नवनाथ रेपे म्हणजे मृत्यूची भीती दाखवणाऱ्यांना भिक न घालता कर्मकांडाचा बाजार उठवणारे नेतृत्व – किरण मराठे

0 126

नवनाथ रेपे म्हणजे मृत्यूची भीती दाखवणाऱ्यांनाही भिक न घालता कर्मकांडाचा बाजार उठवणारे नेतृत्व – किरण मराठे

संविधानाच्या संघोट्यांचा लिंबू, भट बोकड मोठा व डोळ्यात माणसांच्या फेकुन धुळ गेला ..! या तीन अशा बहुचर्चित पुस्तकांचे लेखक नवनाथ दत्तात्रय रेपे..! आजच्या घडीला निडर, परखड, वास्तववादी आणि सत्य अशी ओळख असणारे पत्रकार म्हणून ज्यांनी अल्पावधीत ख्याती निर्माण केली. पत्रकारिता म्हणजे नेमके काय ते आज काही पत्रकारांनी नवनाथ सर यांच्याकडून शिकावे. पत्रकारिता म्हणजे फक्त आपले दीड फूट पोट भरण्याचे साधन नव्हे तर, अनेक गोरगरीब, शोषित, पीडीत, वंचित घटकांसाठी न्याय मिळावा म्हणुन प्रसंगी आपल्या पोटाला उपासमारीची वेळ आली तरीही पिडितास न्याय मिळावा म्हणुन सरकार आणि सरकारी यंत्रणा, राजकीय प्रतिनिधी यांना धारेवर धरण्याचे कार्य कसे करावे हे चाटुकार पत्रकारांनी रेपे यांच्याकडून शिकावे. नवनाथ रेपे म्हणजे माझ्या वैयक्तिक मतानुसार महाराष्ट्रातले रवीश कुमार म्हणायला काहीच हरकत नाही. नवनाथ रेपे म्हणजे मृत्यूची भीती दाखवणाऱ्यानाही भिक न घालणारे, शोषितांची परखड बाजु मांडणारे, धर्माचा व कर्मकांडाचा बाजार मांडणाऱ्यांचा बाजार उठवणारे, बहुजनांच्या मनातील विचारांचा गोंधळ प्रमाणासहित दूर करणारे, ब्रुसली सारखी काटक शरीरयष्टी असणारे, बुद्ध, शिव,शाहू,फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड न करणारे नाव म्हणून नवनाथ रेपे यांची ओळख निर्माण होत आहे.
बुध्द, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड न करणारे विद्रोही विचार म्हणजेच विद्रोही लेखक, पत्रकार नवनाथ रेपे होय…! अशा विद्रोही लेखकास जन्मदिनाच्या उदंड आयुष्याच्या आरोग्यदायी व मंगलमय शुभेच्छा…!!

शुभेच्छुक
किरण रोहिदास मराठे
धुळे.

Leave A Reply

Your email address will not be published.