शेतकºयांसाठी विदेश अभ्यास दौरा जाहीर – अर्ज दाखल करण्यासाठी ता. तीन फेब्रुवारीपर्यंत मुदत

0 53
शेतकºयांसाठी विदेश अभ्यास दौरा जाहीर
– अर्ज दाखल करण्यासाठी ता. तीन फेब्रुवारीपर्यंत मुदत
नांदेड : कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी विदेश अभ्यास दौरा जाहीर करण्यात आला असून याबाबत अर्ज दाखल करण्यासाठी ता. तीन फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत विविध देशांनी विकसित केलेली शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकºयांनी केलेला अवलंब त्याद्वारे त्यांचे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या – त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी घेण्यात येणार आहेत.
तसेच तेथील संस्थांना भेटीद्वारे शेतकºयांच्या ज्ञान व क्षमता उंचविण्यासाठी राज्य पुरस्कृत योजना २०२३-२४ अंतर्गत राज्यातील शेतकºयांचे देशातील अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. कागदपत्रांची पुर्तता होत असलेल्या शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाकडे संपर्क करुन  आवश्यक कागदपत्रासह ता. तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
३४ जिल्ह्यातून प्रत्येकी तीन जणांची निवड
विदेश अभ्यास दौºयासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यातून प्रत्येकी तीन यानुसार १०२ व राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार १८ असे एकूण १२० शेतकरी व सहा अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील निवड प्रक्रिया पुर्ण करुन ता. पाच फेब्रुवारीपर्यंत शेतकरी याद्या कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्याचे निर्देश असल्याचे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.