कालीचरणवर गुन्हा दाखल

0 95

कालीचरणवर गुन्हा दाखल

नांदेड : कालीचरण नामक व्यक्ती नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतो. त्याने रामनवमी दिवशी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रविवारी ०९ एप्रिल रोजी राम नवमी निमित्त आयोजित केलेल्या धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी कालीचरण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

राम नवमी निमित्त धर्मासभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून कालीचरण याने भाषण केले होते. यावेळी त्यांने आपल्या भाषणा दरम्यान काही वादग्रस्त विधाने देखील केली होती. आणि याच कारणामुळे बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम १५३ अ, २९५ अ आणि ५०५ – २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कालिचरण यांच्या अडचणी आणखी वाढणार का ? हे पाहणे हेही तेवढंच खरं आहे.

यापूर्वी देखील कालीचरण याने महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर करून नथुराम गोडसेच उदात्तीकरण केल होत. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कालीचरण विरोधात गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.