अंबाजोगाईत गणपतीच्या आडून वर्णव्यवस्था समर्थक रामाचा उदोउदो : धम्मपालसिंह कांबळे

0 1,243

अंबाजोगाईत गणपतीच्या आडून वर्णव्यवस्था समर्थक रामाचा उदोउदो : धम्मपालसिंह कांबळे

अंबाजोगाई : शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. आनंद व्यक्त करतात, जल्लोष करतात. ज्या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सहभाग घेतात तर त्या उत्सवात कोणत्याही एका जातीचा किंवा विशिष्ट विचारसरणीचा दबदबा दिसून आल्यामुळे नागरिक नाराज असल्याचे समोर येत आहे. यामुळे गणपतीच्या आडून वर्णव्यवस्था समर्थक रामाचा उदोउदो होत असल्याचे शिवस्वराज्यरक्षक सेनेचे धम्मपालसिंह कांबळे यांनी व्यक्त केले.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ज्या काही गोष्टी निदर्शनास अशा गोष्टी आल्या आहेत की ज्या विशिष्ट विचारसरणीच्या आहेत. आणि त्याही देशविघातक विचारसरणीच्या असल्याचे नागरिक सांगत आहेत. यात शिवस्वराज्यरक्षक सेनेचे धम्मपालसिंह कांबळे यांनी सांगितले की, गणपतीच्या आडून ब्राह्मणवादी मनुवादी वर्णव्यवस्थेचा समर्थक रामाचा उदोउदो करणे. किंवा स्वतःची आई रेणुका मातेची हत्या करणारा आतंकवादी परशुराम असेल, किंवा रामाला प्रत्येक गोष्टीत मदत करणारा हनुमान असेल यांचाच उदोउदो संपूर्ण मिरवणुकीत आढळून आला. ज्या गाण्यावर बंदी आहे ते मंदिर वही बनाएंगे गाणं लावून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा हेतू असावा, कारण लग्न एकाच पत्रिकेवर नाव दुसऱ्याचं आणि हार घालतोय तिसराच अशी परिस्थिती पहायला मिळली.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गाणे कोणते तर अर्ध्या राती सोडून जायाचं नाही, मला प्रितीच्या झुल्यात झुलवा, मला म्हणतात हो पुण्याची मैना, शांताबाय, कारभारी दमानं अंग भिजलं घामानं गाणे सांगण्याचा उद्देश हा की ज्यामुळे नृत्यांगना गौतमी पाटील ला अश्लील म्हटलं जातं तेच गाणे लावून ज्याला देव म्हणतात त्याच्यापुढेच अश्लीलतेचा कळस गाठला काही भोंदू भक्तांनी, असेही त्यांनी सांगितले.

माझ्या माहितीप्रमाणे हा सगळा खटाटोप आहे तो बहुजन समाजाची दिशाभूल करण्यासाठी कारण गणेशोत्सव साजरा करणारे सामाजिक एकतेचा संदेश देवून एकत्र येऊन फक्त नाचगाणी न करता वैचारीक कार्यक्रम राबवत होते.हे कुठेतरी मनुवादी विचारसरणीच्या लोकांना खटकत असावं म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गणपती चा उदोउदो न करता वर्णव्यवस्था समर्थक रामाचा, आईचा हत्यारा परशुराम आणि प्रत्येक गोष्टीत रामाला मदत करणारा हनुमान यांचा उदोउदो केला. तसेच बौद्ध लोक असं म्हणतात की गणपती हा बौद्ध आहे. म्हणून सुद्धा गणपती ला बदनाम करण्याचा कट अंबाजोगाई येथील RSS च्या शाखेत झाला असावा असा माझा आत्मविश्वास आहे, असे कांबळे म्हणाले. याशिवाय त्यांनी बहुजन समाजाने जागरूक होऊन या मनुवाद्यांचा घातकी कावा ओळखावा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून बहुजनांना एकत्रित करण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.