चंद्रयान ३ मधील विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही झोपेतच – इस्रो अंतराळ संशोधन संस्थेचा आव आणि पंतप्रधान मोदींचे भाषण केवळ चर्चेला उधाण देणारे

0 185

चंद्रयान ३ मधील विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही झोपेतच

– इस्रो अंतराळ संशोधन संस्थेचा आव आणि पंतप्रधान मोदींचे भाषण केवळ चर्चेला उधाण देणारे

 

नवी दिल्ली :  इस्रो अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान ३ ही यशस्वी केल्याचा आव आणला त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठ्या तावातावाने भाषणबाजी केली. पण तो आव ती भाषणबाजी केवळ एक बनाव होता अशी चर्चा सुरू आहे. विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही झोपेतून उठलेले नाहीत. २० सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या लँडिंग पॉईंटवर म्हणजेच शिवशक्ती पॉईंटवर सकाळ झाली. सूर्याचा प्रकाश पोहोचला होता. पण त्या प्रकाशाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अजूनही जागे झालेले नाहीत, असे सांगण्यात येत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

इस्रो अंतराळ संशोधन संस्थेची टीम २२ सप्टेंबर २०२३ पासून विक्रम लँडरला वारंवार संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस सूर्यास्त होईपर्यंत आणखी संदेश पाठवत राहतील. पण यावरून तरी असं दिसतंय की, चंद्रयान ३ चार शेवट म्हणजे राम नाम सत्य झाला आहे. भारताने जगाला जे दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आहे.

इस्रोने विक्रम लँडरची यशस्वीपणे लँडिंग केली. प्रज्ञान रोव्हर १०५ मीटर चालवण्यात आला. विक्रम लँडरनेही उडी मारून दाखवले. अनेक आवश्यक वायू आणि ऑक्सिजन सारख्या खनिजांच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारी ही जगातील पहिली मोहीम होती. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला. असला तरी विक्रम लॅंडर आणिप्रज्ञान रोव्हर हे केव्हा उठणार आणि काय काय करणार अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.