इस्काॅन ही फसवणूक करणारी संस्था गाई कत्तलखान्यात विकते : भाजप खासदार मेनका गांधी – इस्काॅनकडून आरोपावर केली जातेय मलमपट्टी

0 997

इस्काॅन ही फसवणूक करणारी संस्था गाई कत्तलखान्यात विकते : भाजप खासदार मेनका गांधी

– इस्काॅनकडून आरोपावर केली जातेय मलमपट्टी

 

नवी दिल्ली : भाव भक्तीचा मोठा बाजार मांडून बसलेली इस्कॉन ही धार्मिक संस्था मोठी फसवणूक करत असून त्यांच्या गौशाळेतील गाई कत्तलखान्यात विकत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी केला होता. गांधी यांच्या वक्तव्यानंतर इस्काॅनच्या भाव भक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे या आरोपनंतर इस्कॉनकडून प्रतिक्रिया देऊन मलमपट्टी केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इस्काॅन ही कृष्णभक्ती जगातील सर्वात मोठी धार्मिक संस्था आहे. देशातच नाही तर परदेशातही इस्कॉनने मोठ्या प्रमाणात कृष्ण भक्तीचा प्रसार केला आहे. मनेका गांधी यांच्याकडून झालेल्या गंभीर आरोपानंतर इस्कॉनच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. इस्कॉनवर झालेले आरोप खोटे आणि कोणत्याही आधाराशीवाय केलेले आहेत, असे संस्थेचे प्रवक्ते युदिष्ठिर गोविंदा दास यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी प्राणी संरक्षण चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी याआधीही अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या म्हणाल्या होत्या की, ‘इस्कॉन ही देशातील सगळ्यात मोठी फसवणूक संस्था आहे. ते गौशाळा चालवतात आणि सरकारकडून मदत मिळवतात. त्यांनी सरकारकडून मोठी जमीनही घेतली आहे.’ एका व्हिडिओत त्या हे बोलताना दिसत आहेत.

‘मी आंध्रा प्रदेशातील इस्कॉनच्या अनंतपूर गौशाळेला भेट दिली. तेथे मला दूध न देणारी एकही गाय दिसली नाही. संपूर्ण गौशाळेत अशी एकही गाय नव्हती. याचा अर्थ सर्व गाई विकण्यात आल्या आहेत. इक्सॉन या गाई कत्तलखान्यात विकत आहे. त्यांच्या इतकं मोठ्या प्रमाणात असं दुसरं कोणीही करत नाही.’ घृणास्पद ते कार्य करतात. दुसरीकडे ते रस्त्यावर हरे रामा हारे कृष्णा गात असतात. ते म्हणतात त्यांच संपूर्ण आयुष्य दूधावर अवलंबून आहे. त्यांच्या इतक्या गाई दुसरे कोणीही विकल्या नसतील, असे मनेका गांधी म्हणाल्या.

आमच्याकडून गाय आणि बैल या दोघांचीही काळजी घेतली जाते. त्यांच्या सुरक्षेसाठी देशात आणि विदेशातही कटिबद्ध आहोत. गाय आणि बैल यांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपवणूक केली जाते. त्यांना कत्तलखात दिले जात नाही, इस्काॅनचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.