केजरीवाल जाणार राम दर्शनाला

0 17

केजरीवाल जाणार राम दर्शनाला
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रभू राम लल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. २२ जानेवारीनंतर भगवान रामललाच्या दर्शनासाठी मी कुटुंबासह अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी बुधवार रोजर सांगितले. राम मंदिर ट्रस्टच्या वतीने देशभरात सोहळ्याच्या अक्षता वाटण्याचे काम जोरात सुरू असून त्याच्या अक्षता आणि निमंत्रण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळाल्यानंतर आपण आयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते इंडिया आघाडीत सामिल असून या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे जाहिर केले असले तरी केजरीवाल मात्र आयोध्यवारी करण्यावर ठाम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.