परळीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंत्राटी नोकर भरती जीआरची होळी करून सरकारचा निषेध

0 23

परळीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंत्राटी नोकर भरती जीआरची होळी करून सरकारचा निषेध

 

परळी ( प्रतिनिधी) : तरुणांचे भवितव्य अंधारात घालणाऱ्या राज्य शासनाच्या कंत्राटी नोकर भरती जीआरची परळी वै येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने होळी करून सरकारचा आणि या कंत्राटी जीआर चा जाहीर निषेध करण्यात आला. परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे दि.18 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कंत्राटी नोकर भरतीच्या जीआर ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

सध्या शासनाने महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली पण ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करून लाखो तरुणांचे भवितव्य अंधारात ढकलणारा हा निर्णय असून या कंत्राटी भरती मध्ये जर एखाद्या पदावरील कर्मचाऱ्याची मूळ पगार ही 10000 रुपये असेल तर शासनाचा कंत्राटी कंपनीची व इतर शासकीय कपाती वगळता त्या कर्मचाऱ्यांच्या हातात मूळ पगारीच्या स्वरूपात अवघे 6000 हजार रुपये पडतील यामुळे हा फायदा शासनाचाही नाही आणि काम करणाऱ्या तरुणाचाही नाही हे फक्त काही कंपन्यांचा फायदा करण्यासाठी सरकारने ही कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे याचा निषेध म्हणून आज परळी येथील राणी लक्ष्मी टावर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या जीआरची होळी करून शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहरअध्यक्ष ॲड जीवनराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, तालुका उपाध्यक्ष भागवत गीते, शहर कार्याध्यक्ष महबूब कुरेशी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शंकरराव शेजुळ, तालुका कार्याध्यक्ष शुभम नागरगोजे, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज ,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, युवक नेते शरदराव चव्हाण, असलम भाई पठाण, पांडुरंग जाधव ,शेख खदिर, माणिक, करण ,शेख आजम, शेख अक्रम, प्रवीण सोनवणे यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.