ग्रामस्थांच्या मदतीने विधवा भावजयी सोबत विवाह

"गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच नातेवाइकांच्या पाठबळामुळे मी पुजा हिच्यासोबत विवाह केला. जयराजचा स्वीकार केला. अर्थात पाच वर्षांपासून हा विवाह व्हावा अशी ज्येष्ठ ग्रामस्थ, माझ्या मित्रांची इच्छा होती. मात्र समाजातील रूढी, परंपराही समोर होत्या. मात्र सर्वांनी एकमताने या विवाहासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेता आला असं सचिन मरकड यांनी सांगितले."

0 611

ग्रामस्थांच्या मदतीने विधवा भावजयी सोबत विवाह

 

घनसावंगी : तालुक्यातील खालापुरी येथे ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने विधवा भावजयीसोबत दिराचा विवाह लावण्यात आला. हा विवाह संपन्न झाल्यामुळे या आदर्श विवाहाचे कौतुक होत आहे.

खालापुरी येथील भिका नाना मरकड यांना नितीन व सचिन अशी दोन मुले होती. त्यातील नितीन हा थोरला मुलगा त्याचे लग्न सहा वर्षापूर्वी देवहिवरा येथील पूजा या मुलीसोबत झाले होते. त्यानंतर या जोडप्याला जयराज हा मुलगाही झाला. मात्र दुर्देवाने लग्नानंतर केवळ वर्ष झाल्यावर नितीनला किडणीचा आजार झाला. तेव्हा त्याच्या उपचारासाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी सहकार्य केले केले, मात्र त्यात त्याचे निधन झाले. तेव्हा त्याची पत्नी पुजा हीचे वय केवळ १९ वर्ष होत तर त्यांचा मुलगा जयराज हा सहा महिन्यांचा होता.

“गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच नातेवाइकांच्या पाठबळामुळे मी पुजा हिच्यासोबत विवाह केला. जयराजचा स्वीकार केला. अर्थात पाच वर्षांपासून हा विवाह व्हावा अशी ज्येष्ठ ग्रामस्थ, माझ्या मित्रांची इच्छा होती. मात्र समाजातील रूढी, परंपराही समोर होत्या. मात्र सर्वांनी एकमताने या विवाहासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे हा धाडसी निर्णय घेता आला असं सचिन मरकड यांनी सांगितले.”

नितीनच्या दूर्देवी निधनानंतर मुलीच्या आईवडीलांसह तीच्या सासू-सासऱ्यांना पूजाच्या भविष्याचा प्रश्न भेडसावत होता. तेव्हा गावातील उद्धव मरकड, किशोर मरकड, रणवीर मरकड, डॉ. गाडगे यांनी पुजा हिने आपला दिर सचिनसोबत विवाह करावा, असा विचार मांडला. मात्र त्यावर निर्णय न झाल्याने तो काहीसा लांबणीवर पडला. त्यावेळी गावातील जेष्ट ग्रामस्थ व नातेवाइकांसोबत संवाद करून पुजा व सचिन यांना विश्वासामध्ये घेऊन विवाहासंबंधी बोलणी करून निर्णय घेण्यात आला. तेव्हा दोघांनीही हा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगितले. मग सोमवारी (ता. ८) संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर माळाच्या गणपती मंदिर येथे सचिन आणि पुजा यांचा विवाह झाला. ग्रामस्थांनी या विवाहानंतर आनंद व्यक्त करत त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.