‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’

0 172

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’

✍🏻 हभप गंगाधर महाराज कुरुंदकर,
प्रदेशाध्यक्ष , संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष, संत नामदेव तुकाराम समाज प्रबोधनकार वारकरी प्रशिक्षण केंद्र शिवतीर्थ तुळजाई गड कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली

जय जिजाऊ जय शिवराय जय बळीराजा…
शिवश्री नवनाथ रेपे यांचे “संत बन गये भोगी ” हे पुस्तक म्हणजे वास्तवाचे भान करून देणारे असून बहुजनांचे डोळे उघडणारे दिव्य अमृतांजन आहे. सदरील पुस्तकात भक्तीच्या श्रद्धेच्या नावाखाली समाजाचं शोषण करणाऱ्या नालायक ढोंगी बुवा बापू कीर्तनकारांचा संपूर्ण पर्दाफाश करण्यात आलेला आहे. या पुस्तकातून मनोहर कुलकर्णी उर्फ संभोगी भाड्याची तर चिरफाड केलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाम जय घोषामुळे ब्रिटिशांच्या पदरात मराठा बटालियन मुळे विजय प्राप्त झाला त्या छत्रपती शिवरायांचे मार्गदर्शक अध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या बागेश्वर धाम सारख्या हरामखोराचा संपूर्ण भांडाफोड केलेला आहे.

भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’
थोडक्यात काय तर पूर्वी घरातील भूतबाधा जाण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लावावा असं लोक म्हणायचे पण मूलनिवासी बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे, अंधश्रद्धेचे भूत उतरायचे असेल तर नक्कीच नवनाथ रेपेंचा हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे, तेव्हाच कुठे आपल्या धडावर आपलं मस्तक असेल. जेणेकरून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, मानवतावादी दृष्टिकोन निर्माण होईल. यामुळे गुंडांची आणि धेंडांची हुकूमशाही संपुष्टात येईल आणि संत महापुरुषांच्या विचारातील आपला भारत देश संविधानिक लोकशाही साम्राज्य बनेल.

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील
१. भट बोकड मोठा
२. संत बन गये भोगी!
३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
४. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. 9762636662 , 9764408794
rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.