स्किन प्रोडक्ट्सच्या वापरामुळे शरिराला आतून इजा – सायनाचा वापर केलेला असतो, त्यामुळे ही उत्पादने हानिकारक

0 47

स्किन प्रोडक्ट्सच्या वापरामुळे शरिराला आतून इजा
– सायनाचा वापर केलेला असतो, त्यामुळे ही उत्पादने हानिकारक

नवी दिल्ली : आज प्रत्येकाला सुंदर त्वचा हवी असते़ यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन प्रोडक्ट्सचा वापर करतात़ मात्र सुंदर होण्याच्या नादात या प्रोडक्ट्सचा वापरामुळे शरिराला आतून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या स्किन प्रोडक्ट्समध्ये रसायनाचा वापर केलेला असतो, त्यामुळे ही उत्पादने हानिकारक ठरू शकतात़
त्वचेची काळजी घेताना आपल्याला स्किन प्रोडक्टची निवड करणे म्हत्वाचे आहे़ ज्या लोकांची त्वचा नैसर्गिक चांगली असते त्यांना या उत्पादनांपासून होणाºया दुष्परिणामाची काळजी नसते़ मात्र ज्यांची त्वचा सुंदर नसल्याने ते ग्राहक या उत्पादनाचा वापर करून सुंदर त्वचा करण्याचा कसोसीने प्रयत्न करतात़ पण या उत्पादनामध्ये असलेल्या रसायनामुळे त्यांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते़
स्किन प्रोडक्ट खरेदी करण्याऐवजी नैसर्गिक त्वचा काळजी लोशन किंवा फेस मास्क घरी तयार केले तर ते त्वचेसाठी सर्वोत्तम पर्याय असून ते हाणीकारक नसते़ जर नैसर्गिक त्वचा काळजी लोशन किंवा फेस मास्क घरी तयार केले तर ते आपल्या त्वचेसाठी सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो़
केमिकल युक्त स्किन प्रोडक्ट वापरू नयेत
अस्वस्थ जीवनशैली आणि प्रदुषणाचा परिणाम चेहºयावर होतो़ अशा परिस्थितीत आपली त्वचा निस्तेज होऊन त्यावर काळे चट्टे आणि डाग पडतात़ त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केमिकल युक्त स्किन प्रोडक्ट वापरू नयेत असे डॉक्टरांकडून वांरवार सांगितले जात आहे़

 

Leave A Reply

Your email address will not be published.