क्रांतीसुर्य जोतिबा फुले

न्यायमूर्ती पी.बी.सावंत म्हणाले होते की, शिक्षण आणि समाज परिवर्तनासाठी या भूमीत कायावाचामने चंदनासारखा झिजलेला पहीला महापुरूष म्हणजे महात्मा जोतिबा फुले.

0 186

क्रांतीसुर्य जोतिबा फुले

 

✍🏻नवनाथ दत्तात्रय रेपे (भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)

 

 

गावोगाव भट शाळा गुरू होती ! शुद्रा शिकविती ! राजद्रोह !

आर्याच्या इराणी नाही भेदाभेद ! घ्यावा हाच शोध वेदामध्ये !
गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळ धनी ! इराणी मागूनी आले येथे !
असं म्हणणारे महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, जोतिबा की नीति, उनका तत्त्वज्ञान यही लोकतंत्र का एकमात्र सच्चा मार्ग हैं ! त्या जोतिबांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, त्यांच्या वडीलाचे नाव गोविंदराव तर आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत असत त्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली होती. जोतिबांना वयाच्या सातव्या वर्षी शाळेत घातले पण त्यांच्या घरी असणा-या ब्राम्हण कारकुनाने गोविंदरावांना शिक्षणामुळे मुलं बिघडतात असं सांगितले त्यानंतर वडीलांनी जोतिबांना शाळेतून काढलं व फुलशेती करायला लावली. त्यानंतर १८४० साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथिल खंडोबा नेवासे यांच्या सावित्रीशी जोतिबांचा विवाह लावून दिला.
गफार बेग मुन्शी व लिजिट या खिश्चन व्यक्तीशी जोतिबांची ओळख झाली. तेव्हा या दोघांच्याही लक्षात आले की, जोतिबा बुध्दीने खुप तल्लख आहे, त्याला शाळेत पाठवण्यासाठी त्यांनी गोविंदरावांना विनंती केली तेव्हा १८४१ साली म्हणजे जोतिबांच्या वयाच्या १४ व्या वर्षी पहीलीच्या वर्गात पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी तिथेच सातवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. जोतिबांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, मोडी व उर्दू या भाषा येत होत्या तेव्हा गफार बेग मुन्शी व लिजिट यांनी कुराण व बायबल विषयी जोतिबांना माहीती सांगितली त्यानंतर जोतिबांनी हिंदू धर्मग्रंथहीही वाचले. म्हणून गणेश कांबळे म्हणतात की,
‘सत्याचे कळले होते जोतिबांना मर्म
नाश केला असत्याचा संपविला अधर्म
आयुष्य वेचले जोतिबांनी करूनी थोर हे कर्म
गोर गरीब अन् दिनदुबळ्यांसाठी रक्षिला मानवता धर्म’.
एकदा जोतिबा एका ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या व-हाडात गेले तेव्हा तेथील कर्मठ ब्राम्हणांनी जोतिबांना अपमानीत केले त्यावेळी त्यांनी तिथे चिंता न करता घडलेल्या घटनेचे चिंतन केले. तेथून परत आल्यानंतर ब्राम्हणांनी रचलेले थोतांड पुराणकथा व भाकड पुराण वेद शास्त्राचा बारकाईने अभ्यास केला त्यावेळी त्यांना हीच शास्त्रे जाती व वर्णव्यवस्थेला खतपाणी घालतात याची जाणीव झाली. या सर्व थोतांड शास्त्राचा नायनाट करायचा असेल तर बहुजन समाज सुशिक्षित झाला पाहीजे असे त्यांनी ठरविले व त्यादृष्टीकोनातून प्रयत्न केले म्हणून तर संस्कृत पंडीत डाॅ. आ.ह. साळूंखे म्हणतात की, वेदप्रामाण्य आणि परंपरागत मुल्ये महात्मा फुलेंनी नाकारली. जोतिबा फुलेंनी त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात मुलींची पहीली शाळा स्थापन केली तेव्हा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांनी आरोळी ठोकली की, मुलगी शिकली तर धर्म बुडेल, त्यामुळे त्यांनी महात्मा फुलेंना मारण्याचे अनेकदा प्रत्यन केले. तेव्हा जोतिबांना साथ दिली ती गंजपेठेतील उस्मान शेख ह्या मुस्लिम बांधवाने तसेच त्या शाळेत सावित्रीमाई सोबत अध्यापनाचे कार्य फातीमाबीबी शेख ह्या मुस्लिम भगीनीने केले होते. सावित्रीमाईंच्या अंगावर शेण गोठे मारणा-या कर्मठ ब्राम्हणांनी फुलेंनाही त्रास दिला होता त्याचेच वारसपुत्र आज मुस्लिम दहशतवादी आहेत अशी आरोळी ठोकतात तेव्हा नेमके दहशतवादी कोण ? ब्राम्हण की मुस्लिम हे तुम्हीच ठरवले पाहीजे. एकदा एका ब्राम्हणाने सावित्रीमाईला अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीमाईंनी पायातील पायतान काढून त्यााचे थोबाड फोडले होते यातून आमच्या आजच्या तरुणींनी आदर्श घेतला पाहीजे. जोतिबा – सावित्रीमाईंनी बहुजन समाज सुशिक्षित करण्यासाठी खुप मोठा संघर्ष केला आहे. जोतिबा फुलेंच्या कार्यांचा धसका तत्कालीन ब्राम्हणांनी तर घेतलाच होता पण आजही त्यांच्या विचारांचा धसका मनोहर कुलकर्णी या ब्राम्हणांने घेतलेला दिसतोय त्यामुळे तर तो त्यांना देशद्रोही म्हणतो व स्वत: ला देशभक्त समजतो पण देशद्रोही नेमके कोण आहेत हे बहुजन समाजाने ओळखले आहे. म्हणून तर महर्षी वि.रा. शिंदे यांच्या शब्दात सांगावं वाटत की, दांभिक देशभक्तापेक्षा महात्मा फुलेंची देशभक्ती वरच्या दर्जाची आहे.
महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या शाळेतील विद्यार्थी मुक्ता साळवे हीने विद्रोही निंबधाच्या माध्यमातून या धर्मव्यवस्थेवर तासेरे ओढले होते, त्याच शाळेतून शिकलेल्या ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री पुरूष तुलना’ हे पुस्तक लिहले तर तानुबाई बिर्जे यांनी दिनबंधूच्या पहील्या महीला संपादक झाल्या हे महात्मा फुलेंच्या कार्याला आलेले यश होते म्हणून तर न्यायमूर्ती पी.बी.सावंत म्हणाले होते की, शिक्षण आणि समाज परिवर्तनासाठी या भूमीत कायावाचामने चंदनासारखा झिजलेला पहीला महापुरूष म्हणजे महात्मा जोतिबा फुले. पण आज ब्राम्हणांनी ज्यांचे मेंदू हायजॅक केलेत ते बहुजनातील काही बांडगुळ म्हणजेच पुणे येथिल लोकसेवा अॅकॅडमीचे आप्पा हतनुरे सारख्या विकृती महात्मा फुलेंची चेष्ट करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे.
महात्मा फुलेंनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला होता तसेच १८६३ साली भ्रूणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली व विधवांनी स्वत:च्या बाळाचा प्राण गमवू नये त्यांनी ते बाळ माझ्याकडे द्यावे असे आवाहन करून त्यांनी विधवा पुनर्विवाह केले होते. म्हणून तर ऋतुजा कांबळे म्हणतात की,
‘थे वो एक महान समाज सुधारक ,
छुआछूत के थे वो महान उद्धारक ।
शिक्षा से ही जिन्होंने अलख जगाई ,
विधवा पुनर्विवाह के लिए लड़ी लड़ाई ।’
महात्मा जोतिबा फुलेंनी थाॅमस पेन यांचा ‘मानवाधिकार’ हा ग्रंथ वाचला होता त्यांनी बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महीलांचे केशवपन प्रस्था बंद करण्यासाठी नाभिकांची बैठक बोलावून त्यांची संघटना काढली व त्यामाध्यमातून केशवपन प्रथेला आळा घातला. त्यांनी कामगार संघटना स्थापन करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्या संघटनेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे होते. महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहीली शिवजयंती साजरी केली तसेच शिवाजी महाराजावर पोवाडा लिहाला होता. ते इतिहास संशोधक देखिल होते कारण ते इतिसाबद्दल म्हणतात की, जगातील मानवाच्या भूतकाळात ब-या वाईट घडलेल्या सत्य गोष्टींचे दर्शन ज्या ग्रंथाने होते, त्यास इतिहास असे म्हणतात ते महात्मा फुले दैववादी नव्हते यांच उत्तम उदाहरण म्हणजे अक्राळ विक्राळ गणपतीवर केलेले भाष्य पण हे आमच्या बहुजन समाजाने आजपर्यंत वाचले नाही म्हणून तर ते दरवर्षी गणफतीला लवकर या लवकर या म्हणत पाण्यात बुडवताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे.
महात्मा जोतिबा फुले यांचे पहीले चरित्र पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले होते. आज बहुजन समाजातील लेखकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्यावर असंख्य पुस्तके लिहिली आहेत त्यात मा. डी.के.खापर्डे यांनी ‘महात्मा जोतिबा फुले’ हे तर मराठा सेवा संघांचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘भटोबाचा कदर्नकाळ जोतीबा’ , डाॅ. आ.ह.साळूंखे यांनी ‘महात्मा फुले आणि धर्म’ तसेच डाॅ. श्रीमंत कोकाटे यांनी ‘खरा शिक्षकदिन’ ही पुस्तकं अप्रतिम पुस्तक लिहली आहेत. म्हणून तर म्हणून तर ऋतुजा कांबळे म्हणतात की,
सवर्णोंने रखा था शिक्षा से वंचित ,
सभीको कर दिया पढ लिखकर सुशिक्षित।
जुलमी पेशवाई को जड से खत्म कर गये,
सत्यशोधक समाज के निर्माता वो,
युगप्रवर्तक जो कहेलाए॥
महात्मा फुलेंनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य खुप मोलाचे होते त्यामुळे तर राजर्षी शाहू महाराज म्हणत की, महात्मा जोतीराव फुले हे भारताचे मार्टिन ल्यूथर आहेत. तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणाले की, जोतिराव फुले हे भारताचे वाॅशिंग्टन आहेत. त्याशिवाय काॅ. शरद पाटील म्हणतात की, भारतीय मुक्ती समस्येचे उत्तर अचूक शोधणे शक्य व्हावे अशा रीतीने महात्मा फुलेंनी ती उभा केली हीच फुलेवादाची महत्ता आहे. तसेच इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे म्हणतात की, जोतिबांचे चारित्र्य सुर्यप्रकाशासारखे तेजस्वी होते, प्रत्येक स्त्रीला त्यांनी सन्मानाने वागविले होते.
अशा महामानवाचे विचार जोपर्यंत घराघरात पोहोचून ते विचार बहुजन समाजातील तरूणांनी आचरणात आणले जात नाहीत तोपर्यंत काही साध्य होणार नाही, पण जयंतीच्या माध्यमातून जोतिबांचे विचार घराघरात पोहोचले पाहीजेत तेव्हाच ख-या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल. म्हणून तर शेवटी गणेश कांबळे यांच्या शब्दांत म्हणावं वाटतं की,
‘ज्योत पेटवून शिक्षणाची न्याय दिला स्त्री जातीला
वेग आला या क्रांतीने देशाच्या प्रगतीला
शिकून मोठे होऊ सारे साज चढवूया किर्तीला
कोटी कोटी वंदन करतो मी या थोर मुर्तीला !’

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. भट बोकड मोठा

२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क रूक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२, ९७६४४०८७९४

Leave A Reply

Your email address will not be published.