मराठा समाजास ओबिसी आरक्षण मिळावे – मनोज जरांगे यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर यांचा पाठिंबा

0 22
मराठा समाजास ओबिसी आरक्षण मिळावे
– मनोज जरांगे यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर यांचा पाठिंबा
नांदेड :  मराठा समाजाचा सरसकट ओबीसी आरक्षणात समावेश करावा अशी मागणी घेऊन मनोज जरांगे करीत आहेत. यावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजाची दुरावस्था असल्याचा अहवाल कालेलकर आयोगाने दिला होता. यानूसारच मराठा समाजास ओबिसी आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे.
  ते जन संवाद दौºयात नांदेड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, इंग्रजाचे राज्य होते तेव्हा जातीच्या नोंदी होत्या. १९६७ पर्यंत मराठा समाजाची ओबिसीत नोंद होती. ती नंतर काढून टाकण्यात आली. यामुळे आरक्षणाची सतत केल्याने सरकारने विविध आयोग नियुक्त केले. परंतू मागच्या सरकारने योग्य अभ्यास न केल्याने आणि निर्णय न घेतल्याने हे अहवाल बाजूला पडले. कालेलकर अहवालात मराठवाड्यात मराठा समाजाची दुरावस्था आहे, त्यांचा ओबिसीत समावेश करावे असे सुचित केले होते. त्यामुळे आम्ही सुद्धा हीच मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.