ब्रिजभूषणवर कार्यवाही करून खेळाडूंना न्याय द्यावा भारत मुक्ती मोर्चा व शिवस्वराज्यरक्षक बहूजन सेनेची मागणी

0 75

ब्रिजभूषणवर कार्यवाही करून खेळाडूंना न्याय द्यावा भारत मुक्ती मोर्चा व शिवस्वराज्यरक्षक बहूजन सेनेची मागणी

बीड (प्रतिनिधी) : जंतर मंतर येथे महीला कुस्तीपटू यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर करवाई करावी या मागणीसाठी त्या टाहो फोडत आहेत. मात्र त्याकडे केंद्र सरकार व भाजपाचे नेते कानाडोळा करत कर्नाटक मध्ये रॅली काढत आहेत.

या कुस्तीपटू मुलींना समर्थन देण्यासाठी काॅग्रेससह शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत हे गेलो होते. त्या सरकाराला १५ दिवसांचा अल्टिमेट दिला आहे. आंदोलन करणा-या मुलींना न्याय मिळावा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा व शिवस्वराज्यरक्षक बहूजन सेना बीडच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांचेमार्फत राष्ट्रपतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर यौन शोषणाचे आरोप करण्यात आले असून तसा गुन्हाही नोंद झाला आहे. त्यांना अटक करून त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी मुलींनी लावून धरली आहे. देशभरातून या आंदोलनाला समर्थन मिळत आहे. त्यात भारत मुक्ती मोर्चा व शिवस्वराज्यरक्षक बहूजन सेना यांनीही आपले समर्थन देऊन या मुलींना न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रपतीकडे केली आहे. यावेळी भारत मुक्ती मोर्चा व शिवस्वराज्यरक्षक बहूजन सेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.