संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू  गुलामगिरीच्या बेड्या तोडणारे पुस्तक

मध्यंतरी सरकारने संख्यावचनात बदल करून बत्तीस ऐवजी तीस दोन म्हणा, असा अफलातून फतवा काढला होता.त्यावर नवनाथ रेपे यांनी शेवटचे प्रकरण मोठे मजेशीर लिहिले आहे. ते लिहितात, नव्या नियमानुसार युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ऐवजी युगे वीस आठ विटेवरी उभा.... असे म्हणावयाचे का ? किंवा सोळावं वरीस धोक्याचं..... या ऐवजी दहा सहा वरीस धोक्याचं.... असं म्हणावं का ? मुलांच्या डोक्याचं भरीत करून टाकणारी ही कल्पना ज्याने काढली त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, हा प्रकार पाहून चीड येते.

2 637

संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

 गुलामगिरीच्या बेड्या तोडणारे पुस्तक

संकलन:- प्रा.संभाजी जाधव
जिल्हा सहसचिव
मराठा सेवा संघ, लातूर
—————————————
पुरोगामी विचारवंत नवनाथ रेपे यांचे ‘ संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. या पुस्तकात देव, धर्म, ईश्वर, श्रद्धा- अंधश्रद्धा, भोळसट भक्त, देशाला मागे खेचणारे रोगट मनोवृत्तीचे तथाकथित पुढारी यांची कठोरपणे चिकित्सा केली आहे. हे पुस्तक छोटे असले तरी विचार करायला भाग पाडते.
ऋग्वेद हा जगातील पुरातन ग्रंथ मानला जातो. परंतू ऋग्वेदामध्ये चार्वाकाची निंदा आहे. म्हणजेच चार्वाकाचे तत्वज्ञान वेदाहूनही प्राचीन आहे. त्यामुळे लोकायत धर्माला आद्यधर्म म्हटले जाते. चार्वाक म्हणजे सुंदर विचार अथवा वाणी ! त्याकाळी पुरोगामी विचार मांडणारे अनेक चार्वाक पंथीय विचारवंत होऊन गेले. म्हणून नंतरच्या काळातील चार्वाकांनी वेद हे धुर्त निशाचरांनी लिहिले आहेत असे विधान केले.
‌‌देव आणि धर्माच्या नावावर गेल्या शेकडो वर्षांपासून दुकानदारी सुरू आहे. नवनाथ रेपे हे त्यांच्या पुस्तकात संदर्भ देऊन लिहितात, ‘देशभरात जेवढी मंदिरे आहेत, त्यांचा वार्षिक ताळेबंद देशाच्या अर्थसंकल्पाच्या दहापट आहे. आज सगळीकडे गरिबी, दुष्काळ, शिक्षण, आरोग्य यांचे प्रश्न भेडसावत आहेत, तरीही मंदिरातील पैसा बाहेर काढला जात नाही. दानपेट्या दरसाल फुगत चालल्या आहेत. त्याचवेळी गोपाळ बडवे यासारख्या तिर्थकुंडात लघुशंका करणा-या बडव्यांची मुजोरी वाढत आहे.’ त्यामुळेच स्टिफन हॉकिंग म्हणतात,” मला ईश्वराचे एवढे भय वाटत नाही तेवढे ईश्वर मानना-या लोकांचे वाटते.” हे ‌वाक्य चिंतनीय नक्कीच आहे.
देवधर्माचा संस्कार बालमनावर बिंबवला जातो. द गॉड डिल्युजन या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स म्हणतात,” मुलांना आर्थिक शिक्षण अजिबात देऊ नये.‌ धर्म शिकवायचा असल्यास सर्व धर्मांची तुलना शिकवायला पाहिजे.म्हणजे प्रत्येक धर्मात काय सांगितले आहे हे त्यांना कळेल.”
नवनाथ रेपे लिहितात, सरकारने हजारो शाळा बंद केल्या. शिक्षणाचे बाजारीकरण केले याकडे शासनाचे लक्ष नाही. त्याऐवजी हिंदूराष्ट्र, मंदिर- मस्जिद, मुर्ती, गाय – गोबर हे निरर्थक विषय त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. याला कारण या देशाचे नासलेले राजकीय नेते आहेत. न्युझिलंडचे प्रसिद्ध विचारवंत प्रा. ब्रायन भारतीय लोकांबद्दल म्हणतात, भारतीय लोक आत्मकेंद्रित आहेत. भारतात भ्रष्टाचार असण्याचे कारण म्हणजे धर्म हा व्यवहार झाला आहे. लोक देवाला यासाठी दान देतात की त्याच्या बदल्यात काहितरी मिळवण्यासाठी अयोग्य लोकांना काहितरी द्यावे लागते. देवालयात अशाचप्रकारे दानपेटीत लाच दिली जाते. संघोट्यांच्या लिंबूवर प्रकाश टाकताना लेखक म्हणतात, फ्रांसने भारताच्या ताब्यात पहिलं राफेल दिलं तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कुंकवाच्या बोटाने ओम काढलं आणि त्या विमानाच्या चाकांखाली दोन लिंबे ठेवण्यात आली. तेव्हा प्रश्न पडतो की, एका निधर्मी राष्ट्राचे संरक्षणमंत्री आहेत की एखाद्या ढोंगी बाबाचे शिष्य ? ‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲटोमिक फिजिक्समध्ये सुवर्ण पदक मिळविल्याची थाप मारणा-या अंबाछाप मनोहर भिडेंचे धोतर ‌धुवून चांगलेच वाळत घातले आहे. अंबाफेम भिडेचे बेताल वक्तव्य उभ्या महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे. अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयानाची मोहीम केली म्हणून ती यशस्वी झाली असे म्हणणारा किंवा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणा-या भिडेवर दोन प्रकरणे लिहून त्याचे बिंग उघडे पाडले आहे.


‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकात लेखक वाचकाला विचार करायला भाग पाडतात. कारण ते म्हणतात की, भारतातील इस्त्रोने पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने सोडलेले चांद्रयान पृथ्वीवरून कंट्रोल होत असेल तर या देशात सार्वत्रिक निवडणुकीत वापरली जाणारी EVM मशीन एखाद्या रूममध्ये बसून कंट्रोल होत नसेल काय ? असा प्रश्न विचारुन त्यांनी चिकित्सेची दारे उघडायला लावली.
धर्मचिकित्सेबरोबर या पुस्तकात शेतक-यांच्या प्रश्नाला हात घातला आहे. शेतीमालाला दीडपट भाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे सांगणा-या सरकारची लबाडी चव्हाट्यावर आणली आहे. त्यासाठी तरुणांनी डोक्यात विचारांची आणि हातात क्रांतीची मशाल घेऊन एल्गार पुकारला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले आहे.
तरुणांना संदेश देताना ते नवनाथ रेपे म्हणतात, तरुणांनी मंदिरांकडे कानाडोळा करून आपले शिक्षण, व्यवसाय यात प्रगती केली पाहिजे. कारण तरुणाईला भगवा, निळा, हिरवा, पिवळा अशा धार्मिक रंगात खेळवले जाते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


मध्यंतरी सरकारने संख्यावचनात बदल करून बत्तीस ऐवजी तीस दोन म्हणा, असा अफलातून फतवा काढला होता.त्यावर नवनाथ रेपे यांनी शेवटचे प्रकरण मोठे मजेशीर लिहिले आहे. ते लिहितात, नव्या नियमानुसार युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ऐवजी युगे वीस आठ विटेवरी उभा…. असे म्हणावयाचे का ? किंवा सोळावं वरीस धोक्याचं….. या ऐवजी दहा सहा वरीस धोक्याचं…. असं म्हणावं का ? मुलांच्या डोक्याचं भरीत करून टाकणारी ही कल्पना ज्याने काढली त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, हा प्रकार पाहून चीड येते.
नवनाथ रेपे यांनी आपल्या संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू यापुस्तकात अनेक संतांचे, विचारवंतांचे दाखले दिले आहेत. त्यामुळे एक अभ्यासू, चिकित्सक लेखक म्हणून त्यांची दखल घ्यावीशी वाटली.

जय जिजाऊ जय शिवराय जय भिम !

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील 

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क : रूक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

rukmaipub@gmail.com

मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४

2 Comments
  1. Ravindra ingale says

    Nice message from this book…keep it up

  2. Ravindra ingale says

    I like because ….realty shown by writer here

Leave A Reply

Your email address will not be published.