इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंना धमकीची भाषा करणाऱ्या घागबुवांनी माफी मागावी पुरोगामी संघटनांची मागणी

0 138

इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंना धमकीची भाषा करणाऱ्या घागबुवांनी माफी मागावी पुरोगामी संघटनांची मागणी

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील श्री. लक्ष्मी नृसिंह जयंती महोत्सवात इतिहास संशोधक शिवव्याख्याते प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या शरद घाग बुवांनी जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा निर्धार पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते अँड. दीपक लाड म्हणाले, सध्या सांप्रदायिक शक्तींकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. शिवविचारांच्या माध्यमांतून समाजप्रबोधन करणाऱ्या विचारवंतांना जपण्याचा हा काळ आहे. अशा वेळी घाम बुवांनी श्रीमंत कोकाटे यांच्याविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आहे. त्यामुळे आज क्रांतिसिंह असते तर त्यांनी पाया पत्र्या ठोकल्या असत्या. घाग यांनी जाहीर माफी न मागितल्यास प्रशासनाकडे कारवाईचा आग्रह धरणार आहोत.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे म्हणाले, श्रीमंत कोकाटे समाज प्रबोधनाचे काम करतात. महाराष्ट्रात छत्रपतींच्या नावावर राजकारण करणारे अनेकजण आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पीएच.डी. करणारे कोकाटे एकमेव आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर अनेकवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. तुमचा दाभोळकर, कलबुगी करू अशा धमक्या दिल्या आहेत. ज्या बुवांनी त्यांच्याविषयी संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी माफी मागावी, अन्यथा गुन्हा दाखल करू. अँड. क्रांती पाटील म्हणाल्या, विचारांचा मुकाबला विचाराने करायला हवा, धमक्या देऊन ठार मारण्याची भाषा करत विचार संपत नाहीत. या जिल्ह्याला पुरोगामी विचारांचा मोठा वारसा आहे. कोकाटे समाज परिवर्तनाचे काम करत आहेत.

इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंना धमकी दिल्यानंतर समाजातून तीव्र विरोध होताना दिसत आहे. त्यात अॅड. धनंजय पाटील म्हणाले, कोकाटे यांच्याविषयीचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शासनाने कारवाई करावी अन्यथा आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबू. यावेळी शेतकरी संघटनेचे संग्राम थोरबोले म्हणाले, कोकाटेंना फाडण्याची भाषा करणाऱ्या घाग बुवांनी स्वतःची उंची तपासावी. येत्या आठ दिवसांत त्यांनी माफी मागावी अन्यथा नृसिंहवाडीत येऊन माफी मागायला लावू. तसेच शेकापचे सागर रणदिवे म्हणाले, श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या प्रागतिक विचार मांडणाऱ्यांना संपवण्याची भाषा केली जाते. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बुवांवर कारवाई करावी. तर ‘स्वाभिमानी’चे भागवत जाधव म्हणाले, शरदबुवा घाग यांनी त्यांच्या पोटातले औठावर आणले. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्येचे सूत्रधार हेच लोक आहेत. सरकारने यांच्यावर कारवाई करावी असे म्हणाले. यावेळी जे. पी. पवार, सुरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, अजित हवालदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.