आमच्या नेतृत्वाचा दोष आहे ?

जेम्स लेन या विदेशी लेखकाने पुरंदरेंच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास मांडला तेव्हा न्यायालयाने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हे गोंडस नाव देवून त्यावर कार्यवाही केली नाही. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यात येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर मग आता तुम्ही या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रपतीला भेटून निवेदन देणार का ? तेव्हा जाणते राजे ? म्हणाले की, 'मला काय एवढंच काम आहे का ?'

0 336
आमच्या नेतृत्वाचा दोष आहे ?

 

 नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२७३६६६२
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक

 

मा. जितेंद्र आव्हाड यांची जाणीवपूर्वक केलेली अटक निषेधार्य आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे. हा मनुवादी लांडग्यानी इतिहासवर घातलेल्या घाला आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो…..
ब्राम्हणी सिनेसृष्टी निर्मित ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून मनुवादी लांडग्यांनी इतिहासावर झडप घालत त्याला छिन्नविछिन्न करण्याचं महापाप केले. त्यामुळे संतप्त शिवप्रेमींच्या भावणा अनावर झाल्यामुळे ठाण्यात चित्रपटाला विरोध करताना तिथे एका प्रक्षेकाला झालेल्या थोड्याशा धक्काबुक्कीमुळे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. जितेंद्र आव्हाडांना अटक केल, कारण गृहमंत्रालय त्यांचं आहे ? पोलिस यंत्रणेला हाताशी धरून हे सर्व खेळले जात आहेत. पण, जेव्हा गृह मंत्रालय आमच्या ? म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या हातात होत तेव्हा पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी विचारांचं विष भिडे एकबोटे हे दोन मनोरुग्ण रात्रंदिवस करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करत होते, तेव्हा त्यांना का अटक झाली नाही याचा आम्ही कधी विचार करणार आहोत ? कारण काल आणि. आज शिवरायांचा इतिहास विकृत करणारांना हार आणि विकृतींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारांना मार दिला जात असेल ही खुप मोठी शोकांतिका आहे. विकृती ह्या काल आणि आजही आहेत त्याच भिडे एकबोटेंना पाठीशी घालणारे लोक राष्ट्रवादी पक्ष चालवतात ? असं जर कोणता शहाणा माणूस म्हटला तर त्यांच काय आणि कुठे चुकेल ? भिडे एकबोटे ह्या जोडगोळीने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महाराष्ट्रात मोकाट फिरून अनेक भडकाऊ विधाने करून जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण त्या जोडगोळीवर महाविकास आघाडीच्या गृमंत्रालयाने कोणती कार्यवाही केली ? केली नसेल तर का केली नाही ? भिडेंशी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जवळचे संबंध आहेत म्हणून कार्यवाही टाळली का ? .’
इतिहासाच्या पानापावर आपल्या जिव्हेने दंश करणा-या बाबा पुरंदरे या विषारी सर्पाला मांडीवर घेऊन दुध कोणी पाजले ? यांचं उत्तर अनेकांना येऊ शकणार नाही. बर त्यांनी उत्तर दिलेच तर ते एकतर्फी नसेल कशावरून. कारण राष्ट्रवादीचे नेते मा. अजित दादा पवार यांचे स्टेटमेंट व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेबांचे शिवद्रोही बाबा पुरंदरेला हात जोडतानाचे फोटो पाहील्यास एका क्षणात कळत पण ते फक्त अक्कल असलेल्यांना. मेंदु ठिकाणावर नसलेल्यांना तर पुरंदरे जीव कि प्राण वाटतोच आहे, त्यामुळेच तर राज ठाकरे बेंबीच्या देठापासून पुंरदरे एके पुरंदरे या नावाचा जप करत महाराष्ट्रात विषारी विचारांची पेरणी करत आहेत. पण खरा मुद्दा असा आहे की, पुरंदरे नावाचा विषारी वृक्ष संगोपणात कोणाचे हात बरबटलेले होते हेही आम्हाला कधी तरी समजून घ्यावं लागेल. तेव्हाच आपण ज्याला आपले नेतृत्व म्हणतोय ते आपले आणि आपल्या विचारांचे आहे का हे स्पष्ट होईल, अन्यथा भक्तांचा थवा तर ‘साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं !’ म्हणत बोंबाबोंब करत साहेबांच्या वेळोवळी बदलणा-या भुमिकांचे समर्थन करून आपल्या बुद्धीला अवैचारिक अश्व लावून घेत आहे त्यात काहीच नवल नाही. जेव्हा शिवद्रोही बाबासाहेब पुरंदरे याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तेव्हा राष्ट्रवादीचे पक्षाचे जितेंद्र आव्हाड त्याला विरोध करत होते तर दुसरीकडे मात्र पुरस्काराचे समर्थन करताना अजित पवार म्हणाले की, आमच्या पक्षातील एखाद्या व्यक्तीच वेगळं मत असल म्हणजे सर्वांचीच मत तशी असतात असं समजण्याच काही कारण नाही. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार जातो आणि त्याच स्वागत मी स्वतः करतो. https://youtu.be/HlsBHO-SvRs त्यामुळे प्रा. मा. म. देशमुख म्हणतात की, ‘काॅग्रेस (राष्ट्रवादी ?)आणि भाजप एकाच मनुवादी माळेचे मणी आहेत. त्यांना स्वतः पुरते बघायचे आहे. जिजाऊ, शिवराय किंवा बहुजन समाज यांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही.’
केवळ शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते असं प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची धमक झालीच नसती पण आपल्याच घरात सुर्याजी पिसाळ नीपजत आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. असे सुर्याजी पिसाळ जेव्हा ब्राम्हणांच्या गोटात व बहुजनांच्या पोटात शिरून दोघांनाही खुष करतात तेव्हा ते संपूर्ण समाजासाठी हानीकारक ठरते. कारण ब्राम्हणांच्या गोठातून घेतलेला विचार आमच्या पोटात मारला जातो तेव्हा त्याचं विष बनलं जात. हे काम कोणी केल हे वाचकांना समजण्याइत तरी काही वाचक जागृत आहेत, हीच वैचारिक क्रांती आहे. पण जेव्हा पुरंदरे यांच खुप मोठं योगदान आहे असं म्हणून मा. अजित दादा कोणाचे देव्हारे माजवत आहेत याचा त्यांच्या भक्तांनी कधी विचार केला होता का ? म्हणून तर आमची लोक नीट वैचारिक व जागृत झाली पाहीजेत. पण आमच्या लोकांची खरी अवस्था म्हणजे ‘दादा बोले आणि कार्यकर्ता हाले’ अशी आहे. त्यामुळे आपण ज्यांना आपले म्हणतो ते लोक तर कालपर्यंत पुरंदरेंच्या पायावर लोळण घेत होते त्यांच्या पक्षाकडून शिवसन्मानाची अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या गायीचे दूध काढण्यासारखे आहे. कारण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर आपली प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणतात की, नव्या पिढीला इतिहास समजावा म्हणून साध्या भाषेत त्यांनी शेकडो व्याख्याने दिली, त्यांच इतिहासासंबधी जी आस्था निर्माण केली ती विसरता येणार नाही. https://youtu.be/dtoBUH04bPg म्हणून तर प्रा. मा.म. देशमुख म्हणतात की, ‘आपल्या जातीचा माणूस मोठ्या पदावर आला मंत्री झाला म्हणजे आपल्या जातीची प्रगती होईल, हा समज चुकीचा आहे, हे आज जाणकार बहुजनांच्या लक्षात आले आहे.’
‘भिडे असो की एक दीड बोटे
राजकारण्यासंगे त्यांचे साटेलोटे
राजकारणी सगळेच पाय चाटे
आपण उगीच मोडतो बोटे !’
विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे शब्द एकदम सत्य आणि वास्तवादी आहेत.
पुरंदरे या विषारी सर्पाचे तोंड ठेचण्यासाठी महाराष्ट्रात पुरंदरेच्या विघ्नसंतोषी कार्याचा भांडाफोड करून शिवजागर करणारे मा. आ. जितेंद्र आव्हाड यांचा अभ्यास व कार्य खुप कौतुकास्पद असून ते आपल्या वाणीतून नेहमी पुरोगामी विचारांचा प्रसार प्रसार करतात. त्यांच्यासारखा व्यक्ती आजपर्यंत तरी राष्ट्रवादी या पक्षात झालेला दिसत नाही, बाकी सगळेच होयबा आहेत असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ?. पण मा. आव्हाडांनी सांगितलेले विचार राष्ट्रवादीच्या किती कार्यकर्त्यांनी जोपासले आहेत ? त्यांचे ते विचार राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्टींनी कधी मान्य केलेत का ? आव्हाडांच्या भुमिकेच राष्ट्रवादीच्या पक्षाने कधीतरी खुले समर्थन केले आहे का ? त्यांची ती वैयक्तिक भुमिका आहे असं म्हणून अंग काढून घेणारे कोण आहेत हे महाराष्ट्रातील लोक जाणुन आहेत. मा. अमोल मिटकरींनी जेव्हा आपला ब्रिगेडी बाणा राष्ट्रवादीच्या स्टेजवरून दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आपले पांढरेशुभ्र दात उभ्या महाराष्ट्राला दाखवले. पण मा. मिटकरींना ब्राम्हणांनी विरोध केलेला विरोध पाहुन राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा लंगोट पिवळा झालेला उभ्या महाराष्ट्राने पाहीला होता. त्यामुळेच तर मा. धनंजय मुंडे व मा. जयंत पाटील यांनी या प्रकरणातून काढता पाय घेत ब्राम्हणांची तळी उचलत ब्राम्हणांचा आपल्या तोंडून गौरव करत मिटकरींचे ते ‘वैयक्तिक मत’ आहे असे गोंडस नाव देऊन त्याला शिक्का मारला. पण आमची लोक समर्थन का करत नाहीत यांचं मार्मिक उत्तर प्रा. मा.म.देशमुख आपल्या भाषेत देताना म्हणतात की, ‘अनेकांच्या तोंडात ‘पदांचे तुकडे’ असल्यामुळे ते बहुजन समाजासाठी तोंड उघडत नाहीत.’
मम भार्या समपर्यामी ह्या ब्राम्हणी गौडबंगालाविषयी मा. अमोल मिटकरींनी जे मत पक्षाच्या स्टेजवरून प्रकट केले ते यापुर्वी शामराव कुलट यांनी पुस्तक रुपाने महाराष्ट्रातील वाचकांना समजून सांगितले आहे. त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन राष्ट्रवादीचे नेते मिटकरींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले असते तर उभ्या महाराष्ट्राने राष्ट्रवादी पक्षाला डोक्यावर घेतले असते. पण भटांचे चाट्ये आमचेच असतील तर भटांना दोष देण्यात अर्थच काय ? मा.अमोल मिटकरींच्या वक्तव्यामुळे ब्राम्हणांची मने दुखावली म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी बैठक आयोजित करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आता कुठे आहेत ? ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून दाखवलेल्या चुकीच्या इतिहासामुळे संबंध शिवप्रेमींच्या भावणा दुखावल्या आहेत हे ब्राम्हण समाजातील एखाद्या तरी तुम्हाला चांगल्या वाटणा-या ब्राम्हणाला समजत नसेल का ? मग आपल्या भावनांची कदर करून त्या विकृतींविरोधात ब्राम्हणांनी कधी आणि कुठे बैठक ठेवली आहे ? यांचे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ब्राम्हणांची बैठक आयोजित करणारे जिल्हाध्यक्ष यांना मिळाली आहे का ? म्हणून तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, ‘चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा आहे.’ म्हणून हे चांगले वाटणारे शेंगदाणे आजपर्यंत कोणी चघळले हे आता नव्याने वाचकांना सांगण्याची अजिबात गरज वाटत नाही.
‘हर हर महादेव’ चित्रपटात ब्राम्हणी मानसिकतेने चित्रीकरणातून आमच्यापुढे हेमले उभे करून त्यांना मावळे म्हणून प्रस्तुत केले मग आमचे राजकीय पुढारी आपल्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणा-या वैचारिक मावळ्यांना पाठबळ देऊन त्यांना इतरांपुढे प्रस्तुत करण्यापेक्षा ब्राम्हणांमधील पुरंदरे सारख्या हेमल्यापुढे नतमस्तक होतात हा ब्राम्हणांचा दोष नाही तर आम्ही ज्याला आमचं नेतृत्व समजतो त्यांचा दोष आहे. जेम्स लेन या विदेशी लेखकाने पुरंदरेंच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास मांडला तेव्हा न्यायालयाने ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हे गोंडस नाव देवून त्यावर कार्यवाही केली नाही. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यात येणार नाही असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर मग आता तुम्ही या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रपतीला भेटून निवेदन देणार का ? तेव्हा जाणते राजे ? म्हणाले की, ‘मला काय एवढंच काम आहे का ?’ (अधिक माहीतीसाठी वाचा थर्ड आय ). तेच जाणते राजे आज वेळात वेळ काढून ब्राम्हणांची मनधरणी करतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणुन इतिहासाच्या विकृतीकरणासाठी आमच्याही लोकांचा फुल नाही फुलांची पाकळी एवढा हातभार लागत आहे म्हणून तर भटांच धाडस होत आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून तर व्यक्तीपुजा करणा-यासाठी भाई माधवराव बागल म्हणतात की, ‘पुजा ही महाभयंकर गोष्ट आहे, या वारुळातून अनेक विषारी सर्पाची निपज झाली आहे.’
जी पुस्तके लोकप्रिय झाली, ज्यांच्या हाजारो प्रती निघाल्या. त्या लोकांना वाचल्या आणि घराघरात ठेवल्या हे बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. पण माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरे इतका अन्याय  दुसरा कोणी केला नाही.
https://youtu.be/xQ-YpO1WYlE असे जेव्हा म्हटले तेव्हा वेळ निघून गेली होती म्हणून तर श्रावण देवरे म्हणतात की, शरद पवारांना बाबा पुरंदेंच्या विरोधातील आज जे शहाणपण उशिराने सूचलेले आहे, ते त्याच ऐन उभारीच्या काळात सुचले असते, तर महाराष्ट्रात आज पेशवाई उरावर बसलेली दिसली नसती.
http://balshalibharat.in/25523/ आम्ही ज्यांना आमचे नेतृत्व म्हणून मान्य करतो ते आमच्या महापुरुषांच्या विचारांशी कट्टीबध्द आहेत का याचा विचार आपण कधी करणार आहोत ? भट नालायकच आहेत पण आमचे राजकीय नेते उघडपणाने त्यांना साथ देत असतील ते शहाणे कसे ? याचाही थोडासा विचार करा. शेवटी एकच सांगतो की, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ते मुसळ आणि कुसळ दोन्ही बघण्याची क्षमता निर्माण करा. ही क्षमता केवळ पुस्तक वाचल्याने येते झेंडे दांडे घेऊन साहेब हम तुम्हारे साथ हैं ! म्हटल्याने येत नाही. म्हणून तर मा.म. देशमुख म्हणतात की, ‘प्रदलोभी, प्रसिद्धीलोलुप, स्वार्थी, ढोंगी आणि भ्रष्ट कार्यकर्ते आणि पुढारी ह्यांच्यापासून संघटन वाचवावे लागेल. असे केले तरच हा सडलेला मनुवाद गाडून टाकणे शक्य होईल.’

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

२. भट बोकड मोठा

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला

संपर्क रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२, ९७६४४०८७९४

Leave A Reply

Your email address will not be published.