खराब पदार्थ मिळाल्यास फूड इन्स्पेक्टरकडे करा तक्रार – आयआरटीसीटीसीकडून विशेष ट्रेनमध्ये फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती

0 27

खराब पदार्थ मिळाल्यास फूड इन्स्पेक्टरकडे करा तक्रार
– आयआरटीसीटीसीकडून विशेष ट्रेनमध्ये फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान भारतीय रेल्वे केटरिंग सेवा आपल्याला कधीकधी चुकीचे किंवा खराब पदार्थ देते़ याबाबत सहसा कोणी वाच्चता करत नाही कारण त्याची तक्रार कशी आणि कोणाकडे करायची याची अनेकांना माहिती नसते़ मात्र प्रवाशांना स्वच्छ आणि चांगले जेवण मिळावे यासाठी आयआरटीसीटीसीने विशेष ट्रेनमध्ये फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती केली आहे़ आयआरटीसीटीसीने राजधानी शताब्दी, दुरांतो, तेजस आणि वंदे भारत ट्रेनमध्ये फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती केली आहे़ या रेल्वेमधून प्रवाशांना दिल्या जाणाºया पदार्थाविषयी तक्रार किंवा काही समस्या निर्माण झाल्या तर ते प्रवाशी फूड इन्स्पेक्टरसी संपर्क करू शकतात़ तसेच सरकारने मेल किंवा एकसप्रेस रेल्वे गाड्यामध्ये अन्न निरिक्षक पर्यवेक्षकांचीही नियुक्ती केली आहे़ जेणेकरून रेल्वेत प्रवास करणारे प्रवाशी या अधिकाºयांकडे तक्रार करू शकतात़
तक्रारीसाठी १३९ क्रमांक डायल करा
भारतीय रेल्वेच्या इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित असलेल्या १३९ क्रमांक डायल करून भाषा निवडल्यानंतर खाण्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ३ बटण दाबावे लागेल़ यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलण्यासाठी स्टार दाबावे लागणार आहे़
रेल्वे अ‍ॅपद्वारे करता येणार तक्रार
इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमच्या १३९ नंबरवर संपर्क केल्यास प्रवाशाला आपला सीट नंबर आणि पीएनआर नंबर द्यावा लागणार आहे़ याशिवाय रेल्वे अ‍ॅपद्वारे ही तक्रार करता येऊ शकते़ या तक्रारीमध्ये रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर असलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल किंवा विक्रेत्यांची माहिती द्यावी लागणार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.