संत बन गये भोगी !  हा ग्रंथ म्हणजे  रेशीम बागेच्या अजेंडयावर भीमप्रहार आहे.                                      

0 264

संत बन गये भोगी !  हा ग्रंथ म्हणजे  रेशीम बागेच्या अजेंडयावर भीमप्रहार आहे.  

– प्रा.डॉ. आर. जे. इंगोले, जि.नाशिक.  

                    

       संत बन गये भोगी! हा आमचे मित्र मा. नवनाथ दत्तात्रय रेपे यांचा लेखसंग्रह आहे आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 12 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रामाता जिजाऊ जयंतीनिमित्त आणि शिवधर्म स्थापना वर्धापन दिन या दिवशी झाला. आणि विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा होण्याअगोदरच महाराष्ट्रातून या ग्रंथाला मागणी सुरू झाली यावरूनच  या ग्रंथाची आजच्या काळातील समाजाला उपयुक्तता आणि त्याचे महत्व आहे हे लक्षात येते. आज महाराष्ट्रात फुले ,शाहू आंबेडकर आणि छ्त्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांची विचार परंपरा जोपासणारा देश आणि समाज आहे. आणि यांच्या परंपरेचा आपण जर विचार केला तर ,चार्वाक पासून सुरू होते आणि मग एक मोठी शृंखला आहे तथागत बुद्ध , महात्मा फुले , संत कबीर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मग या साखळीत अनेक महापुरुष आहेत आणि हा वैचारिक संघर्ष हा वैदिक आणि अवैदिक असा आहे. आणि या परंपरेत आपणास एक लक्षात आले आहे की, लेखक नवनाथ रेपे यांनी आपल्या ग्रंथात मांडले आहे की, जेंव्हा आपले महापुरुष आपल्या बहुजन समाजाला एक प्रगतीचा नवा मार्ग दाखवतात आणि मग त्या मार्गाने जात असतांना सर्वात मोठी अडचण आहे की, आपलेच आपल्या लोकांना विरोध करतात. यामुळे मग जे लोक पूर्वी पासून हे महान कार्य हाती घेऊन काम करतात त्याच शृंखलेत आज नवनाथ रेपे यांचे योगदान मोठे आहे. आणि मग असे विचारवंत आपला स्वार्थ न पाहता केवळ समाज हित लक्षात घेऊन काम करतात तेंव्हा जास्त त्रास कधी होतो तर आपलेच लोक आपल्या कार्याला अडथळा आणतात आणि मग रागाच्या भारत व्यक्ती अनेक शब्द वापरतो त्याचा उद्देश हा समाज सुधारणे असतो कोणाचे मन दु:खावने कधीच नसतो. आणि मन दुखावले तरी असे लेखक याची पर्वा करीत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, आई जेंव्हा तिच्या मुलाला रागावते तेंव्हा तो राग हा प्रेममुलक असतो, द्वेशमुलक नसतो. म्हणजे आई जर म्हणाली , “ तिकडं झाडाखाली जाऊन मर .” म्हणजे याचा अर्थ खरोखरच मर असा होत नाही, तर इकडे ऊन आहे आणि त्यामुळे त्याची काळजी असते म्हणून झाडाखाली जाऊन मर म्हणजे झाडाखाली जाऊन बस, म्हणजे आई स्वत: उन्हात काम करते पण बाळाला सावलीत बसण्यास सांगते आणि अशीच भूमिका लेखक नवनाथ रेपे समाजासाठी घेतांना दिसतात. आणि म्हणून कोणीतरी त्यांना प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, या लेखकला मनातले कसे समजते कारण त्याचे मन आईचे आहे जसे आईला आपल्या मनातले समजते. आणि या ग्रंथाचे एक मला विशेष वाटले की, या ग्रंथाला महाराष्ट्रातून एवढया प्रतिक्रिया आलेल्या आहेत की, आजपर्यंत इतक्या प्रतिक्रिया मी कोणत्याच ग्रंथाला आलेल्या पाहिल्या नाही. खरं म्हणजे समीक्षा करतांना किंवा एखाद्या ग्रंथावर लिहतांना या ग्रंथावर आलेल्या प्रतिक्रिया जरी लिहल्या तरी एक मोठी समीक्षा होईल. आणि त्यात अनेक प्रतिक्रिया देणार्‍या मान्यवरांनी इतिहासातील अनेक मोठे विचारवंत यांच्याशी तुलना लेखक नवनाथ रेपे यांच्याशी केली आहे आणि काही भावनिक होऊन तुलना केली नाही, तर ते वास्तव आहे. कारण आपण जर भारतीय समाजाचा इतिहास पाहिला तर, आपल्या लक्षात येईल की, प्रत्येक काळात असे लोक होऊन गेले आहेत आणि त्यांनी समाजाला एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज एक पुरोगामी चळवळीत नवनाथ रेपे या लेखकाचे काम तेच आहे. समाजात असे लोक पाहिजे असतात. कोणत्याही काळात समाजात सत्य काय आहे ते फार थोडया लोकांना माहीत असते. आणि म्हणून एक विचारवंत म्हणतो की, समाजात 85  टक्के लोक हे समान्य असतात त्यांना आज जगात काय चालले आहे ? कोण कोणाला फसवत आहे ? राजकीय सत्ता कोणाची आहे ती सत्ता समाजाला योग्य आहे की अयोग्य आहे ? विचारसरणी म्हणजे काय ? पुरोगामी काय ? प्रतिगामी काय ? असे आणि इतर प्रश्नच त्यांना पडत नाहीत. कारण ते त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहसाठी धडपडत असतात. आणि 5 टक्के लोक हे सुद्धा जास्त आहे पण आपण गृहीत धरू की, त्यांना समजते आणि ते पुरोगामी असतात आणि 10 टक्के लोक धर्मांध असतात. आता बघा म्हणजे 5 टक्के लोकांना काम करायचे आहे आणि अशा 85 टक्के लोकांसाठी ज्यांना काहीच समजत नाही म्हणजे त्यांना आपल्याला कोणी फसवत आहे हे सुद्धा कळत नाही आणि आपल्यासाठी कोण काम करीत आहे हे सुद्धा कळत नाही. उलट असे 85 टक्के लोक जे त्यांना फसवतात त्यांचेच जास्त ऐकतात आणि नवनाथ रेपे सारखे तळमळीने काम करणारे लेखक आणि विचारवंत  सांगतात पण हे ऐकत नाहीत पण  तरीही पुरोगामी लोक नि:स्वार्थ आपले काम चालूच ठेवतात. आणि पुरोगामी लोकांची अपेक्षा अशी असते की, सर्व बहुजन समाजाचे कल्याण झाले पाहिजे. पण तरीही आपला बहुजन समाज आर.एस.एस.च्या जाळ्यात अडकतो. आणि याचे दु:ख फार मोठे आहे.

भोंदूगिरी करणाऱ्या संताची पोलखोल करून आकंठ अंधश्रद्धेत बुडालेल्या तमाम बहुजनांना विज्ञानवादाकडे घेऊन जाणारा ग्रंथ : ‘संत बन गये भोगी!’ समीक्षक याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद

आज आपण जर भारताचा विचार केला तर आपल्या देशाला सर्वात जास्त नुकसान करणारी बाब म्हणजे नकली संत ज्याला प्रस्तावनाकार आणि एक पुरोगामी लेखक , व्याख्याते आणि आता समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार डॉ.बालाजी जाधव महाराज हे  जंत शब्द वापरतात आणि तो शब्द अगदी योग्य आहे. कारण जंत हे मानवी शरीराचे शोषण करतात आणि हे मानवरूपी जंत समाजाचे शोषण करततात आणि विशेषकरून महिलांचे शोषण करतात आणि दुसरे आता नवीन आले आहेत कथावाचक यांनी देश कित्येक वर्ष मागे नेला आहे. आणि हेच लेखक नवनाथ रेपे यांचे टार्गेट आहे. आणि हे काम पूर्वी संत तुकाराम , संत नामदेव , संत रविदास , संत कबीर , संत सावता,संत कबीर ,संत रविदास अशी मोठी यादी आहे. यांनी केले आहे. पण आता हे कालानुरूप बदलत जाते. म्हणजे जेंव्हा संत तुकाराम होते तेंव्हा संत असाराम ,संत बागेश्वर बाबा , रामदेव बाबा, राम रहीम असे ढोंगी जंत नव्हते आणि त्यामुळे ते आजच्या काळात आहेत तर मग यांना काउंटर करण्यासाठी लेखक नवनाथ रेपे सारखे परखड आणि निर्भीड लेखक असणे आवश्यक आहेत. आज यांच्या विचाराची म्हणजे अशा पुस्तकाची पारायणे झाली पाहिजेत. पण आपला समाज बसला आहे मिश्रा ,रामदेव यांचे विचार ऐकत ते आज उपयोगी नाही. समाजात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात एक तर खूप विद्वान असतात पण त्याना आपले उच्च आणि समाज उपयोगी विचार समाजाला सांगण्याची हिंमत नसते. आणि दुसरे खूप धाडसी असतात पण त्यांना लोकांना काय सांगावे हेच माहीत नसते म्हणजे ते विद्वान नसतात. पण अशी एक वर्गवारी आहे की, ज्यामध्ये हे दोन्ही गुण असतात की, ते विद्वान असतात आणि ते विचार सांगणायचे धाडस सुद्धा करतात असा दोन सदगुणाचा मिलाप हा लेखक नवनाथ रेपे यांच्यामध्ये आहे आणि याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. परंतु हे कार्य वाटते तेवढे सोपे नाही. यात मोठी रिस्क आहे. पण आता हा मार्ग स्वीकारला तर मग रिस्क सुद्धा घ्यावी लागते आणि याची संपूर्ण कल्पना अशा व्यक्तीला असते तशी नवनाथ रेपे यांना सुद्धा आहे. आणि तो अवैदिक लोकांचा इतिहास आहे.

नवनाथ रेपे तुमची लेखणी समशेरीपेक्षा कमी नाही संदीप हरिश्चंद्र गायकवाड क्रांती नगर, आंबेडकर चौक आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व मुंबई

पण तरीही समाजातील अनेक घटकांनी या कामात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणजे एकमेकांना साथ मिळेल. आणि जे काम आपल्या विरोधात चालले आहे (RSS ) त्याला धाक बसेल. यापूर्वी झालेले ग्रंथ निर्मिती सुद्धा याच धाटणीची आहे त्यात भट बोकड मोठा , संविधानाच्या पडद्याआड संघोटयांचा लिंबू , डोळ्यात माणसाच्या फेकून धूळ गेला. आणि आता संत बन गये भोगी! ही सर्व एकाच मार्गाने जाणारी विचारधारा आहे जी आपल्या बहुजन समाजाला पुढे नेणारी आणि जागृत करणारी आहे. या ग्रंथाचे मला आणखी एक वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे या ग्रंथात जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक याचे अभंग हे या ग्रंथाचे सर्वात मोठे विशेष आहे. कारण एखाद्या आजच्या संताला (जंताला )जर शब्दरूपी फटकारे द्यायचे असतील तर विश्वंभर वराट यांच्या अभंगाची मेख चपखल बसते. म्हणजे आपण नवनाथ रेपे यांची चारही ग्रंथ संपदा पहिली म्हणजे अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की, त्याचा आधार विश्वंभर वराट यांच्या अभंगाचा आधार आहे आणि ही खूप मोलाची गोष्ट आहे की, आजच्या काळात सुद्धा असे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे विचारवंत आहेत.

‘बहुजनांच्या मानगुटीवर बसलेले मनुस्मृतीचे भूत उतरवण्यासाठी नवनाथ रेपे यांचे ‘संत बन गये भोगी!’ हा ग्रंथ प्रत्येक गावातील मंदिरावर लावून त्याचे सामूहिक वाचन व निरूपण व्हायला पाहिजे’ हभप गंगाधर महाराज कुरुंदकर, अध्यक्ष, संत नामदेव तुकाराम समाज प्रबोधनकार वारकरी प्रशिक्षण केंद्र शिवतीर्थ तुळजाई गड कुरुंदा, ता. वसमत, जि. हिंगोली

           लेखक नवनाथ रेपे यांनी परखड लिखाण करतांना जो विषय घेतला आहे त्यामध्ये आजचे संत (जंत) कसे समाजाच्या भावनांचा गैरफायदा घेतात, आणि कशी त्यांची लूट करतात आपल्या बहुजन स्त्रियांना कसे अपमानीत करतात तसेच त्यांच्यावर बलात्कार करतात आणि पुन्हा कोणी जर याविरोधी आवाज उठवला तर पुन्हा आपल्याच स्त्रिया कशा मोर्चे काढतात हे स्पष्ट केले आहे. आणि मुख्य विषय घेतांना त्यांनी इतर विषयांना सुद्धा हात घातला आहे जसे कोरोंना कसा फसवा होता आणि त्यामुळे कसे अनेक लोकांनी लस घेतल्या नाहीत हे आपणास अनेक प्रतिक्रिया वाचताना पाहवयास मिळाले तसेच आपल्या समाजात मा. सुषमाताई अंधारे सारख्या प्रबोधनकारांनी काही नवीन विचार मांडले तर लोक कसे कोल्हेकुई करतात आणि मग अशा अनेक किर्तनकरांचा समाचार खूप चांगल्या प्रकारे यांनी घेतला आहे आणि ती खूप अभिमानास्पद बाब आहे. कारण आपल्याकडे पुरोगामी विचार सांगणार्‍या लोकांना एकटे पडण्याची पध्दत आहे. आणि हे काम करतांना नवनाथ रेपे यांनी अनेक दाखले दिले आहेत की, त्यामुळे आर.एस.एस. प्रणीत जंत पुढे कधीच असे करणार नाहीत याचा एक नविन मार्ग दाखवला आहे. म्हणजे आपल्या बहुजन किर्तनकारांनी तर हे पुस्तक वाचन करणे फार आवश्यक आहे. कारण यांचा मार्गच भरकटला आहे. आणि त्यामुळे यांनी कितीही वर्ष असे किर्तन केले तर समाज दिशाहीनच होणार आहे. कारण यांचा एकच विषय असतो अध्यात्म आणि अध्यात्म काय असते याचा संदर्भ दिला आहे लेखकांनी मा. उत्तमराव मोहिते यांचा ग्रंथ दासबोध मी जाळणार आहे यासारखे ग्रंथ वाचले आणि समाजास संगितले तर आज समाज जो या जंताच्या नादी लागून फसवला जात आहे, तो पुढे कधीच फसणार नाही. या ग्रंथाचे एक विशेष आहे म्हणजे “ बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.” असे जे म्हणतात ते आहे. म्हणजे आजचा कोणीही किर्तनकार जेंव्हा लोकांना फसवतात तेंव्हा त्याला लगेच ऐतिहासिक पुरावा आहे आणि असा पुरावा आहे की, यांनी तर सोडा पण बर्‍याच वाचकांनी सुद्धा हे असे अभंग कधी पाहिले आणि वाचले नसतील. त्यामुळे समाज एकदम जागृत होतो आणि सामान्य लोक सुद्धा जर हा “ संत बन गये भोगी!” ग्रंथ वाचला तर अनेक ढोंगी लोकांचा प्रतिवाद करू शकतात. आणि मला वाटते लेखकाचा उद्देश सुद्धा तोच असला पाहिजे. लेखक आपल्या बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत आहेत. आणि अशा अनेक संकल्पना किंवा समजुती आहेत की, त्या उलट आहेत पण अनेक वर्षापासून आपल्या मनावर एखादी गोष्ट कोरली जाते आणि मग ती सत्य नसते पण आपल्याला सवय झालेली असते. तशीच एक संत साहित्यातील विचार म्हणजे वारकरी पंथाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आता हे सत्य नाही पण आपल्या कानाला एखादी गोष्ट ऐकायची सवय झाली की, मग आपण भारतीय लोक तीच गोष्ट सत्य मानतो. आणि चिकित्सा करायची नाही अशी आपल्याला सांगितलेले असते. पण लेखक त्याच संत साहित्याचा पुरावा देऊन हे कसे खोटे आहे ते सिद्ध करतो. आता जर लेखकाने जर संत साहित्याचा पुरावा दिला असेल तर मग सत्य ऐकायला काय हरकत आहे. किंवा आजचे संत (जंत ) कसे या कीर्तनाचा धंदा करतात याबाबत सुद्धा संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे

“ तुका म्हणे द्रव्य घेती |देती तेही नरका जाती ||”

       आता आणखी काय पुरावा पाहिजे. आणि  पूर्वीपासूनच वैदिक आणि अवैदिक असा संघर्ष आहे. आता बघा संत साहित्यात ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असे का म्हणतात ? म्हणजे ज्ञानेश्वराचा एकनाथ आणि नामदेवाचा तुकाराम असा अर्थ आहे.  जर खरोखर ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाचा पाया रचला असता तर “ ज्ञानाचा तुका असे म्हटले असते. खरे तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे विचाराची दोन टोके आहेत. पण हे आता आर.एस.एस. चा प्रभाव असलेल्या किर्तनकरांना हे मान्य होत नाही आणि कहर म्हणजे संत तुकारामाचे वंशज असलेल्या सदानंद मोरे यांना सुद्धा मान्य होत नाही. आणि महाराष्ट्रातील कांही विचारवंत सत्य सांगतात तर हे सुद्धा सदानंद मोरे यांना मान्य होत नाही. आपली वारकरी मंडळी अभ्यास करीत नाहीत आणि त्यामुळे जास्त खोलवर जात नाहीत. आणि अशाच कित्येक पिढया जातील पण त्यांना कळणार नाही. कारण त्याला चिकित्सा करावी लागते आणि त्यासाठी मागे सांगितल्याप्रमाणे त्याला विद्वत्ता आणि धाडस पाहिजे ते आज या दोन्ही बाबी आपल्या वारकरी आणि किर्तन करणार्‍या लोकांत नाहीत. आणि त्यामुळे तेच सांगण्याचा प्रयत्न आपले बहुजन पुरोगामी लेखक आणि मा. नवनाथ रेपे सुद्धा करीत आहेत. याच संत विचारला पुढे नेतांना असे म्हणता येईल की, ज्ञानेश्वर हे शास्त्रभक्त होते तर तुकाराम हे शास्त्रविरोधी होते आणि मग ते एकाच परंपरेत कसे येतील ? ते आता आपण पाहू. ज्ञानेश्वर म्हणतात,

शास्त्र म्हणेल ते सांडावे , ते राज्यही तृण मानावे , जे जे घेवी ते न म्हणावे ||

     याचा अर्थ ज्ञानेश्वर म्हणतात तुम्ही कितीही विद्वान असाल तरी शास्त्राच्या विरोधात जाता येत नाही. परंतु संत तुकारामाला शास्त्रमत मान्य नाही. संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात,

न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा || ( शा. तू. गा. अ. ३११३)

        यात संत तुकाराम वेद शास्त्रापेक्षा नामाला म्हणजे जाणिवेला श्रेष्ठ मानतात. जाणीव अनुभावातून येते. तर शास्त्रात अनुभवाला स्थान नाही. शास्त्र म्हणेल ते निमूटपणे ऐकावे लागेल. ते आपल्या दुसर्‍या अभंगात म्हणतात,

तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका | अनुभवाविना नका वाव देऊ ||

याचा अर्थ संत नामदेव सुद्धा अनुभवाला महत्व देतात. अनुभवामुळे मला सर्व समजले ,शास्त्रामुळे नाही.

नामा म्हणे मज कळले अनुभवे |  रईदास सत्य सोई जानिए  | जो अनुभव मनमाही ||

एकंदरीत आपण विचार केला तर संत ज्ञानदेव- एकनाथ साहित्य आणि संत तुकाराम- नामदेव साहित्य यात फरक आहे. एक शास्त्रप्रामाण्यवादी तर दुसरे बुद्धिप्रामाण्यवादी आहे. आणि म्हणून संत तुकारामानी धर्मशास्त्राची मते आणि परंपरा नाकारली त्यामुळे संत तुकाराम म्हणतात,

सत्य असत्याशी मन केले ग्वाही , मानियले नाही बहुमता ||

शास्त्रमत असेल , परंपरागत असेल , सत्याशी विसंगत असेल आणि विवेकाला पटत नसेल , तर्कावर टिकत नसेल तर ते संत तुकारामाने स्वीकारले नाही. ज्ञानेश्वर मात्र शास्त्रमताच्या अधिनच राहिले, म्हणून ते शास्त्र म्हणेल ते सांडावे असे म्हणतात. (संदर्भ : दैनिक मुलानिवासीनायक, दि. ३० नोव्हेंबर २०१५, लेखक : प्रा. गंगाधर गीते , हिंगोली) आणि हाच विचार मा. नवनाथ रेपे यांनी आपल्या ग्रंथातून स्पष्टपणे मांडला आहे. आणि पुन्हा एक विशेष या लेखकाचे आहे आणि जे प्रत्येक पुरोगामी लेखक आणि विचारवंताने लक्षात ठेवले पाहिजे आणि ते म्हणजे आपण समाजात विचार मांडत असतांना सरळ सरळ विभागणी केली पाहिजे. म्हणजे आपले महापुरुष आणि संत परंपरा कोणती आहे हे अगदी स्पष्ट शब्दात मांडले पाहिजे म्हणजे संतांचा विचार केला तर, एका बाजूला संत तुकाराम ,नामदेव , सावता , संत कबीर ,संत रविदास अशी विभागणी आणि दुसर्‍या बाजूला म्हणजे आपल्या बहुजन विरोधी गटात संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ ,संत रामदास  अशी असावी पण आपल्याकडे मी अनेक विद्वान प्राध्यापक पाहिले आहेत ते भाषणाची सुरुवात करतांना व्यासपीठावर या शब्दाने करतात आणि त्यांना हे चूक की बरोबर माहीत असेल किंवा नसेल ते करतात म्हणजे असे सोयीनुसार पुरोगामी हे जास्त घातक असतात. आणि त्यामुळे लेखक अर्थात त्यांची एक स्पष्ट आणि पुरोगामी विचारसरणी आहे. नाही तर आजवर आपल्या बर्‍याच कीर्तनकार लोकांना संत ज्ञानेश्वर यांना आपण कसे नांव ठेवावे? असे वाटले असेल आणि म्हणून यांचा जास्त भर संत ज्ञानेश्वरावरच होता आणि आहे आणि यामुळेच आपला समाज जास्त दिशाहीन झाला आहे. याची ओळख करून दिली हे या लेखकाचे मोठे योगदान आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्या भारतीय संविधानात कलम 51 (अ) नुसार आपण समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे आणि जगताना सुद्धा स्वत: त्याचा उपयोग केला पाहिजे. पण आपण हे करतांना दिसत नाही आणि लेखकाची सर्व साहित्य निर्मिती ही याच उद्देशाने प्रेरित आहे असे दिसते. कारण सर्व साहित्य आणि एक विचारधारा घेऊन लेखक पुढे जात आहे. आणि ही जबाबदारी आपल्या पूर्वजांनी पेलली आहे आता पुढे घेऊन जाणे आपल्यावर आहे आणि तो वारसा लेखक सक्षमपणे पार पाडत आहे यात शंकाच नाही. कारण आपल्या सर्व महापुरुषांनी समाज या अंधश्रद्धेबाबत जागृत केला आहे आणि शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याला भारतीय संविधानात बंदिस्त केले आहे. म्हणजे हे दोन्ही घटक एकमेकास पूरक आहेत. आज समाज ज्या अवस्थेतून जात आहे आणि विशेष करून 2014 पासून जे आपल्या बहुजन समाजाच्या मेंदूवर मारा केला जात आहे, त्यावर हे पुस्तक म्हणजे औषध आहे म्हणजे जालिम उपाय आहे. कारण मागे सांगितल्या प्रमाणे 85 टक्के लोकांना काहीच माहीत नसते म्हणजे त्यांना आपण पुरोगामी विचार म्हणजे काय अर्थ आहे हे सुद्धा माहीत नसते आणि त्यांच्यावर जुन्या विचारांचा पगडा असतो. अशा स्थितीत नवनाथ रेपे सारख्या लेखकाने केलेले काम खूप प्रभावी आणि आवश्यक आहे. आज समाज दिशाहीन करण्यासाठी अनेक बाबा, बुवा आणि अम्मा समाजात जाणीवपूर्वक सोडले आहेत आणि सर्व क्षेत्रात आहेत. हे फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि आपण त्यावर स्पष्ट बोलण्याची गरज आहे. आज जनता धर्म आणि जात यावर विभागली जात आहे पण त्यांना महत्वाचे प्रश्न बाजूला केले जात आहेत. अशा काळात नवनाथ रेपे आपले विचार घेऊन समाजात जात आहेत हे एक मोठे पाऊल आहे. आणि मग राजकीय ,शैक्षणिक ,सामाजिक आणि धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात हे काम सुरू झाले तर पुढील काळात एक मोठी वैचारिक वारसा घेऊन जाणारी फूले ,शाहू ,आंबेडकरी आणि छ्त्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज आणि आपले सर्व पुरोगामी संत यांचे विचार पुढे नेणारी एकत्र आली तर एक पिढी तयार होईल.आणि  ज्याला शक्य होईल त्या पद्धतीने हे कार्य केले पाहिजे. ज्याला लिहता येईल त्याने लिहावे ,कोणी बोलावे ,कोणी चर्चा करावी सतत हे कार्य चालू असले पाहिजे. कारण आपला शत्रू फार धूर्त आहे, त्यामुळे आता रात्रच नाही तर दिवस सुद्धा वैर्‍याचा आहे असे समजून आपणास सावध राहावे लागेल. आणि त्यात एका सैनिकाची भूमिका आपले लेखक नवनाथ रेपे करीत आहेत त्यांना आपण बळ दिले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी हा ग्रंथ विकत घ्यावा आणि त्यावर चर्चा करावी ,आपल्या बहुजन समाजाला हे विचार पटवून द्यावे तरच लेखकाचा उद्देश सफल होईल.

 नवनाथ रेपे यांच्या लेखणीत नामदेव ढसाळांचा विद्रोह शत्रुघ्न जळबा वाघमारे संपा. साप्ताहिक झुंज संघर्षाची देगलूर जि. नांदेड

पुस्तकाचे नांव :  संत बन गये भोगी !

लेखक :  नवनाथ दत्तात्रय रेपे

प्रकाशक :  रुक्माई प्रकाशन ,अंजनडोह (बीड )

पृष्ठे :  १४४

 स्वागत मूल्ये :   १५० रुपये

 संपर्क :   9762636662

संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू गुलामगिरीच्या बेड्या तोडणारे पुस्तक संकलन:- प्रा.संभाजी जाधव जिल्हा सहसचिव मराठा सेवा संघ, लातूर

 

मराठा आरक्षणाचा खरा शत्रू कोण ? दिपक इंगळे यांचे मार्गदर्शन

Leave A Reply

Your email address will not be published.