मनोज जरांगेंचा येवल्याचं येडपट म्हणत छगन भुजबळ यांचेवर निशाणा – आमच्याकडे येणा-या मंत्र्याचे काय हात मोडले आहेत का? म्हणत गिरीश महाजनावर घणाघात

0 103

मनोज जरांगेंचा येवल्याचं येडपट म्हणत छगन भुजबळ यांचेवर निशाणा
– आमच्याकडे येणा-या मंत्र्याचे काय हात मोडले आहेत का? म्हणत गिरीश महाजनावर घणाघात

धुळे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोध्दा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील हे रविवार रोजी धुळे दौºयावर होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांचा उल्लेख येवल्याचं येडपट असा करून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पाऊस नसल्याने कपाशी पिकाची उंची घटल्याने शेतकरी संकटात आहे. त्यावर प्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे सांगत त्यांनी आमच्याकडे येणा-या मंत्र्याचे काय हात मोडले आहेत का? त्यांनी इकडे तळं का नाही बनवलं? असा टोला लगावला मात्र त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा नावाचा उल्लेख टाळला़
मनोज जरांगे हे धुळे दौ-यावर आले असता मराठा आरक्षण मागणीच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खानदेश भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे कपाशी पिकाची उंची घटल्याने शेतक-यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगून तुमच्याकडे मोठमोठाले नेते आहेत, ते आमच्याकडे येत होते. मग इथं त्यांचे हात मोडले आहेत का? त्यांना इकडे पाण्यासाठी तळे बनवता येत नाही का? असे म्हणत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला.
जरांगे पाटील यांनी सभेपूर्वी जुना आग्रा रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेले असता काही कार्यकर्त्यांनी त्यांना धक्का दिला. त्यावेळी त्यांनी संतापून मला जसे धक्के देता तसे राज्यातील मंत्र्यांना असे धक्के देता येत नाहीत का? असा प्रश्न मराठा समाजातील कार्यकर्त्यांना भाषणादरम्यान विचारला.
मराठा समाजाने एकजूट दाखवावी
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने पहिला अहवाल स्वीकारला असून आता दुसरा अहवाल स्वीकारण्याच्या तयारीत आहे. आता २४ डिसेंबर पर्यंत मराठा समाजाची कसोटी आहे. यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून एकजूट दाखवली पाहिजे, असे मनोज जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.