पेपरनेच त्या शहराचा खून केला

0 65

पेपरनेच त्या शहराचा खून केला

 

दंगलकार नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली
7020909521 ( व्हाट्सअप )

 

” शहरात पेपर यायचा
घराघरात जायचा
बातम्या वाचून
चौकात चर्चा व्हायची
बातम्या पाहून माणसं
रस्त्यावर यायची..
बातमीवर विश्वास वाढत गेला
पेपर ही तसा खपत गेला
पेपरची किंमत वाढली तशी
पेपरचा रंग बदलू लागला
बातमीचा ढंग बदलू लागला

त्या पेपर वाचणाऱ्या शहरात
मी परवा जाऊन आलो
तिथं बघितलं
त्या शहरात माणूसच जिवंत नव्हता
त्या पेपरनेच त्या शहराचा खून केला होता
ही बातमी मी माझ्या शहरातल्या
संपादकाला सांगितली
म्हणलं साहेब हे आपल्या पेपरात छापा
संपादक हसत म्हणाला
महोदय या ही शहराचा केव्हाच खून झालाय
मी ही मेलेलो आहे
आणि तुम्हीही जिवंत नाहीत. “

Leave A Reply

Your email address will not be published.