेण्याचा प्रकाशमय मार्ग लेखक नवनाथ रेपे यांनी ‘संत बन गये भोगी!’ या पुस्तकात मांडलेले असून ‘संत बन गये भोगी!’ हे पुस्तक तमाम बहुजनासाठी एक प्रभावी हत्यार बनलेले आहे. ‘संत बन गये भोगी!’ हे पुस्तक आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक व प्रेरणा देणारे तर आहेच परंतु विज्ञानवादी बनवणारे आहे. कारण आज खेडोपाडी आणि गावोगावी धार्मिक परंपरेचा आणि कथेचा ऊत आलेला असताना तमाम तरुणांना त्यामध्ये न डुबता बाहेर निघण्याचा मार्ग लेखकांनी अनेक संतांच्या वाणीचे दाखले देऊन फार चांगला प्रयत्न केलेला आहे. जे कीर्तन करतात काही भागवत करतात परंतु त्यांच्या कीर्तनातून आणि भागवतातून समाजामध्ये जर अंधश्रद्धा पसरत असेल तर ते कसले संत? असा प्रश्न लेखक नवनाथ नवनाथ रेपे आपल्या पुस्तकात उपस्थित करून तमाम बहुजनांना ते सांगतात की, तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका तुमच्या बुद्धीला पटत असेल तेच करा. आपल्या रूढींपरंपरा जर त्या विकासाकडे नेत नसेल तर त्याचा त्याग करा आणि कर्मकांडातून बाहेर पडा असाच नारा त्या प्रत्येक लेखातून देतात. आज बहुजन समाजाची बिकट अवस्था पाहून लेखक नवनाथ रेपे तळमतात. ही अंधश्रद्धेची बजबजपुरी आणि ढोंगी बुवा बापू यांची कपटनिती पाहुन राग तळपायातून मस्तकात जातो. अंधश्रद्धा आणि कर्मकांड हे हजारो वर्षापासून मनुवादी व्यवस्थेने तमाम बहुजनावर लादलेले असताना लेखक नवनाथ रेपे सारखा एक भिमसैनिक आपल्या हातामध्ये लेखणी घेऊन त्याचा तलवारीसारखा वापर करतो आणि तमाम बहुजनांना जागवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लेखक नवनाथ रेपे हे अभिनंदनास पात्र ठरले आहे. लेखक नवनाथ रेपे यांची लेखन शैली म्हणजे हजारो वर्षाची मनुवादी चौकट आणि बेधुंद बेलगाम झालेल्या सनातनी व्यवस्थेला उध्वस्त करण्याची त्यांच्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे. आज धार्मिकतेच्या नावावर तमाम बहुजनांना वेगवेगळ्या प्रकारे लुटल्या जात आहे. ढोंगी लबाड आणि भोंदूगिरी करणारे साधू बुवा-बापू हे राजरोसपणे समाजात अंधश्रद्धा फैलावत आहे. त्यावर आज कोणीही बोलायला तयार नाही. त्यासाठी आपली सर्व शक्ती एकवटून लेखक नवनाथ रेपे सारखा दमदार आणि तरूण तडफदार एक शिवसैनिक पुढे आलेला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते पत्रकारी करतात आणि पत्रकारीच्या माध्यमातून आपली विद्रोही लेखणी ते घराघरांमध्ये पोहोचण्याचे काम करत आहे.ही बहुजन समाजासाठी फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. सत्य सांगोनी जरी कडू लागे या उक्तीप्रमाणे ते सतत सत्य लिहितात आणि यामधूनच ‘संत बन गये भोगी!’ या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. हजारो वर्षापासून देवाधर्माच्या नावावर तमाम बहुजनाची फसवणूक सुरू आहे. हे आपण उघड्या डोळ्यांनी दररोज पाहतो. देवा धर्माची भीती दाखवून सत्यनारायण, होम-हवन, पूजा-अर्चा, संकट- चतुर्थी अशा अनेक प्रकारचे खर्चिक बाबीकडे ढोंगी साधुसंत बहुजनांना वळवतात. त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांना त्यामधील काही गोष्ट कळत नाही. त्यांना देवा धर्माची भीती दाखवून राजरोसपणे लुबाडल्या जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी आपल्या जीवाची परवा करता नवनाथ रेपे यांनी आपल्या हातामध्ये पेन घेतलेला असून त्याचा ते तलवारी सारखा उपयोग करत आहे. आणि आपणास माहित आहे पेन हा तलवारीपेक्षाही दुधारी तलवार आहे. आज शिकलेली सवरलेली उच्चशिक्षित मंडळी एसीच्या बंगल्यामध्ये राहून आपले आयुष्य ऐसौआरामात जीवन जगत आहे. परंतु त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच चुकीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये छोट्याशा नोकरीवर असलेला हा मोठा आणि हिम्मतवान लेखक आपल्या लेखणीने तमाम बहुजनांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्राण पणाला लावण्यासाठी तो धडपडतोय. हीच तमाम बहुजनासाठी फार मोठी उपलब्धी मानावी लागेल. माझं घर माझं वावर आणि माझी शेती या पलीकडे लोक जायला तयार नाही. परंतु लेखक नवनाथ रेपे आपल्या कुटुंबाचा, नोकरीचा भार सहन करत करत तो विज्ञानवादी विचार तमाम बहुजनांच्या पुढे ठेवण्यासाठी अहोरात्र झटत आहे. लेखक नवनाथ रेपे यांनी ‘भट बोकड मोठा’, ‘संविधानाच्या पडद्याआड, संघोटयांचा लिंबू’ व ‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!’ आणि आता ‘संत बन गये भोगी!’ हे चार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात खळबळ उडून दिलेली आहे. त्यामुळे ते आज मराठी साहित्यातले नामदेव ढसाळच आहे.

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’

नवनाथ रेपे म्हणजे मृत्यूची भीती दाखवणाऱ्यांना भिक न घालता कर्मकांडाचा बाजार उठवणारे नेतृत्व – किरण मराठे

नवनाथ रेपे यांच्या लेखणीत नामदेव ढसाळांचा विद्रोह शत्रुघ्न जळबा वाघमारे संपा. साप्ताहिक झुंज संघर्षाची देगलूर जि. नांदेड

‘बुडती हे जग न देखे डोळा म्हणूनी कळवळा येत असे!’ जणू काही हा अभंग नवनाथ रेपे यांचा साहित्य स्वभाव होऊन बसलेला आहे. त्यामुळे ते सरळ सोट लिहितात आणि बुवाबाजी कर्मकांड, अनाचार भ्रष्ट व्यवस्थेवर त्यांच्या पुस्तकातून प्रहार केलेला आहे. खरं तर हे पुस्तक अभ्यासक्रमात यायला पाहिजे. आज जग विज्ञानाकडे जात असताना मात्र आपण थाळ्या आणि टाळ्या वाजवत आहोत. दिवे लावत आहोत. त्यामुळे आपली प्रगती कदापि होणार नाही. जर प्रगतीच करायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात अंधारातून प्रकाशाकडे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माणसाचा विकास शिक्षणाशिवाय होत नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब म्हणतात शिक्षण शिक्षण आणि शिक्षण! म्हणून मी या ठिकाणी विशेष नमूद करू इच्छितो की नवनाथ रेपे सारख्या विज्ञानवादी लेखकाची पुस्तके अभ्यासक्रमाला अभ्यासली जावी. जेणेकरून नव समाज निर्माण होईल! पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीत तमाम बहुजनावर धार्मिकतेचा पगडा टाकून त्यांना शिक्षणापासून दूर लोटण्याचा प्रयत्न होत असताना महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी नाळ जोडणारे हे पुस्तक प्रत्येक बहुजनासाठी प्रेरणादायी आहे. स्पर्श हा शब्दापेक्षा चांगल्या रीतीने दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकतात .अगदी त्याचप्रमाणे लेखक नवनाथ रेपे यांनी शब्द योग्य रीतीने ‘संत बन गये भोगी!’ या पुस्तकात वापरलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करिता ‘संत बन गये भोगी!’ हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल. लेखकाला मनभर शुभेच्छा!

संत बन गये भोगी ! हा ग्रंथ म्हणजे रेशीम बागेच्या अजेंडयावर भीमप्रहार आहे. – प्रा.डॉ. आर. जे. इंगोले, जि.नाशिक.

पुस्तकाचे नाव : संत बन गये भोगी!
लेखक : नवनाथ दत्तात्रय रेपे
प्रकाशन : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
पृष्ठे : १४४
किंमत : १५० रूपये

फोन नंबर : ९७६४४०८७९४

संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू गुलामगिरीच्या बेड्या तोडणारे पुस्तक संकलन:- प्रा.संभाजी जाधव जिल्हा सहसचिव मराठा सेवा संघ, लातूर

मराठा आरक्षणाचा खरा शत्रू कोण ? दिपक इंगळे यांचे मार्गदर्शन

2 Comments
  1. Vinod Ram Shegokar says

    मूळ निवासी नाग वंशीय भारतीय नागरिक शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा…

    1. Gramonnatti says

      Thank You

Leave A Reply

Your email address will not be published.