माजी केंद्रीय मंत्री जयसिंगकाका गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चेंबरी रेस्ट हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

0 19

माजी केंद्रीय मंत्री जयसिंगकाका गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चेंबरी रेस्ट हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

परळी (वार्ताहर) : माजी केंद्रीय मंत्री जयसिंग काका गायकवाड यांच्या उपस्थितीत आज सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी चेंबरी रेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी मतदारसंघातील बुतबांधणी, पदाधिकारी निवड, पक्षवाढीसह इतर विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व येणारी बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकतीने लढवून पवार साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम करावे अशा पण सूचना जयसिंग काका गायकवाड यांनी दिल्या. तसेच या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गीते, ज्येष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब काका देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज,विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार ,जिल्हा उपाध्यक्ष बाबा शिंदे, शहराध्यक्ष ॲड जीवनराव देशमुख यांचे मार्गदर्शन झाले. याप्रसंगी काही पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर साहेबराव शिंदे ,युवक तालुका उपाध्यक्षपदी प्रभाकर उद्धवराव सटाले, युवक तालुका उपाध्यक्षपदी व्यंकटेश शंकर बदाले यांच्या नियुक्ती करण्यात आल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल बीड जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले युवक तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, तालुका सरचिटणीस राजेभाऊ फड, तालुका उपाध्यक्ष बबन काळे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण गडदे, युवक तालुका उपाध्यक्ष वृक्षराज काळे,युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, वारकरी परिषद तालुका अध्यक्ष माऊली महाराज आगलावे, भटके मुक्त जमाती अंबाजोगाई तालुकाध्यक्ष भागवतराव कातकडे, भटक्या विमुक्त समिती तालुकाध्यक्ष गणेश देवकते, तालुका सरचिटणीस रामचंद्र देवकते, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मोहन मुंडे, तालुका कार्याध्यक्ष भीमराव हाके, किसानसेल तालुकाध्यक्ष दिलीपराव गायके, तालुका उपाध्यक्ष नितीन घोडके, नेते सुनील काका सोळंके, विठ्ठल राव कराड, दौलत सातभाई, शरद आरसूळ, आप्पासाहेब देशमुख, बबनराव शिंदे ,धनंजय शिंदे, रामभाऊ राडकर, गणेश सोनार, महेश आघाव, सुरेश सातपुते, बब्रुवान कुंडगीर यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.