धर्म पक्ष नेता बुवाबाबांचे कर्दनकाळ मनुवादी पिलावळींची डोकेदुखी असलेले नवनाथ रेपे – नंदकिशोर भारसाकळे

0 93

धर्म पक्ष नेता बुवाबाबांचे कर्दनकाळ मनुवादी पिलावळींची डोकेदुखी असलेले नवनाथ रेपे – नंदकिशोर भारसाकळे

 

आज दिनांक 07.06.2023 रोजी विद्रोही लेखक नवनाथ दत्तात्रय रेपे (बीड )यांचा जन्मदिवस. नवनाथ रेपे म्हणजे सत्यशोधक व्यक्तिमत्व त्यांनी आजपर्यंत आपल्या प्रखर लेखणीतून जवळपास 200 पेक्षा क्रांतीकारी लेखांचं लिखाण पुर्ण केलं आहे. त्यांच्या लिखाणातून ते बुद्ध शिव फुले शिव शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात नेहमी पेरत असतात. ते आजघडीला जाती धर्म भ्रष्टाचारी पक्ष आणि त्यांचे नेते, बुवाबाबा यांचे कर्दनकाळ मनुवादी असून त्यांची लेखणी मनुवादी पिलावळींसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नवनाथ दत्तात्रय रेपे हे ग्रामोन्नती या न्यूज पोर्टलचे संपादक असून त्यांनी आपल्या कमी वयात व्यवसाय नोकरी करत समाज प्रबोधनाचे काम करतात. त्यांनी २०२० साली रेशिमबागेच्या मानगुटीवर हातोडी मारत सिंदखेडराजा येथे ‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर २०२१ साली “भट बोकड मोठा” या पुस्तकाची निर्मिती करत इथल्या बहुजन समाजाला त्यांच्या दुश्मनाची ओळख करून दिली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून लोकांच्या डोळ्यांत अंगूरा फेकून इव्हीएम मशिनला गाभण करून मनुवादी व्यवस्थेने पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी “डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!” हे पुस्तक लिहून या व्यवस्थेच्या पृष्ठभागावर आसूड ओढण्याचे काम केले. अशा या निडर व निर्भीड व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.