कर्नाटकातील बसवना बागेवाडीत इव्हीएम मशिन्सची तोडफोड

0 3,252

कर्नाटकातील बसवना बागेवाडीत इव्हीएम मशिन्सची तोडफोड

विजापूर : बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मागील अनेक दिवसांपासून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत EVM भांडाफोड परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली होती. त्यांचा परिणाम आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी झाल्याचे दिसत असल्याचे बोलले जात आहे. विजापूर जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यात मतदारांकडून रुद्रावतार धारण करून EVM मशीन रस्त्यावर आणून फोडली.

इव्हीएम मशिन्सच्या माध्यमातून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु त्याकडे कानाडोळा करून केंद्र सरकार व निवडणुक आयोग त्याच इव्हिएमचा वापर करून देशातील निवडणुका पार पाडताना दिसते. त्यामुळे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने इव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून इव्हीएमच्या माध्यमातून कसा घोळ केला जातो याची जनजागृती केली होती. त्या प्रबोधनाचा समाजात झालेला परिणाम आज कर्नाटक मधील बसवना बागेवाडी येथे पहायला मिळाला.

आज दि. १० रोजी एका भाजप नेत्याच्या गाडीत एव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली तेव्हा स्थानिकस लोकांनी या वाहनात असलेल्या ईव्हिएम मशीनला पकडल्या तेव्हा यामुळे लोकांमध्ये प्रचंड उद्रेक दिसून आला. वाहनातील इव्हीएम मशीन काढून तोडफोड केली. या जमलेल्या जनतेने तीव्र संताप व्यक्त करत भाजपविरूद्ध जोरदार घोषणा दिल्या. जनता आता जागरूक झाली आहे त्यामुळे भाजपची आता काही खैर नसल्याचे नाही अस जमलेल्या लोकांनी म्हटल्यामुळे देशभर ईव्हीएमबाबत (EVM) चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.