मंदीरे भटमुक्त करा – मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी

2 487

देशातील सर्व मंदीरे भटमुक्त करा’ मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी

 

बुलढाणा : नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुरणक्य वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर चांगलेच संतापले आहेत. राज्यातील सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. शिवाय राज्यातील आणि देशातील मंदिरातील पैसा गरिबांसाठी, त्यांच्या मुला मुलांसाठीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 

रामनवमीच्या दिवशी पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर विविध क्षेत्रातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, देशातील सर्व मंदिरे भट मुक्त करा, मंदिरातील पुजारी हटवा. आगामी काही दिवसात मराठा सेवा संघाकडून मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

2 Comments
  1. Bapuso shelke says

    होय,, अगदी रास्त मागणी आहे, खेडकर साहेब तुमची, अजूनही ही किड संपत नाही, लुटून लुटून देशाला पोखरून काढले आहे

  2. Seems patil says

    मला वाटते सबंध भारतच मंदिर मस्जिद चर्च मुक्त केला पाहिजे.. आणि त्या ठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय ,कला मंदिर, गरजू विद्यार्थ्यांना मुला मुलींना शिकण्यासाठी शैक्षणिक सुविधा असलेली व्यवस्था,त्याचबरोबर वस्तीगृह निर्माण करायला हवित..
    निराधार अनाथ जीवांना राहण्याच्या सुविधा त्याच्यामध्ये निर्माण करायला हव्यात..
    सगळी मंदिरा मूर्ती मुक्त घंटामुक्त करून राष्ट्र समृद्धीकडे नेणारी व्यवस्था तयार करायला हवी…

Leave A Reply

Your email address will not be published.