अशा घटना या पुढं होऊ नये शाहू महाराज

0 52

अशा घटना या पुढं होऊ नये शाहू महाराज

 

कोल्हापूर  : सोशल मीडिया स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर काल कोल्हापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी हिंदुत्त्वादी संघटनांचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्या दरम्यान शहरात पुन्हा दगडफेक झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रसंगी लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर केला होता. कोल्हापूरमधील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत असताना शाहू महाराज छत्रपतींनी जे झालं ते झालं पण यापुढं सर्व समाज सलोख्यानं राहतील आणि अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आता अलीकडच्या काळात दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा झालेलं आहे, एवढं यापूर्वी कधी झालेलं नव्हतं. याच्या मुळात जाऊन कारण काय आहे हे बघितलं पाहिजे. नेहमीच्या दृष्टिकोनातून न पाहता, मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं पाहिजे, अशी मानसिकता का तयार होते, हे बघितलं पाहिजे, कायदा व सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी शासनाची असते, गृह खात्याची असते. त्यांनी यासंदर्भात रिपोर्ट बघितलं पाहिजेत. अशा घटना या पुढं होऊ नये, असं त्यांनी सांगितलं. संभाजीनगर, अहिल्यानगरला झालंय, नाशिकला झालंय. या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध आहे की वेगवेगळ्या आहेत, हे पाहिलं पाहिजे, असं शाहू छत्रपती म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.