खामगावात प्रगटला ‘तो’ भुरटा गजाननाची वेशभूषा धारण केलेला ‘बहुरूपी’ लातूरचा रहिवासी जवळा पोलीस पाटलांकडून झाडाझडती

0 1,147

खामगावात प्रगटला ‘तो’ भुरटा

गजाननाची वेशभूषा धारण केलेला ‘बहुरूपी’ लातूरचा रहिवासी जवळा पोलीस पाटलांकडून झाडाझडती

खामगाव : विदर्भात प्रसिद्ध असलेल्या गजाननाची वेशभूषा धारण करून त्यांच्यासारख्या दिसणा-या प्रगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा शोध लागला असून त्याची शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील पोलीस पाटलांनी झाडाझळती घेतल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे सदरचा हा बहुरूपी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचेही विश्वसनीय माहिती मिळाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की हुबेहूब श्री गजाननाची व्यक्तिरेखा साकारणारा व्यक्ती हा लातूर जिल्हा बँकेचा खातेधारक असल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्तीचे नाव हे रामराव शेषराव बिराजदार हे असल्याचे त्याच्या खाते चुक वरून दिसून येत आहे. बिराजदार नामाच्या व्यक्तींचे खाते हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असून त्यावर मुक्काम पुगी (सावंगी) पोलीस स्टेशन राणी जिल्हा लातूर असा पत्ता लिहिलेला आहे. सदर व्यक्तीला दोन दिवसापूर्वी शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा बुद्रुक या गावात नागरिकांनी पकडले होते या गावातही त्यांनी श्री गजाननाचा वेष धारण करून त्यांच्यासारखाच पेहराव करून नागरिकांच्या धार्मिक भावनांना आकर्षित केले होते सदरची व्यक्ती ही स्वतःच्या दुचाकी वर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून आली नसून ती स्वतःमध्ये गजाननाचा वास असल्याचा आभास गावागावातील नागरिकांना करून देत आहे काल दिनांक सप्टेंबर हो व्यक्ती सुटाळपूरा स्थित

रोजी अवलिया खामगावातील श्री गजानन मंदिर परिसरात आली होती या ठिकाणी विविध नागरिकांनी आकर्षित होऊन त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले होते व गजाननाची उभेहुब व प्रतिकृती साकारल्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सदर व्यक्ती कुठून आली तिचे नाव गाव पत्ता या संदर्भात वारंवार विचारणा होत होत्या अखेर त्या व्यक्तीच्या कागदपत्रावरून तिचा शोध लागला आहे. सदरची व्यक्ती आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शेगाव तालुक्यातील जवळा येथून स्वतःची दुचाकी घेऊन रवाना झाली असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे नागरिकानी धार्मिकतेच्या आपल्या भावना जपताना किमान काळजी घेणे आवश्यक असल्याचे या गोष्टीवरून दिसून येत आहे विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला आता काय म्हणावे? याबाबतही तर्क वितर्क लावल्या जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.