ज्ञानेश्वर गिरी यांना किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचा महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार २०२२ जाहीर

0 77

ज्ञानेश्वर गिरी यांना किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचा महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार २०२२ जाहीर

 

केज : तालुक्यातील माळेगांव येथील भुमिपुत्र तथा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे, व महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाज वादक,उच्च शिक्षित बी फार्मसी ही पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून प्राप्त केलेले तसेच राजमुद्रा मेडिकल फौंडेशन स्थापन करून आरोग्य क्षेत्रात कामगिरी करून नाव, वंचित उपेक्षित बहुजन समाजातील लोकांच्या अडचणीला कायम धावून जाऊन, असे विविध क्षेत्रात नावलौकिक करून आपली ओळख निर्माण करून तसेच ते राजकीय पक्षाचे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा प्रवक्ते म्हणून सध्या काम करत आहेत.युवा नेतृत्व मा. ज्ञानेश्वर (माऊली) गिरी यांना या वर्षीचा मानाचा आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेला महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार २०२२ हा पुरस्कार किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव ता.कणकवली . जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने अध्यक्ष श्री ऋषीकेश मोरजकर यांनी जाहीर केला.
आजपर्यंत समाजातील कष्टकरी शेतकरी बांधवांना आरोग्य सेवा देण्यासाठी ज्यांनी अनेक आरोग्य शिबीरे आयोजित करुन जनसेवा जोपासण्यासाठी मेहनत घेतली या कार्याची विशेष दखल झाल्याने मित्र परिवार यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे समाधान व्यक्त केले असुन येणाऱ्या काही दिवसांत सदरील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज गिरी यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच विविध क्षेत्रातील मित्र परिवारांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.