नवनाथ रेपे यांच्या लेखणीत नामदेव ढसाळांचा विद्रोह

0 453

नवनाथ रेपे यांच्या लेखणीत नामदेव ढसाळांचा विद्रोह

✍🏻 शत्रुघ्न जळबा वाघमारे
संपा. साप्ताहिक झुंज संघर्षाची
देगलूर जि. नांदेड

नवनाथ रेपे साहेब आपण आपल्या ‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !’ या पुस्तकातील प्रत्येक लेखात संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे. ते वाचल्यास तर मला कधी कधी मला तुमच्यात नामदेव ढसाळ दिसून येतो. नामदेव ढसाळ यांच्या कविता, लेख माणसातील माणुसकी व माणसाला माणूस पण मिळवून देण्यासाठी अत्यंत आक्रमक  लिखाण, आणि जातीयवादी, धर्मवादी व्यवस्थेच्या विरोधात बंड करायचे व आपल्या लेख साहित्यातून सडेतोड मांडायचे. नामदेव ढसाळ साहेब जी विद्रोही मांडणी करायचे तीचे रूप हे नवनाथ रेपे यांच्या रूपाने पाहतो आहे, हे माझ स्वतःच व्यक्तिगत मत आहे.

नवनाथ रेपे म्हणजे मृत्यूची भीती दाखवणाऱ्यांना भिक न घालता कर्मकांडाचा बाजार उठवणारे नेतृत्व – किरण मराठे

धर्म पक्ष नेता बुवाबाबांचे कर्दनकाळ मनुवादी पिलावळींची डोकेदुखी असलेले नवनाथ रेपे – नंदकिशोर भारसाकळे

राज्यातील स्वःताला पुरोगामी म्हणून घेणारे इथले बाजारबुजगावणे नेते व त्यांनी जो परिवर्तनाचा खोटा मुखवटा धारण केला आहे त्या ढोंगी समाजवाद्याचा बुरखा टरा टरा फाडण्याचे काम नवनाथ रेपे आपण आपल्या लेखणीने करीत आहात. दलीत साहित्यातील  बंडखोर लेखकांची आठवण आपल्या लिखाणातून आठवते . मॉसाहेब जिजाऊंचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खरे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक क्रांतीचे जनक छत्रपती शाहू महाराज इत्यादी महापुरूषांच्या अंथाग महासागराचा ज्ञानरूपी भंडार सर्वत्र दरवळतो आहे त्या सुगंधाच्या जोरावरती नवनाथ रेपे  साहेब तुमच्या लेखनीला धार आली आहे ती आता कदापीही बोथट होवू देऊ नका. कारण महामानवाच्या विचारांची आज निंतात गरज आहे. धर्मवेडे पणात, कर्मकांडात उच्च निच्चतेने बुरसटलेल्या जुनाट चालीरीतीत व रुढीपरांपरेत  चिटकवून बसलेल्यांना व बेंडका सारखे चिखलात बुडालेल्यानां  आपल्या धगधगत्या शब्दरुपी हंटरची खरच गरज आहे, नितांत गरज आहे. आपण आपल्या पुस्तकातील लिखाणात व प्रत्येक लेखात जे संदर्भासहित स्पष्टीकरण देत आहात याला तोडच नाही. त्यामुळे आपल्या लेखनीचे मनापासून अभिनंदन करतो.
आजही महाराष्ट्रात मागासवर्गीयांची ससेहोलपट होत आहे, कधी जातीच्या आधारावर तर कधी धर्माच्या आधारावर , मागासवर्गीय समाजातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कधी तीची अब्रू लुटल्या जाते तर कधी  वर्णव्यवस्थेच्या ठेकेदारांकडून अत्याचार केला जातो. देव धर्म संस्कृती या वेडेपणातच स्वताला आम्ही सारे भारतीय आहोत म्हणणारा भारतीय,  भारतातील बांधवांवरतीच आत्याचार करतो हे या देशाचे दुर्दैव आहे.

“नवनाथ रेपे तुमची लेखणी समशेरीपेक्षा कमी नाही” संदीप हरिश्चंद्र गायकवाड क्रांती नगर, आंबेडकर चौक आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व मुंबई.
आजही आपला बांधव जय जिजाऊ जय शिवराय जय भिम म्हणण्यास लाजतो आणि तो सरळ सरळ रामराम बोलतो. ज्या प्रभूरामचंद्रावर तुमच्या सारखे विद्रोही लेखक आपल्या साहित्यात सडेतोड लिहितात तरीही आमच्या बांधवांना रामराम म्हणटल्याशिवाय राहवत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक कीर्तीचा बौद्ध धम्म दिला त्यांच्यामुळे ऐवढे मोठे वैभव प्राप्त झाले, तरीही आमच्या बांधवांना थोडी सुध्दा शरम वाटत नाही. देवपुज, आरती, सोंगढोंग, पायी कावड यात्रा, नवस सायास, बोकड्या बक-यांची कंदोरी, शिर्डी, गणपती, उरुस, दहिहंडी, देवी गोंधळ हे सर्व बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांच्या विरोधात असतानाही समाज हे सर्व डोळे झाकून करतो आहे कारण तो माजला आणि बाबासाहेबांना विसरला आहे.

संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू गुलामगिरीच्या बेड्या तोडणारे पुस्तक – प्रा.संभाजी जाधव जिल्हा सहसचिव मराठा सेवा संघ, लातूर

संत बन गये भोगी ! हा ग्रंथ म्हणजे रेशीम बागेच्या अजेंडयावर भीमप्रहार आहे. – प्रा.डॉ. आर. जे. इंगोले, जि.नाशिक

परिवर्तनाच्या वाटेवर आजही महाराष्ट्रात जातिवाद व धर्मांधांचा नग्गानांच चालू आहे. गावपातळीवरील जातिवादाने नव्याने डोक वर काढले आहे. राजकारण समाजकारण व अर्थकारणात बौद्ध पेक्षा मांग बरा, मा़गां पेक्षा चांभार बरा, चांभारा पेक्षा ढोर बरा अशी साखळी निर्माण होऊन आजची राजकीय आवस्था मनुवादाला खतपाणी घालते आहे. हे महाराष्ट्रात बहुसंख्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड ताकतीने आसलेला समाज जातियवाद पाळतो हे महत्त्वाचे दुर्दैव आहे कारण त्यांनाच परिर्वतन नको आहे. नवनाथ रेपे आपण आपल्या साहित्यातून जातीयवादी, राजकिय पुढा-यांच्या विरोधात रान पेटवून दिले त्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल आणि तुम्ही जो नव्या महाराष्ट्रचे स्वप्न पाहात आहात ते सत्कारणी लागेल असे अपेक्षा करतो.

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’ हभप गंगाधर महाराज कुरुंदकर, कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली
पुनश्च एकदा आपल्याला भरभरून प्रतिसाद देतो, असेच लिहा बिनधास्त लिहा या मनुवादी व्यवस्थेचे असेच लेखणीने कोथळे बाहेर काढून जातीयवादाला गाडून टाकण्याचा प्रयत्न करा आम्ही सारे आपणासोबत आहोत. इथेच थांबतो.

“जय जिजाऊ जय शिवराय जय भिम”

भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’ समीक्षक – याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद

  • नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित
    १. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
    २. भट बोकड मोठा
    ३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!
  • ४. संत बन गये भोगी!
    ही पुस्तके घरपोहोच मिळतील
    संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
    मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.