अध्यात्माच्या मार्गावर धक्के आणि मुक्केच कसे ?

0 1,207

अध्यात्माच्या मार्गावर धक्के आणि मुक्केच कसे ?

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

 

“गळ्यामधे माळ करी विणा टाळ। पोटामधे काळ हभपंच्या ।।१।।
संतांशी विकूनी गडगंज झाले । बांधले बंगले हभपंनी ।।२।।
जमवुनी झुंड्या नाव देती दिंड्या । भरीयल्या हुंड्या व्यापाऱ्यांनी ।।३।।
म्हणे विश्वंभर ऐसा परमार्थ । ठासू ठासू स्वार्थ भरलेला ।।४।।”
हा विद्रोही कवि विश्वंभर वराट यांनी लिहिलेला अभंग आज संत म्हणून मिरवणाऱ्या सगळ्या जंतासाठी लागू पडतो. आता सध्या जिकडे तिकडे अध्यात्माचे वारे वाहत असून या वादळात अनेकांच्या घराला माती सुद्धा शिल्लक राहीली नाही. परंतू आमच्या समाजाची अवस्था ही जळालेल्या सुंभासारखी आहे. त्यामुळेच तर ते देव-धर्म, बुवा-बाबा, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांच्या आहारी जाऊन ते पार रसातळाला पोहोचले आहेत. आमच्या अधोगतीला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे अध्यात्म! याच अध्यात्माचा मार्ग सांगणारे आसाराम, राम रहीम आणि इतर लुंगे पुंगे, उघडे नागडे लंगोटीछाप बाबा आणि बुवा गजाआड आहेत. तरीही बहुजन समाजाच्या डोक्यात प्रकाश पडत नसल्याने तर मग बुवा खाडे, रामकृष्ण मोगल, आसाराम लोमटे आणि मीरा खरात हे सर्व रामदासी पंथाचे नर्तनकार अध्यात्माचा बोध देत तो शोधण्याचे धडे देण्यासाठी लोकांसमोर भगवी आणि पांढरी पटकरे परिधान करून आभाळ हेपलत होते. आता त्यांचेच एकमेकांना धक्के देत मुक्के घेत असतानाचे अश्लिल व्हीडिओ प्रसारित होत असतील तर अध्यात्माच्या मार्गावर धक्के आणि मुक्केच आहेत का असा पडतो? त्यामुळे आमच्या समाजाने अध्यात्म म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ‘मी दासबोध जाळणार आहे!’ या पुस्तकाचे वाचन केले पाहीजे. या पुस्तकात वीर उत्तमराव मोहीते अगदी मोजक्या शब्दात म्हणतात की, ‘अध्यात्म गूढ विद्या नसून ते थोतांड आहे. अध्यात्म लुटारुंचे तत्वज्ञान आहे. पिळवणूक, फसवणूक व गुलामगिरी हा अध्यात्माचा परिपाक आहे. अध्यात्माची उभारणी बहुजन समाजाच्या अज्ञानावर झाली. चिकित्सा व टीका अध्यात्माचे शत्रू आहेत.’

अहमदनगर जिल्ह्यातील हनुमान गडाचे महंत शास्त्री बुवा खाडे याने गड आणि परिसरात हौदोस मांडला असून त्याने केलेल्या काळ्या कारनाम्यांची काळी करामत उघडी पाडण्यासाठी जिवाचे रान करणारे ‘मराठी महाराष्ट्र’ चे संपादक संग्राम धन्वे हे उत्तम पत्रकारिता करीत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! बुवा खाडे शास्त्री या लिंगपिसाट बाबावर विश्वास दाखवित आपल्या संसारावर तुळसिपत्र ठेवून दोन मुलांना वा-यावर सोडून रात्रंदिन हनुमान गडाच्या महंताची मन आणि तनाने सेवा करणा-या महिलेचे जेव्हा पितळ उघडे पाडले तेव्हा ही महिला धन्वे यांना धमकी देताना दिसत आहे. https://fb.watch/nBb-3mpWuj/?mibextid=Nif5oz अध्यात्माच्या सोंग आणि ढोंगापायी आपल्या आयुष्याची होळी करून घेणारी महिला खाडे शास्त्रीवर खडे फोडण्यापेक्षा संपादक धन्वे यांच्या नावाने काय म्हणून बोंब मारत असेल? व्हायरल झालेल्या क्लिपमुळे बुवा खाडेच्या पृष्ठभागात आग पडली असून तो धन्वे यांना काहीच करू शकत नसल्यामुळे त्याने या महिलेच्या पदराआड बसून तिर मारण्याची योजना आखली असावी असा संशय येत आहे. महिलेने आपल्या तोंडून धन्वेंना उद्देशून काढलेले शब्द सृजनशील महिलेच्या तोंडी कदापीही शोभून दिसणार नाहीत. पण वर्तनाप्रमाणे वाणी चालविणा-या त्या महिलेला कोणी सांगावे की, चूक मान्य करायला शिकलं पाहीजे. पण इथे एवढेच सांगणे आहे की नारायनगडाधिपती बाबा या महिलेला सद्बुद्धी देवो! या विकृतींविषयी विद्रोही कवि विश्वंभर वराट म्हणतात की,
“ज्ञानयज्ञ सात दिवसांचा मांडला। कथाकार भला रंगलेला॥१॥
कृष्ण-गौळणीचा खेळ फुगड्याचा। काठ लुगड्याचा बाबाहाती॥२॥
भक्तीनी साधुला घालता अंघोळ। सुटलेला झोळ लंगुटीचा॥३॥
म्हणे विश्वंभर हभपने केला। खात्याघरी काला सप्ताहाचा॥४॥”

लिंगपिसाट बुवा खाडे याला जर कोणी नारायण गडाचा परकराधिपती असे म्हटले तर त्या व्यक्तींचे काय चुकणार आहे? कारण याच बुवाने महिलेच्या फाटक्या परकरचे पन्नास मुक्के घेतले हे त्याने स्वतः मान्य केले आहे. त्याच्यावर खर्डा पोलिस ठाण्यात दि. ०५ आॅगस्ट २०२३ रोजी कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. https://youtu.be/BMmYlBbglAI?si=XcRHt9LHMb0JHs3l हे प्रकरण छत्रपती संभाजी नगर खंडपीठात सुरू असून या लिंगपिसाट परकर सम्राटाचा जामीन न्यायालयाचे फेटाळला त्याबद्दल न्यायालयाच्या निर्णयाचे अभिनंदन ! मात्र दुसरीकडे खर्डा पोलिस स्टेशनकडून या परकर सम्राटाला अटक का केली नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. यामुळे लिंगपिसाट बुवा खाडेला पाठीशी घालून हे पोलिस प्रशासन काय साध्य करू पाहत आहे? जर पोलिसांनी अशा घरफोड्या लिंगपिसाट नराधमाला अटक केली नाही तर ते खुद्द आसारामची प्रतिकृती असलेल्या बुवा खाडेला पाठीशी घालत आहेत अशी चर्चा सुरू झाल्यास पोलिस प्रशासन ती कशी थांबवणार आहे? लोकांच्या संसाराची हजामत करून छोट्या छोट्या मुलांचे मातृत्व हिसकावून घेणारा बुवा खाडे पोलिस प्रशासनाला हिरो वाटू लागला की काय? इतरांच्या संसारावर बुलडोझर फिरवून त्यांच्या घरातील बायका उपभोगण्याचा परवाना बुवा खाडेने मिळविला आहे का? या नराधमाला पाठीशी घालणारे नेमक्या कोणत्या मनोवृत्तीचे असतील हे सहज लक्षात येते. म्हणून तर विद्रोही कवि विश्वंभर वराट म्हणतात की,
नका म्हणू मज हभप फबप । होतो बहु ताप चित्ता माझ्या ।।१।।
हभप हा शब्द घृणायुक्त झाला। मलीन तो केला हभपने ॥२॥
ऐसे किती तरी निघाले हभप । काय ते अबब पोरीसंगे ।।३।।
म्हणे विश्वंभर सांभळीन पत। हभप ताईत गळा नको।।४।।

हनुमान गडाचे लिंगपिसाट ! मठाधिपती बुवा खाडे यांचे फाटका परकर आणि त्यांनी घेतलेले पन्नास मुक्के दिलेल्या धक्क्याचे प्रकरण चव्हाट्यावर आणले म्हणून मराठी महाराष्ट्राचे संपादक संग्राम धन्वे यांना लिंगपिसाट बुवा खाडेचा भक्त पत्रकारितेची पदवी विचारताना दिसत आहे. वारंवार हे प्रकरण उकरून काढून महाराजांची बदनामी का करतो? बुवा खाडे यांची क्लिप केल्यास कारवाई करणार कारण आम्ही गडाचे भक्त आहोत, चांगल्या बातम्या देत येत नाहीत का असे म्हणत भक्ताने आपल्या बुद्धीची वेश्यागिरी करून स्वतःची लाल करून घेतली. https://youtu.be/Zc96Exf4jxs?si=SzfLy3CqbGmXjLBS आंबेडकरी समाजात जन्मलेले संग्राम धन्वेंना त्यांच्या पत्रकारितेची पदवी विचारणा-या भडव्या भक्ताने कोणालाही पदवी न दाखवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी बघण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत? लिंगपिसाट बुवा खाडे याने गडावर येणाऱ्या महीलांच्या फाटक्या परकरचे पन्नास मुक्के घ्यायचे लायसन काढले आहे का हे एकदा समाज माध्यमांसमोर येऊन सांगावे. परस्त्री रुक्माई समान मानणारे संत तुकोबा कुठे आणि कुठे हा हनुमान गडावरील लिंगपिसाट बुवा खाडे नावाचा मुतखडा? तरीपण संत तुकाराम महाराज व संत भगवान बाबा यांची बरोबरी करणारा लिंगपिसाट बुवा खाडे जसा मनुरूग्ण आणि मनोरुग्ण आहे तसेच त्याने पाळलेले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रदीप जोशींप्रमाणे घोळलेले भक्त लिंगपिसाट नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरवणार नाही का? कारण मराठी महाराष्ट्राचे संपादक संग्राम धन्वे यांना वारंवार काॅल करून तो लाळघोट्या भक्त धमकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्या भडव्याने लिंगपिसाट बुवा खाडेचे फोटो आपल्या बेडरुममध्ये लावून ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी आमच्या घरातल्यांचा देह पडावा सडावा’ असे एकांतात म्हटले तरी त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. पण ते बुवा खाडे बरोबर योगायोगाने खेळलेल्या खेळाचे व्हीडिओ अथवा क्लिप जर समाज माध्यमांवर आल्या तर मग आमच्या लेखण्या थंड बसणार तरी कशा बे येडपट भक्तांनो. या लेखण्या परकराधिपती बुवाचा लंगोट फाडण्यासाठी बंड करून उठणारच हे बुवा खाडेच्या मनोरुग्ण भक्तांनी लक्षात ठेवावे. अशा मनोरुग्ण भक्तांसाठी विद्रोही कवि विश्वंभर वराट म्हणतात की,
“हभपला दिसे वैकुंठी तुकोबा। चंद्रावरी उभा तळीराम ।।१।।
कथेकरी शोधी सुधा सागरात। मद्यपी शिशीत ब्रह्मरस ।।२।।

एक बोले सत्य असुनी नशेत । दुसरा सुशेत मिथ्य सांगे।।३।।
भरी विश्वंभर सत्यानेच झोळी। ढुंगणाने केळी खऊ नका ।।४।।”

स्वतःला वारकरी संप्रदायात असल्याचा बनाव करणारे भामटे शोधून जोपर्यंत समाज यांना पायतानाने मोकळे करणार नाही तोपर्यंत हे मनुचा विचार घेऊन वारकरी संप्रदाय कुरताडून हे लिंगपिसाट वळू संतांच्या विचारांना काळीमा फासण्यासाठी तयारच होणार आहेत. त्यात स्वतःला किर्तनकार म्हणून घेणारे बाळकृष्ण मोगल आणि त्यांची प्रेयशी किर्तनकार मीराबाई खरात यांचा जो पाणपोईचा व्हीडिओ समाजमाध्यमावर आला आहे त्यातून वारकरी संप्रदायाची बदनामी होताना दिसत आहे. अध्यात्माचा मार्ग सांगताना मीरा खरात एका ठिकाणी म्हणतात की, ‘नव्हे खेळ ऐकल्याचा म्हणूनी मेळ जमविला!’ असे म्हणणा-या मीरा खरात यांच्यासोबत बाळकृष्ण मोगल याने जो मेळ घालून घोळ केला तो उभ्या महाराष्ट्राने आडवा करून पाहीला आहे. https://youtu.be/QOYtEMnmJCs?si=BbhzSUxzu3ItNtVp आपल्या कार्यक्रमातून इतरांना अकलेचे डोस देणारी मीरा खरात आणि बाळकृष्ण मोगल या जोडगोळीचे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या घटनेचा निषेध केल्याचा काही पुरावा मिळेल का? हे रामदासी विचारांचे मोहन भागवती पंत आणि नथुराम नावाच्या जंताचे वारसदार ज्याप्रमाणे सुषमा अंधारे यांच्या विरोधात रान पेटवितात तर मग या प्रकरणावर ते काहीच का बोलताना दिसत नाहीत? अध्यात्माचा मार्ग सांगणारे बुवा महाराज खाडे, आसाराम महाराज लोमटे, मीरा खरात आणि बाळकृष्ण मोगल हेच जर एवढे लिंगपिसाट असतील तर मग अध्यात्माच्या मार्गावरून जाताना धक्के देत आणि मुक्के घेत जावे लागणार आहे का? धक्क्या आणि मुक्यांनीच जर अध्यात्म ऐवढे बरबटलेले असेल तर मग तुमचे हे आध्यत्म आणि त्याचे ढोंग चुलीत घाला असे जर तुकोबांच्या वारसांनी म्हटले तर त्यांचे कुठे चुकणार आहे? म्हणून तर ‘मी दासबोध जाळणार आहे!’ या पुस्तकात वीर उत्तमराव मोहीते म्हणतात की, ‘अध्यात्म हा भारताला जडलेला महारोग आहे. आजन्म ब्रह्मचर्य हिंदु संस्कृतीतील भयंकर प्रकरण आहे. हे ब्रह्मचर्य एकतर अपौरुषेय असेल किंवा भ्रष्टाचारी स्वैराचारांनी बुजबुजलेले गटार असेल. रामदासाचे ब्रह्मचर्य कोणत्या ‘खान्यात’ जाऊन पडते ते फक्त अक्कांनाच माहीत ! लग्नात बोहल्यावरून पलायन करणे, मारुतीच्या मठांची स्थापना, पुरश्चरण, तीर्थाटन, चमत्कार हे राज्यक्रांतीचे विषय नाहीत. हे प्रकार आहेत बुवाबाजीचे. बुवाबाजी भारतात चालणारा बदमाश लुटारूंचा प्रचंड नफेबाजीचा धंदा आहे. ढोंगाशिवाय या अध्यात्माला दुसरे भांडवल लागत नाही.’

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असणा-या मलकापूर येथील श्रीक्षेत्र दत्तमंदिर संस्थानचे स्वयंघोषित जंत लोमटे या लिंगपिसाट बाबाने परळी येथील एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती आली. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ वेळ मारून नेण्याच्या उद्देशाने विनयभंगाचा गुन्हा नोंद करून या बाबाचे पाय चाटण्याचे काम केले असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. पोलिसांनी लोमटे नावाच्या नराधमावर केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने त्याला तात्काळ जामीन मिळाल्यामुळे पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने लिंगपिसाट लोमटेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांनी सदरील लिंगपिसाट लोमटेवर गुन्हा नोंद करून त्याला पंढरपूर येथून ताब्यात घेतले. https://youtu.be/sIf1iTKJoqs?si=nbklNrFwqOaPCj1h हरामखोर स्वयंघोषित संत आसाराम नावाच्या विकृत जंताच्या विर्यातील शुक्राणू म्हणजे हाच तो बलात्कारी लोमटे असे म्हटले तर कुठे चुकीचे ठरणार आहे? याने परळी येथील महिलेवर बलात्कार केल्यानंतर त्या महीलेने तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा या महिलेल्या म्हणण्यानुसार जर पोलिसांकडून तक्रार दाखल केली जात नसेल तर हे प्रशासकीय अधिकारी नेमके कोणाचे दलाल आहेत? लोमटे या लिंगपीसाट बलात्कारी बाबावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याऐवजी थातूरमातूर गुन्हा नोंद करून हे पोलिस नेमके काय साध्य करू पाहत आहेत? हीच जर महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या घरातील असती तर अशीच टाळाटाळ येरमाळा पोलिसांकडून झाली असती का? या लोमटेला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे सांगितले जाते त्यावर भोंदुगिरी केल्याचे यापुर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. गुंगीचे औषध देऊन महिलांच्या शरिराचे लचके तोडणारा लोमटे नावाचा कुत्र्या जर येरमाळा पोलिसांकडून पाळला जात असेल तर इतर महिलांच्या सुरक्षेचे काय? आजचे तथाकथित बाजारू कथा आणि कीर्तनकार म्हणजे काय हे मोजक्या शब्दात समजून घ्यायचे असेल तर विद्रोही कवि विश्वंभर वराट म्हणतात की,
“नामयाची गादी मळून सोडती। अस्वले झुलती विणाधारी।।१।।
मुखा येईल ते उगा बरळती। कसोटी लावती ना कोणती।।२।।
जयघोष जरी विठ्ठला विठ्ठला। जीव तो गुंतला पाकीटात ।।३।।
किर्तन म्हणजे नव्हे तो करार । बाले विश्वंभर हभपला ।।४।।”

स्वयंघोषित किर्तनकार बलात्कारी आसाराम लोमटे हा आपल्या कीर्तनातून अविवाहित तरुणांना लग्न न करण्याचा सल्ला देताना म्हणतो की, ज्यांना बायका मिळत नाहीत, त्यांना एक आयडीया सांगतो, खरच लग्न करू नका. https://youtu.be/jtiBj0xlDR8?si=nrdWNSQSZBHaRDLD या आसाराम नावाच्या भडव्यावर जेव्हा बलात्काराचा गुन्हा नोंद झाला तेव्हा हा चोट्टा आपले संस्थान सोडून फरार का झाला. इतिहासात जसा रामदास नावाचा लिंगपिसाट बोहल्यावर पसार झाला तसाच हा लोमट्याचा आसाराम आपल्या संस्थानातून फरार झाला असे म्हटले तर काय चुकीचे आहे? स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणत संताच्या वेशात फिरणारे लोमटेसारखे अनेक जंत सध्या डुकरणीच्या पिलालळीप्रमाणे वाढताना दिसत आहेत. या लिंगपिसाट जंतापासून आपल्या बायका पोरी वाचवा हेच एक सांगणे आहे. कारण अध्यात्म ढोंग आहे, हा च्युत्याचा बाजार आहे असे म्हटले तर ते कुठे चुकीचे ठरवणार आहे. ‘बुवा तेथे बाबा’ या पुस्तकात शाम मानव म्हणतात की, ‘कोणत्यातरी आध्यात्मिक पंथामध्ये सामिल झालेले आणि आध्यात्मिक अनुभूती देणा-या अभ्यासक्रमातून बाहेर पडलेले अनुभूतिप्राप्त शिष्य अक्षरक्ष: डोकं गमावलेली माणसं बनलेली असतात. अगदी प्रजापिता ब्रम्हकुमारीपासून ते रजनीश, मुक्तानंद, हरे रामा हरे कृष्णा, निर्मलमाता इत्यादी पंथ, माणसांचं ब्रेनवाॅशिंग करून त्यांना ‘रोबो’ बनवणारे कारखाने आहेत.’

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. भट बोकड मोठा

२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४

rukmaipub@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.