१९ जानेवारी रोजी लिंगायत समाजाचे सोलापूर बंदचे हाक

0 17

१९ जानेवारी रोजी लिंगायत समाजाचे सोलापूर बंदचे हाक

 

सोलापूर (प्रतिनिधी) : १२व्या शतकातील आदर्श प्रशासक समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही संसद म्हणजेच अनुभव मंटपची स्थापना केली. बसवेश्वरांनी समाजातील अन्याय आणि विषमतेच्या विरुध्द विशेषतः अमानवी जाती व्यवस्थे विरुध्द लढा दिला. त्यांनी सामाजिक जागृकता पसरविली आणि सर्व मानवाच्या समानतेचा उपदेश
केला आणि अस्पृष्यतेचा निर्मुलनाचा महान कार्य केले.

या घटनेचा जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी (बंगळुरु), पंचमसाली जगदगुरु जयबसव मृत्युंजय महास्वामी कुडलसंगमपीठ (बागलकोट), प.पु. जगद्गुरु बसवलिंग पट्टदेवरु (बिदर), प.पु. बसवलिंग शिवयोगी महाराज सोलापूर, प.पु.कोरणेश्वर स्वामी (लातूर), प.पु. शिवपुत्र महास्वामी बसवारुढमठ सोलापूर प.पु. महानंदाताई मुगळीमठ (अक्कलकोट), स्वामीनाथ स्वामी किरीटेश्वरमठ, पु. श्री. महालिंगस्वामीजी संगारेड्डी तेलंगणा, पु. श्री. शिवानंद स्वामी अनुभवमंटप बसवकल्याण, पुज्य श्री बसवलिंग स्वामी बसवकल्याण, इत्यादींनी वरील घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले. जसे मिरवणुक पुढे पुढे जात होते त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आले. सदरचे प्रकरण मंदिर पंचकमिटीकडे विचारणा केली असता याबाबत पंचकमिटीने या घटनेचा निषेध केला असून संबंधीतावर कारवाई व्हावी असे जाहीर आवाहन केले आहे. त्यामुळे मंदिर समितीचे या भुमिकेत स्वागत करीत आहोत. पोलीस प्रशासन या घटनेचा चौकशी तात्काळ करुन समाजकंटकांच्या मुसक्या आवळावे अन्यथा दि. १९ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर बंदचा हाक देण्यात येईल असे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय महासचिव सकलेश बाभुळगांवकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष-नामदेव फुलारी, श्रीशैल शेट्टी, राजकुमार व्हनकोरे व बसवराज स्वामी, अशोक धुळराव यांनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.