हळदी समारंभात भारतीय संविधानाचे वाटप

0 116

हळदी समारंभात भारतीय संविधानाचे वाटप

अंजलीताई भोईर यांचा अभिनव उपक्रम

 

ठाणे : ओबीसी समाजाच्या ठाणे जिल्ह्यातील मौजे नारीवली गावच्या अंजलीताई भोईर यांनी हळदी समारंभात चक्क पाहुण्यांना मानपान भेट म्हणून भारतीय संविधान वाटप केले, त्यामुळे त्यांचे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच कौतुक होत आहे.

आज गावखेड्यात हळदीच्या पाहुण्यांना मानपान साडीकार्यक्रमात म्हणुन चोळी, टॉवेल-टोपी असे मानपानातून पारंपरिक पद्धत म्हणून भेट वस्तू दिली जाते. परंतु ते न देता आपला अधिकार म्हणून संविधान पुस्तिका भेट देऊन देण्याचा प्रयत्न अंजली ताई भोईर यांनी केला, हीच खरी ओबीसी समाजात परिवर्तनाची नांदी असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. ओबीसी समाजात किंवा कोणत्याही अन्य समाजात हळदी सारख्या समारंभात लगीन सराईतीत लाखो रुपयांची उधळण करून श्रीमंतीचे दर्शन घडविले जाते. अमाप असा खर्च महागडे पुष्पगुच्च, शॉल किंवा इतर महागड्या वस्तू देखील मानपान म्हणून दिल्या जातात. ह्या सर्व गोष्टी वायफळ खर्चिक आहेत असा अंजलीताई भोईर यांचा मानस असल्याने म्हणुनच त्यांनी हळदी समारंभात भारतीय संविधान भेट म्हणून देण्याचे ठरवले.

Leave A Reply

Your email address will not be published.