मद्रास उच्च न्यायालयाचा २६९ अधिकाºयांना दणका – आदिवासी महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

0 28

मद्रास उच्च न्यायालयाचा २६९ अधिकाºयांना दणका
– आदिवासी महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

चेन्नई : तामिळनाडूमधील मद्रास उच्च न्यायालयाने चंदन तस्करांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वसाहतीत छापा टाकल्याप्रकरणी २६९ सरकारी अधिकाºयांना शिक्षा सुनावल्यामुळे दणका बसला आहे. या छाप्यादरम्यान कॉलनीत राहणाºया लोकांवर अधिकाºयांकडून अत्याचार तर १८ महिलांवर बलात्कार करण्यात आला. तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील वाकाठी आदिवासी गावात ३१ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दलही उच्च न्यायालयाने खेद व्यक्त केला.
चंदन तस्करांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वसाहतीत छापा टाकून दुष्कृत्य करणाºया आरोपींपैकी १७ जणांना १८ महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले, त्यापैकी एक त्यावेळी आठ महिन्यांची गर्भवती होती आणि दुसरी १३ वर्षांची अल्पवयीन होती. खटल्यावर सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील 50 हून अधिक आरोपींचा मृत्यू झाला, तर बाकी आरोपींना सत्र न्यायालयाने २०११ मध्ये एक ते १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवल्या.
उच्च न्यायालयाने म्हटले, खºया तस्करांचा बचाव करण्यासाठी अधिकाºयांनी हा छापा टाकण्याचे नाटक केले. धाडींच्या नावाखाली निष्पाप आदिवासी महिलांवर अत्याचार करण्यात आला़ या महिला मुलींना होणारा त्रास, पैसा आणि नोकरी मिळण्यात येणाºया अडचणी लक्षात घेऊन त्यांना भरपाई मिळायला हवी़ न्यायमूर्ती पी वेलमुरुगन यांनी तामिळनाडू सरकारला १८ महिलांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ जारी करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.