बहुजनांनो डोळे उघडा, हा सनातन धर्म तुम्हाला शुद्रच मानतो – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

0 827

बहुजनांनो डोळे उघडा, हा सनातन धर्म तुम्हाला शुद्रच मानतो – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

 

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. संयोगिताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी सनातनी कट्टरतावाद हाच दंगलींना कारणीभुत आहे, काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावलं, छत्रपतींमुळे मंदिरं राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही ? त्यांनी उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले, छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात.
बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झाले. जे मी सांगतो तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा, आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय. बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो. तसेच मी राणीसाहेबांचे आभार मानतो त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे. हा सनातनी कट्टरतावाद महाराष्ट्रातील दंगलींना कारणीभूत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.